विकासाला चालना देणारा सर्वोत्कृष्ट अर्थसंकल्प – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया
कोल्हापूर/प्रतिनिधी : गेल्या वर्षभराच्या कोरोना काळात मोठ्या प्रमाणात महसुली तूट असतानाही विकासाला चालना देणारा सर्वोत्कृष्ट असा हा अर्थसंकल्प आहे. महिला, कष्टकरी, शेतकरी, श्रमिक, सुशिक्षित बेरोजगार अशा सर्वच समाजघटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात सर्वच देव-देवतानाही न्याय दिला आहे. अनंत संकटांवर मात करीत असतानाच “महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही” या महाविकास आघाडीच्या गतिशील कारभाराची प्रचिती देणारा हा सर्वोत्कृष्ट अर्थसंकल्प आहे.