अर्थसंकल्प हा शेतकरी, महिला, युवक या घटकांना उभारी देणारा – आम.ऋतुराज पाटोल
कोल्हापूर/प्रतिनिधी : अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा नक्कीच राज्यातील शेतकरी, महिला, युवक या घटकांना उभारी देणारा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी साडेसात हजार कोटीची तरतूद केली आहे. कोरोनाच्या काळात देश आणि राज्याला तारलेल्या शेती आणि शेतकरी बळकटी देण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत.युवकांसाठी नवीन कौशल्य विद्यापीठ राज्यात सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून या विद्यापीठातून रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.त्यामुळे आम्ही सुरू केलेल्या मिशन रोजगार ला प्रोत्साहन मिळेल अशी प्रतिक्रिया आ.ऋतुराज पाटील यांनी दिली आहे.