Friday, September 20, 2024
Home ताज्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी १८ कोटी रुपये मंजूर आमदार ऋतुराज पाटील यांची...

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी १८ कोटी रुपये मंजूर आमदार ऋतुराज पाटील यांची माहिती

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी १८ कोटी रुपये मंजूर आमदार ऋतुराज पाटील यांची माहिती

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राज्य व प्रमुख मार्गासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून १७.९५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे. या निधीतून रस्ते, गटर्स व इतर कामे करण्यात येणार आहेत.
विकासवाडी नेर्ली तामगांव उजळाईवाडी विमानतळमार्गे मुडशिंगी वसगडे लांबोरे मळा, विमानतळ ते मणेरमळा रस्ता व आरसीसी गटर्स बांधणे व रुंदीकरणासह रस्ता सुधारणा करणे (२ कोटी ५० लाख), कोल्हापूर शहराबाहेरील वळण रस्ता शाहू नाका, कळंबा, साळोखेनगर, बालिंगे शिंगणापूर, चिखली, वडणगे, निगवे दुमाला, शिये, टोप ते एमआयडीसी पूल कसबा बावडा शुगरमिल जवळून कदमवाडी मार्केट यार्ड ताराराणी पुतळा ते शाहूनाका उजळाईवाडी ते विमानतळ रस्ता सुधारणा करणे व आरसीसी गटर्स बांधणे (१ कोटी), विजयदूर्ग तलेरा गगनबावडा कोल्हापूर पट्टणकोडोली हुपरी रेंदाळ जंगमवाडी राज्य हद्दीपर्यंत, उचगांव पूल ते मुडशिंगी कमान रस्ता सुधारणा करणे (२ कोटी ५० लाख), कोल्हापूर कळंबे तर्फ ठाणे, इस्पुर्ली, शेळेवाडी रस्ता सुधारणा करणे, (५ कोटी), आयटीआय, पाचगांव, गिरगांव, वडगांव, नंदगांव, खेबवडे ते बाचणी रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे (२कोटी), विकासवाडी, नेर्ली, तामगांव, उजळाईवाडी, विमानतळमार्गे मुडशिंगी, वसगडे लांबोरे मळा आरसीसी गटर्स बांधणे व रुंदीकरणासह रस्ता सुधारणा करणे ( २ कोटी ५० लाख), चंद्रे, निगवे खालसा, कावणे, चुये, वडकशिवाले, इस्पूर्ली, दिंडनेर्ली, दऱ्याचे वडगांव, कोगील, कणेरी, नेर्ली, हलसवडे, पट्टणकोडोली, कोगील बु. गावाजवळ आरसीसी गटर्स बांधणे व काँक्रीटीकरण करणे (१कोटी), चंद्रे, निगवे खालसा, कावणे, चुये, वडकशिवाले, इस्पुर्ली, दिंडनेर्ली, दऱ्याचे वडगांव, कोगील, कणेरी, गोकुळ शिरगांव, नेर्ली पट्टणकोडोली, मोरी बांधकाम व संरक्षक भिंत बांधकाम करणे (५० लाख), कात्यायनी मंदिर, दऱ्याचे वडगांव, सिध्दनेर्ली बंदीस्त गटर्स करणे (६० लाख) आदी कामे मंजूर झाली आहेत.
निधी मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व पालकमंत्री सतेज पाटील यांचे सहकार्य लाभल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे अकरावे “यामिनी” प्रदर्शन आजपासून सुरू २०.२१.२२ सप्टेंबर रोजी आयोजित

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे अकरावे "यामिनी" प्रदर्शन आजपासून सुरू २०.२१.२२ सप्टेंबर रोजी आयोजित कोल्हापूर/प्रतिनिधी : दसरा दिवाळी जवळ येताच कोल्हापुरच्या जनतेला वेध लागतात ते यामिनी...

पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद,पोलिस यंत्रणा राबली

पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद,पोलिस यंत्रणा राबली इराणी खणीमध्ये सार्वजनिक मंडळाच्या १०३५ व घरगुती व मंडळांच्या लहान ११०१ गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन कोल्हापूर/प्रतिनिधी :...

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न जयसिंगपूर/प्रतिनिधी : श्री.सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेची रौप्य महोत्सवी सभा सोसायटीच्या प्रांगणात १५ सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.सभेचे...

स्वामी भक्तांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा

स्वामी भक्तांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ भक्त कोल्हापूर शहर व जिल्हा या़ंचेवतीने ज्ञानेश महाराव या इसमाने श्री स्वामी समर्थ महाराजांच्यावर...

Recent Comments