Tuesday, July 23, 2024
Home ताज्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला चिंता वाढली

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला चिंता वाढली

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला चिंता वाढली

 

श्रद्धा जोगळेकर

कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे आणि राज्य शासनाने याबाबत योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहन प्रत्येक जिल्ह्यातील प्रशासनाला केले आहे. लोकांचे जीवन सुरळीत व्हावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा लॉकडाऊन उठवत सर्वकाही सुरळीत करण्याचा प्रयत्न केला मात्र याचा परिणाम उलट होऊ लागला असून लोक कोणतीही दक्षता घेत नसल्याचे पहावयास मिळत असून यामुळे याचा संसर्ग पुन्हा एकदा वाढला असून मुख्यमंत्र्यांनी लोकांनी कोणतीही काळजी घेतली नाही. गर्दी टाळली नाही तर पुन्हा आम्ही लॉकडाऊन करण्याच्या विचारात आहोत असे जनतेला मुख्यमंत्री यानी सूचित केले आहे त्यामुळे जनतेने आता योग्य ते नियम पाळणे आवश्यक आहे.२०१९ सालापासून कोरोना सुरु झाला आहे खऱ्या अर्थाने भारत देशामध्ये फेब्रुवारी २०२० महिन्यात याची लागण सुरू झाली. आणि मार्च महिन्यामध्ये केंद्र सरकारने लॉकडाऊन पुकारला आणि सर्व व्यवहार बंद ठेवले लोकांना एकमेकांच्या नातेवाइकांकडे न जाणे बाहेरून येणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात न येणे विशेषता लहान मुलांची वृद्ध लोकांची काळजी घेणे असे सूचित केले होते आणि सर्व ठिकाणी बंद पुकारण्यात आला होता त्यामुळे हा कोरोना मोठ्या प्रमाणात होऊ शकला नाही त्याला अटकाव बसला याचा प्रादुर्भाव कमी झाला तसा देशातील बऱ्याच ठिकाणचा बंदचा कालावधी कमी करण्यात आला आणि टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरळीत करण्यात आले मात्र हे सर्व व्यवहार सुरळीत करत असताना जनतेला लोकांना मास्क वापरणे एकमेकांच्या सहवासात जास्त काळ न राहणे अशा प्रकारचे नियम ही लादले गेले मात्र याचे कोणतेही पालन केले गेले नसल्याने गेल्या २०२१ च्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून हा कोरोना चा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. याचे सर्वाधिक प्रमाण आता मुंबई नागपूर आणि अमरावती मध्ये दिसून येत आहे. त्यामुळे या ठिकाणचे लोक इतरत्र जाऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला नियमांचे पालन करा अन्यथा आम्हाला पुन्हा एकदा मागील वर्षी सारखे लॉकडाऊन करावे लागेल असा इशारा दिला आहे.मार्च २०२० साली कोरोना ने कहर केला होता यामध्ये मध्ये बरेच पेशंट लोक गमावले यांचा मृत्यू झाला बर्‍याच जणांचे नातेवाईक दगावले गेले. कोरोनाच्या कालावधीमध्ये शेजारील लोकांबरोबर बोलता येत नव्हते अशी परिस्थिती होती. एकमेकांसोबत न बोलणे जवळ न जाणे हस्तांदोलन न करणे असे कोरोनाचे नियम त्यावेळी होते आताही तेच नियम लागू करण्यात आले आहेत परंतु लोक त्याची अंमलबजावणी करताना दिसत नाहीत.यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढू लागला आहे. आणि यामुळे लोक सुरक्षित राहावेत यासाठी महाराष्ट्र शासन पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याच्या तयारीत आहेत याला सर्वस्वी जबाबदार शासन जनतेला धरत असून जनतेने आता कसे वागायचे त्यावर पुढचे सर्व निर्णय आमचे अवलंबून असतील असा इशाराही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. मुंबईमध्ये लोकल ट्रेन सुरू झाल्याने हा कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आणि बऱ्याच ठिकाणी हा कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या वाढत चालला असून शासन याबाबत गांभीर्याने दखल घेत असून पुन्हा एकदा महाराष्ट्र बंद करण्याच्या तयारीला लागले आहेत. आणि तशी वेळ आमच्यावर आणू नये असेही मुख्यमंत्री बोलत आहेत त्यामुळे सध्या तरी लोकांनी गांभीर्याने राहणे गरजेचे आहे व वेळोवेळी मास्क वापरणे एकमेकांच्या हातात हात न देणे,गर्दी टाळणे समारंभास गर्दी न करणे कार्यक्रमास गर्दी न करणे आणि अशा गर्दीच्या ठिकाणी न जाणे हे नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि न्यायालयाचे याचिका कर्ते दिलीप पाटील यांचे काल शनिवारी कराड नजीक...

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर कोल्हापूर/२० जुलै (वार्ता.) - कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात सातत्याने होणार्‍या पावसाने कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्यांच्या पाणी...

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

Recent Comments