Sunday, December 22, 2024
Home ताज्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सीमावर्ती भागात ४ तपासणी नाके; २ विशेष दक्षता, १...

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सीमावर्ती भागात ४ तपासणी नाके; २ विशेष दक्षता, १ जिल्हा भरारी पथक -संध्याराणी देशमुख


कोल्हापूर, दि. १७ (जिल्हा माहिती कार्यालय): ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२०-२१ भयमुक्त व पारदर्शक वातावरणात पार पडण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने सीमावर्ती भागात ४ तपासणी नाके उभारण्यात येत आहेत. तसेच दोन विशेष दक्षता पथके, एक जिल्हा भरारी पथक कार्यरत असणार आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अतिरिक्त अधीक्षक संध्याराणी देशमुख यांनी दिली.
इतर राज्यातील बेकायदेशीर मद्याची आयात थांबविण्याकरिता कर्नाटक/ गोवा सीमावर्ती भागांमध्ये ४ तात्पुरते सीमा तपासणी नाके अंबोली फाटा, तिलारी, दाजीपूर व गगनबावडा येथे उभारण्यात येणार आहेत.
मतदारांना प्रलोभन देण्याकरिता दारूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संपूर्ण निवडणूक कालावधीमध्ये अवैध दारू निर्मिती, विक्री, वाहतूक, आयात, निर्यात, मळी, ताडी याची बेकायदेशीर विक्री होणार नाही याची दक्षता घेण्याकरिता तसेच ढाबे, रिसॉर्ट, हायवे लगतची हॉटेल, खानावळी येथे विभागाच्या परवानगीशिवाय मद्याचे व्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता २ विशेष दक्षता पथके व १ जिल्हा भरारी पथक संपूर्ण जिल्ह्यात कार्यरत राहणार आहे.
आदर्श आचारसंहिता कालावधीमध्ये सर्व मद्यविक्री अनुज्ञप्तींचे कार्यकारी अधिकारी यांच्याकडून दैनंदिन निरीक्षण केले जाणार आहे. जर कोणत्याही अनुज्ञप्तीमधून बेकायदेशीर/ परराज्य निर्मित मद्याचा साठा करून त्याची विक्री करताना तसेच विना वाहतूक पास मद्यसाठा किंवा ठोक विक्रेत्यांकडून मद्य आणून बेकायदेशिररित्या साठा करत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरूध्द तात्काळ मुंबई दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून गुन्हे नोंद केले जाणार आहेत.
आदर्श आचारसंहिता कालावधीमध्ये सर्व मद्यविक्री अनुज्ञप्तीधारकांना त्यांचे अनुज्ञप्तीकक्ष नियमानुसार विहीत वेळेत सुरू व बंद करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. विहीत वेळेपूर्वी अनुज्ञप्ती सुरू केल्यास किंवा विहीत वेळेनंतर चालू ठेवल्यास संबंधितांविरूध्द तात्काळ मुंबई दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून गुन्हे नोंद केले जाणार आहेत. सर्व मद्य निर्माणी घटक, ठोक व किरकोळ विक्री ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत.
जिल्ह्यामध्ये कोठेही अवैद्य मद्य निर्मिती, विक्री व वाहतुक होत असल्यास या विभागाच्या ८४२२००११३३ हा व्हॉट्सॲप क्रमांक व टोल फ्री क्र. १८००८३३३३३३ अथवा कोल्हापूर अधीक्षक कार्यालयाच्या दूरध्वनी ०२३१-२५४६०२५ क्रमांकावर नागरिकांनी तक्रार नोंदविण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत करण्यात येत आहे. तक्रार नोंदविणाऱ्याचे नाव संपूर्णत: गोपनीय ठेवण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments