Friday, December 20, 2024
Home ताज्या स्वतःला सिद्ध करण्यासाठी महिलांनी कष्टाची तयारी ठेवावी,या जोरावरच मनोरमा सोल्युशन कंपनी उभी...

स्वतःला सिद्ध करण्यासाठी महिलांनी कष्टाची तयारी ठेवावी,या जोरावरच मनोरमा सोल्युशन कंपनी उभी केली – स्मार्ट लेडी अश्विनी दानिगोंड

स्वतःला सिद्ध करण्यासाठी महिलांनी कष्टाची तयारी ठेवावी,या जोरावरच मनोरमा सोल्युशन कंपनी उभी केली – स्मार्ट लेडी अश्विनी दानिगोंड

कोल्हापूर/श्रद्धा जोगळेकर :
देशात नव्हे तर जगात कोल्हापूरने आपला वेगळेपणाचा ठसा आजही कायम ठेवला आहे. यामध्ये कोल्हापूरच्या सुकन्या स्मार्ट लेडी अश्विनी दानिगोंड यांचे उदाहरण द्यावे लागेल.कारण त्यांनी कोल्हापुरात पहिली मनोरमा सोल्युशन ही
आयटी कंपनी उभारून तिच्या राज्यासह देशातील मेट्रो सिटी मध्ये पंधरा ठिकाणी शाखा काढून ५०० पेक्षा अधिक युवक व युवतींच्या हाताला रोजगार दिला आहे.मनोरमा सोल्युशन या कंपनीचे कार्यालय महावीर कॉलेज,नागाळा पार्क कोल्हापूर येथे आहे.अशा या स्मार्ट लेडी अश्विनी दानिगोंड यांनी महिला दिनाच्या निमित्ताने माय मराठी न्युज या पोर्टलला दिलेली ही मुलाखत आम्ही प्रसारित करत आहोत.जन्माला आल्यानंतर मुलगी म्हणून जे संस्कार होतात त्यानुसार महिला घडते मला मात्र माझ्या आईने हे संस्कार दिले त्यातून मी खूप शिकले माझ्या आईने मला जेवण स्वतः बनवायचे व सर्वांना खाऊपिऊ घालायचे शिकविले लहानपणापासून स्त्रीची बुद्धी आजूबाजूचे वातावरण पाहून विकसित होत असते मला मात्र माझ्या बुद्धीला चालना देण्यामध्ये माझ्या आईचा वडिलांचा मोठा वाटा असल्याचे सांगून आताही मी लग्न करून सासरी आले आहे तरीही माझी सासू मला नेहमी उभारी देत असते व माझी आई आज हि मला हा कंपनीचा व्याप सांभाळत असताना तु घराकडे ही तितकंच लक्ष दिले पाहिजे असे सांगत असते त्यामुळे मी जसे माझे कुटुंब निर्माण केले तशीच माझी मनोरमा सोल्युशन ही आयटी कंपनी कुटुंब म्हणून उभा केली आहे याचे सर्व श्रेय माझ्या आई-वडिलांना व सासरच्या लोकांना जात असल्याचे त्यांनी सांगितल. महिलां विषयी बोलताना त्यांनी सांगितले प्रत्येकांच्या अंगी गुण असतात मात्र त्या गुणांचा अंगीकार करून आपल्यातील गुण शोधून एखाद्या गरीब व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून आपण त्याची वाटचाल करणे आवश्यक असल्याचे सांगितले. अडचणी प्रत्येकाला असतात मात्र त्यावर मार्ग शोधणे आणि निर्णय घेणे हे आपल्यालाच करावे लागते आयुष्यात खूप टप्पे टोणपे मी घेतलेले आहेत कष्ट करण्याची तयारी ठेवली आणि म्हणूनच आज मी ही कंपनी उभी करू शकले असे सांगून स्वतःचा दिवस कशा पद्धतीने कामामध्ये घालवायचा याबाबत मी सतत आग्रही असते असेही सांगितले. स्वतःला बनविण्यासाठी आजूबाजूच्या वातावरणामध्ये पाय ठेवून त्यापद्धतीने स्वतःला घडविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.सॉफ्टवेयर कंपनीमध्ये करिअर करायचे माझे स्वप्न होते आयटी क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय होता आणि यावर विचार करत गेले आणि हेल्थ केअर सारखी मनोरमा माझ्या हातून घडत गेली असे सांगितले. १४ वर्षापासून मी या कंपनीचा कारभार सांभाळत आहे. आजूबाजूला स्पर्धा खूप आहेत मात्र जबाबदारीतून पळ न काढता त्या स्पर्धांचा सामना करून आपण निश्चित ध्येय गाठणे आवश्यक आहे असेही अश्विनी दानिगोंड यांनी सांगितले.मनोरमा सोल्युशन या नावाने कोल्हापुरात पहिली आयटी कंपनी उभारून तिच्या राज्यासह देशातील मेट्रो सिटी मध्ये पंधरा ठिकाणी शाखा त्यांनी काढल्या आहेत. व अनेक गरजू युवक युवतींना या कंपनीच्या माध्यमातून हाताला रोजगार देऊन त्यांचे आयुष्य घडविले आहे.आजवर अश्विनी दानिगोंड यांच्या चांगल्या कामामुळे आणि कर्तृत्वामुळे त्यांना अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार देखील मिळाले आहेत. कंपनी सुरू करताना आणि त्याच्या शाखा वाढवताना त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि कुटुंबातील प्रत्येकाने बहु मोलाची साथ दिली आहे. अश्विनी दानिगोंड यांनी कोरोना काळात आणि कोल्हापुरात आलेल्या महापुराच्या काळात दोन कोटी रुपयांचा निधी देखील जिल्हा प्रशासनाला दिला आहे. नुसता निधी देऊन त्या थांबल्या नाहीत तर स्वतः त्यांनी आणि त्यांच्या टीमने कोरोना काळात आणि .महापुराच्या काळात जीवाची बाजी लावून काम केले आहे. विशेष म्हणजे ही आयटी कंपनी व या आयटी कंपनीचे हेड ऑफिस हे मुंबई-पुण्यात नसून कोल्हापुरात आहे. कार्पोरेट कंपनीचा कामासोबतच सामाजिक कार्य अश्विनी दानीगोंड यांनी सुरू ठेवले आहे.अश्विनी दानिगोंड यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. परंतु कुठेही न खचता आपला प्रवास आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी गाठत यशाच्या शिखरावर नेला आहे. कोरोना काळातही आपल्या कर्मचाऱ्यांची त्यांनी काळजी घेत त्यांना कुटुंबासारखे जगविले आहे. म्हणूनच अश्विनी दानिगोंड यांच्या या कर्तुत्वाला माय मराठी न्यूजचा सलाम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments