लोकाभिमुख जिल्हाधिकारी यांची बदली करु नये कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीची ईमेल द्वारा मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.दौलत देसाई यांची कोल्हापूरातून अन्यत्र मुदतपुर्व बदली होणार असल्याचे समजते. कोल्हापूरमध्ये मागील दिड वर्षामध्ये मा.जिल्हाधिकारी, मा.जिल्हा पोलीस
प्रमुख, मा.महापालिका आयुक्त यांनी महाप्रलयंकारी महापूर, त्यानंतरचा कोरोना
कालावधीमध्ये स्वत:चे जीव धोक्यात घालून रात्रंदिवस अतिशय चांगले काम करीत
त्याचे नेहमीचे प्रशासकीय कामकाज अतिशय चांगल्या प्रकारे करुन जनतेला न्याय
देण्याचे काम केलेले आहे. त्यांनी चांगल्या केलेल्या कामाचे बक्षीस की काय म्हणून
मा.जिल्हा पोलीस प्रमुख, मा.महापालिका आयुक्त यांची मुदतपुर्व तडकाफडकी
कोणतेही कारण नसताना शासनाने बदल्या केल्या. हा त्यांच्यावर मोठा अन्याय झाला आहे. या बदल्या झाल्या असताना कोल्हापूरची जनता हळहळली आणि जनतेचे डोळे पाणावले होते.आणि आज तर नवीन बातमी येतेय की जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची बदली होणार असे समजले आहे.तरी लोकाभिमुख जिल्हाधिकारी यांची बदली करु नये अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीची ईमेल द्वारा मुख्यमंत्र्यांकडे यांच्याकडे केली आहे.
या जिल्हाधिकाऱ्यांनी सुध्दा दिड वर्षापूर्वी ते कोल्हापूरात हजर झाल्यापासून
जिल्ह्याची मरगळलेली प्रशासन यंत्रणा गतिमान करुन जनतेला न्याय देण्याचे काम
केले असून देश स्वातंत्र झाल्यापासून ज्या डोंगराळ भागामध्ये प्रशासकीय यंत्रणा
पोहोचली नव्हती त्या ठिकाणी हे मा.जिल्हाधिकारी स्वत: दळणवळणाचे साधन
नसताना पाच सहा किलोमीटर दुर्गम भागात पायपीट करुन लोकांच्यापर्यंत पोहचून त्यांना सुविधा देण्याचे काम करीत आहेत. यापेक्षा आणखी अशा अधिकाऱ्यानी काय
केले पाहिजे.मा.जिल्हाधिकारीसाो यांचा कार्यकार अद्यापी बाकी असताना त्यांची मुदतपुर्व बदली शासन का करीत आहे याचे गोड बंगाल समजत नाही. राजकीय नेते व प्रशासनाला कोल्हापूरच्या विकासासाठी चांगले अधिकारी ठेवायचेच नाहीत का ? हा हट्टाहास कशासाठी चांगले काम करणाऱ्यांना त्यांची
शासकीय मुदत आहे तोपर्यंत कोल्हापूरात कार्यरत राहू द्या ना ! त्यांचा कार्यकाल
संपल्यावर बदली करण्यास काहीच कोणाची हरकत असणार नाही.
कोल्हापूरची जनता या निवेदनाव्दारे आपणाकडे मागणी करतो की, कोल्हापूरचे विद्यमान जिल्हाधिकारीसाो यांची त्यांचा कोल्हापूरातील कार्यकाल पूर्ण होईपर्यंत बदली करु नये. अन्यथा देश स्वतंत्र झाल्यावर सुध्दा इंग्रज राजवटीप्रमाणे हुकूमशाही महाराष्ट्रात चालू आहे असा निश्चित समज होईल. तरी याबाबत एक चांगले
जनताभिमुख राज्यकर्ते म्हणून चर्चेत असणारी मा.जिल्हाधिकारीसाो यांची होणारी बदली करु नये अशी आमची मागणी आहे. तरी सहकार्य करावे ही विनंती मेलवर केली आहे.
कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती, कोल्हापूर अशोक पोवार, रमेश मोरे, भाऊ घोडके, चंद्रकांत सुर्यवंशी, संभाजीराव जगदाळे,
विनोद डुणूंग, चंद्रकांत पाटील, अंजूम देसाई, दादासाो लाड, अँड.रणजित गावडे,
भरत रसाळे, राजेश वरक.आदींचा या मागणी पत्रावर समावेश आहे.