कोल्हापूर महानगर पालिका निवडणूक आरक्षण सोडत जाहीर
कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्य निवडणूक आयोगाच्या दि. ३ जानेवारी २०२० व दि. १४ जानेवारी २०२० चे आदेश तसेच दिनांक दि. २९ जानेवारी २०२० चे पत्र व दि.१५ डिसेंबर २०२० चे पत्र यानुसार कोल्हापूर महानगरपालिकेचे एकूण ८१ प्रभाग असून त्यापैकी ११ जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहेत अनुसूचित जातीच्या ११ पैकी सहा जागा अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित आहेत अनुसूचित जमातीची लोकसंख्या असल्याने कोणताही प्रभाग अनुसूचित जमातीसाठी राखीव झालेला नाही नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग साठी २२ जागा आरक्षित आहेत त्यापैकी ११ जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहेत सर्वसाधारण महिलांसाठी २४ जागा आरक्षित आहेत माननीय राज्य निवडणूक आयोग व महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार सन २०२० च्या महानगरपालिकेच्या सार्वजनिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत कार्यक्रम पार पडला.
कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०२० अंतर्गत आज सोमवारी (दि. २१) अधिकृत प्रभाग आरक्षण सोडत केशवराव भोसले नाट्यगृहात आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. सर्वपक्षीय प्रतिनिधी व नागरिकांसमोर पूर्ण पारदर्शीपणे ड्रॉ पद्धतीने आरक्षण सोडत काढण्यात आली.
आरक्षण सोडतसाठी राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सनस, अव्वर सचिव अतुल जाधव, कक्ष अधिकारी प्रदीप परब, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांची उपस्थिती होती.
सोडतीनंतर प्रारूप प्रभागरचनेची अधिसूचना २३ डिसेंबरला राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल. २३ डिसेंबर ते ४ जानेवारीपर्यंत हरकती व सूचना देता येतील. ताराबाई पार्कमधील महापालिकेच्या निवडणूक कार्यालयात सूचना व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत.
प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचे विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगाला ६ जानेवारीला सादर केले जाणार आहे.
अशी आहे कोल्हापूर महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२० आरक्षण सोडत
अनुसुचित जाती ११ प्रवर्ग पुरूष : प्रभाग क्रमांक: ७, ८, २०, ६२, ७९ पुरूष तर महिला.
अनुसूचित जाती महिला ६ प्रभाग आरक्षित : प्रभाग क्रमांक १६, १९, ३०, ४०, ६७ ,७५
नागरिकांचा मागासवर्ग – प्रवर्ग – २२ प्रभाग आरक्षित : प्रभाग क्रमांक १५,२१,२५,२६,३६,४९,५०,५२,५३,५६,५९,६४,७२,७३,८०,३८,२३,७१,१३,२२,१८,२४
नागरिकांचा मागासवर्ग – प्रवर्ग ( महिला ) ११ प्रभाग आरक्षित : प्रभाग क्रमांक १३,२४,१५,२१,३६,४९,५२,५३,५६,६४,७१
सर्वसाधारण प्रभाग २४ – प्रभाग आरक्षित प्रभाग क्रमांक:६,९,२९,३१,३३,३५,३७,४६,४७,६१,६६,६८,७४,७७,७८,४,१७,२७,४२,५४,५४,६३,७०,७६
सर्वसाधारण ( महिला ) २४ प्रभाग आरक्षित – प्रभाग क्रमांक : ४४,१,३,५,२८,३९,६०,६९,८१,११,१२,१४,३४,४३,४५,४८,५५,५७,६५,२,३२,५८,४१,१
आज झालेल्या आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर नाराजीचे सूर उमटले खऱ्या अर्थाने आता होऊ घातलेली ही कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक सर्वांसाठीच संघर्षाची आहे कारण ज्या पद्धतीने सर्वांनी निवडणुकीची तयारी केलेले आहेत त्या सर्वांवर बहुतांशी काही प्रमाणात विरजन पडल्याचे चित्र या सोडतीनंतर निर्माण झाले आहे त्यामुळे निवडणुकीत उभ्या राहणाऱ्या उमेदवारांना प्रचार तर जोरदार करावा लागणारच आहे मात्र मतदारांसमोरही नवे चेहरे असणार आहेत.