Friday, October 25, 2024
Home ताज्या ए, बी व ई वॉर्ड व सलग्नीत उपनगरात सोमवारी पाणी पुरवठा बंद...

ए, बी व ई वॉर्ड व सलग्नीत उपनगरात सोमवारी पाणी पुरवठा बंद तर मंगळवारी अपुरा व कमी दाबाने -जल अभियंता नारायण भोसले

ए, बी व ई वॉर्ड व सलग्नीत उपनगरात
सोमवारी पाणी पुरवठा बंद तर मंगळवारी अपुरा व कमी दाबाने -जल अभियंता नारायण भोसले

‍कोल्हापूर/प्रतिनिधी : शहरातील संपूर्ण ए, बी व ई वॉर्ड व त्यास सलग्नीत उपनगरे व ग्रामीण भागातील नळ कनेक्शन धारकांना सोमवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२० रोजी पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. तसेच मंगळवार दिनांक २४ नोव्हेंबर २०२० रोजी पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होणार असल्याचे जलअभियंता नारायण भोसले यांनी कळविले आहे.
महाराष्ट राज्य विद्युत पारेषण कंपनीकडून दुरुस्ती कामासाठी सोमवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२० रोजी शिंगणापूर योजनेवरील विद्युत पुरवठा बंद राहणार असल्याने शिंगणापूर योजनेवरील अवलंबून असणाऱ्या शहरातील संपूर्ण ए, बी व ई वॉर्ड व त्यास सलग्नीत उपनगरे व ग्रामीण भागातील नळ कनेक्शन धारकांना दिनांक २३ नोव्हेंबर २०२० रोजी पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. तर दिनांक २४ नोव्हेंबर २०२० रोजी पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होणार आहे.
ए,बी वॉर्ड व त्यास सलग्नीत उपनगरे, ग्रामीण भाग व शहराअंतर्गत येणा-या साळोखे नगर, कणेरकरनगर,बापुरावनगर, आयटीआय, कळंबाजेल, आपटेनगर, दत्तोबा शिंदेनगर, जीवबानाना पार्क, सुभाषनगर, दादू चौगुलेनगर,जरगनगर, रामानंदनगर, रायगड कॉलनी, संभाजीनगर, एलआयसी कॉलनी, देवकर पाणंद, साळोखे पार्क, जवाहरनगर, वायपीपोवारनगर, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, टिंबरमार्केट, गंजीमाळ, वारेवसाहत, विजयनगर इत्यादी परिसर तसेच ई वॉर्डमधील राजारामपुरी वितरण व्यवस्थेवर अवलंबून असणारा संपूर्ण परिसर, त्यामध्ये सम्राटनगर, प्रतिभानगर, सायबर चौक, राजारामपुरी, शाहुमिल, उद्यमनगर, यादवनगर,राजेंद्रनगर, टाकाळा, दौलतनगर, शाहुपुरीतील काही भाग, पाचबंगला, साईक्स एक्स्टेंनशन, कावळानाका, रुईकर कॉलनी, लिशा हॉटेल,सहयाद्री सोसायटी, कदमवाडी, राजीव गांधी वसाहत, लोणार वसाहत, शिवाजीपार्क, महाडीक वसाहत इत्यादी भागाचा समावेश आहे.
या भागातील नागरीकांना दैनंदिन पिण्याच्या पाण्याची सोय होण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेकडील उपलब्ध टँकर व्दारे पाणी वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. तरी या भागातील नागरीकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, तसेच या कालावधीत बालिंगा, बावडा व कळंबा जलशुध्दीकरण केंद्राव्दारे होणारापाणीपुरवठा नियमित असणार असलयाचेही असे जलअभियंता नारायण भोसले यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा

डी. वाय पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे...

स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील मुलींना व युवकांना ‘वेल्डींग, सीएनसी कोर्स’ व ‘अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या’ प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील मुलींना व युवकांना 'वेल्डींग, सीएनसी कोर्स' व 'अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या' प्रशिक्षणाची सुवर्णसंधी शिरोली एमआयडीसी/प्रतिनिधी : केंद्रशासना मार्फत व्यावसायिक प्रशिक्षणाच्या संधी...

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील.

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील. कोल्हापूर/प्रतिनिधी : आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे आपल्या...

गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना

‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना बायोगॅसचा दुसरा टप्पा सुरु : नवीन ४००० बायोगॅस मंजूर या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घेण्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे...

Recent Comments