Tuesday, October 15, 2024
Home ताज्या महाराष्ट्रातील परिवहन सेवेबाबत साऊथ कोरियाच्या शिष्टमंडळासमोर सादरीकरण

महाराष्ट्रातील परिवहन सेवेबाबत साऊथ कोरियाच्या शिष्टमंडळासमोर सादरीकरण

महाराष्ट्रातील परिवहन सेवेबाबत साऊथ कोरियाच्या शिष्टमंडळासमोर सादरीकरण

मुंबई/प्रतिनिधी : महाराष्ट्रातील परिवहन विभागांतर्गत सुरू असलेले महत्त्वाचे प्रकल्प, परिवहन सेवा, एसटी महामंडळसेवा, भविष्यात राबविण्यात येणारे प्रकल्प यासंदर्भातील सादरीकरण परिवहन विभागाकडून परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली साऊथ कोरिया शिष्टमंडळासमोर करण्यात आले.
सह्याद्री अतिथीगृह येथे साऊथ कोरियाच्या कौन्सिल जनरल यांच्यासमवेत शिष्टमंडळासमोर सादरीकरण करण्यात आले. या शिष्टमंडळामध्ये साऊथ कोरियाचे कॉन्सिल जनरल डाँग युंग किम, सांगजिन पार्क, कोत्राचे संचालक श्री. हाँग, कोरिया लँड आणि हाउसिंग कॉपोरेशनचे सँगसू ली यांचा समावेश होता.राज्यातील परिवहन सेवा अधिक भक्कम करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. इलेक्ट्रीक व्हेईकल अशा प्रकल्पांमध्ये साऊथ कोरियाने सहकार्य करावे. परिवहन क्षेत्रातील गुंतवणूक,पर्यावरणपूरक परिवहन सेवा या संदर्भात महाराष्ट्र सहकार्य करेल असे यावेळी ॲड. परब यांनी सांगितले.यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव तथा परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद डेलिया ग्रुप प्रथम : जैना ओसवाल गरबा क्वीनची मानकरी : महिलांनी लुटला नृत्याचा आनंद कोल्हापूर/प्रतिनिधी :...

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार अतिग्रे/प्रतिनिधी : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संजय घोडावत यांना एज्युकेशन टुडे संस्थेच्या वतीने यावर्षीचा एज्युकेशन आयकॉन पुरस्कार मुंबई...

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट ‘नाद – द हार्ड लव्ह’ २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट 'नाद - द हार्ड लव्ह' २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार कोल्हापूर/प्रतिनिधी : २५ ऑक्टोबरला एक धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.तो...

११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद

शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र ११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद कोल्हापूर/प्रतिनिधी : शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र वतीने जिल्ह्यातील...

Recent Comments