जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींचा
सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
कोल्हापूर, दि. ११ (जिल्हा माहिती कार्यालय): एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आल्याचे उपजिल्हाधिकारी (महसूल) यांनी कळविले आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक १५ डिसेंबर २०२० (मंगळवार). नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) दि. २३ डिसेंबर २०२० (बुधवार) ते दि. ३० डिसेंबर २०२० (बुधवार) सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत (दिनांक २५,२६ व २७ डिसेंबरची सार्व. सुट्टी वगळून). नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी ) दि. ३१ डिसेंबर २०२० (गुरूवार) सकाळी ११ वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमुद केलेल्या ठिकाणी) दि. ४ जानेवारी २०२१ (सोमवार) दुपारी ३ वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ दि. ४ जानेवारी २०२१ (सोमवार) दुपारी ३ वाजल्यानंतर. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक १५ जानेवारी २०२१ (शुक्रवार) सकाळी ७.३० वाजल्यापासून ते सायं. ५.३० पर्यंत. मतमोजणीचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील) दि. १८ जानेवारी २०२१ (सोमवार). जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक २१ जानेवारी २०२१ (गुरूवार) पर्यंत राहील.