नगरविकासमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे आज शुक्रवार दि.०८ रोजी कोल्हापूर दौऱ्यावर
कोल्हापूर/प्रतिनिधी : शिवसेना नेते व महाराष्ट्र राज्यांचे नगरविकासमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे शुक्रवार दि.०८ जानेवारी २०२१ रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून, महानगरपालिका निवडणुकीच्या धर्तीवर शिवसैनिकांसह युवा सैनिकांमध्ये नवचैतन्याचे वातावरण तयार झाले आहे. नगरविकासमंत्री नाम.श्री.एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्यातून शहरात भगवे वातावरण निर्माण करण्याची जय्यत तयारी शिवसेना आणि युवा सेनेच्या पदाधिकार्यांनी केली असून, कोल्हापूर शहर शिवसेनेच्यावतीने त्यांचे भव्यदिव्य स्वागत होणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
याबाबत बोलताना त्यांनी पुढे म्हंटले आहे कि, बृहन्मुंबई महापालिकेचे क्षेत्र वगळता उर्वरित सर्व महानगरपालिका, नगरपालिका, प्रादेशिक नगररचना इ.क्षेत्राकरिता एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR) संपूर्ण राज्याकरिता लागू केल्याबद्दल कोल्हापूर शहर शिवसेनेच्यावतीने शिवसेना शहर कार्यालय, शनिवार पेठ, कोल्हापूर येथे सायंकाळी ८.०० वाजता चांदीची तलवार, भगवा फेटा, शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात येणार आहे. या दौऱ्यादरम्यान दिवसभर मंत्री महोदयांचा कार्यक्रम खालील प्रमाणे राहील. सकाळी १०.३० वा. – डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटल कॅम्पस कदमवाडी येथे आगमन
सकाळी १०.४५ वा.- कोल्हापूर महानगरपालिका येथे आगमन सकाळी १०.४५ ते ११.४५ वा- कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त व अधिकारी यांच्यासमवेत बैठक दुपारी ११.४५ ते १.१५ वा – कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत एकत्रित विकास नियंत्रण नियमावली (युनिफाईड डीसीआर) अंमलबजावणी विकासकामांचा आढावा (लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व अधिकारी यांच्यासमवेत) दुपारी १.१५ ते २.००- जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण
दुपारी २.१५ ते ३.३० वा – कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपरिषद व नगर पंचायती संदर्भात जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक. दुपारी ३.३० ते ५.०० वा. – जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी/पदाधिकारी संबधित नगरपरिषदा व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी व संबधित अधिकारी समवेत एकत्रित विकास नियंत्रण नियमावली (युनिफाईड डीसीआर) अंमलबजावणी व विकास कामांचा आढावा सायं.५.३० ते ६.०० वा. – जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद सायं.६.०० वा. – वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, क्रीडाई, असोसिएशन ऑफ आर्किटेक इंजिनिअर, जितो कोल्हापूर चॅप्टर तर्फे सत्कार – स्थळ : हॉटेल विक्सर द फर्न, शाहू मार्केट यार्ड समोर, कोल्हापूर. सायं.६.३० वा. – शिवसेना विभागीय कार्यालय कसबा बावडा येथे भेट सायं.७.०० वा. – शिवसेना शहरप्रमुख श्री.रविकिरण इंगवले यांच्या शिवाजी पेठ कार्यालयास भेट सायं.७.३० वा. – श्री अंबाबाई दर्शन रात्री ८.०० वा. – शिवसेना शहर कार्यकारणीच्या वतीने शिवसेना शहर कार्यालय, शनिवार पेठ येथे सत्कार रात्री ८.०० नंतर – राखीव दि.०९.०१.२०२१ रोजी सकाळी ९.०० वा. सांगलीकडे प्रयाण.