घरफाळा सवलतयोजनेमध्ये आज १ कोटी ४ लाख कर वसूल आज सवलतीचा शेवटचा दिवस
कोल्हापूर/प्रतिनिधी : महापालिकेच्याघरफाळा विभागाने शहरातील मिळकतकर थकबाकीदारांना थकबाकीचे दंडव्याजामध्ये चालू मागणीसह थकबाकीचीरक्कम एक रक्कमी भरणा केलेससवलत योजना सुरू केली होती. त्यासप्रतीसाद देत करदात्यांनी मंगळवार दि. ३० मार्च २०२१ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंतरुपये १ कोटी ४ लाख इतका कराचा भरणा केला असून आज अखेर एकूणरुपये ५७ कोटी ९५ लाख इतका करवसूल झाला आहे.
सदर योजनेचा बुधवार दि.३१ मार्च २०२१ रोजी अंतिम दिवस असून इथून पुढे सवलत योजनेचा लाभ घेता येणार नाही. तरी शहरातील करदाता मिळकतधारकांना सवलत योजनेचा लाभमिळणेकरीता आज रात्री १२ वाजेपर्यंत महानगरपालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्र सुरू राहणार असून त्याठीकाणी कराचा भरणा करून सवलत योजनेचा लाभ घेता येईल. त्याशिवाय ज्यांनाऑनलाईन कराचा भरणा करणे शक्यआहे त्यांनी आपला कर ऑनलाईन भरना करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासक कादंबरी बलकवडेयांनी केलेआहे.
तसेच जे थकबाकीदारमिळकतधारक आपले कराचा भरणाकरणार नाहीत त्यांचे मिळकतीवर १ एप्रिलपासून जप्ती व मिळकतीवर बोजा नोंद करणे यासारखी कठोर कारवाईसुध्दा करणेबाबतचे आदेश सर्व अधिकारी कर्मचारी यांना देणेत आलेले आहेत व अशी सवलत योजना भविष्यात पुन्हा राबविण्यात येणार नसलेबाबत स्पष्ट केले आहे. तेंव्हा जास्तीजास्त करदात्यांनी कराचा भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.