Monday, May 13, 2024
Home ताज्या कोल्हापूर मध्ये हनुमान जयंती भक्तीमय वातावरणात साजरी ठिकठिकाणी प्रसादाचे वाटप

कोल्हापूर मध्ये हनुमान जयंती भक्तीमय वातावरणात साजरी ठिकठिकाणी प्रसादाचे वाटप

कोल्हापूर मध्ये हनुमान जयंती भक्तीमय वातावरणात साजरी ठिकठिकाणी प्रसादाचे वाटप

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यात आणि शहरात सर्वत्र हनुमान जयंती आज उत्साही आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. कोल्हापूर मधील राजारामपुरी, रमणमाळा, बिंदू चौक, मंगळवार पेठ, रेल्वे स्टेशन,नेहरूनगर जवाहरनगर आयसोलेशन हॉस्पिटल, मंडलिक वसाहत,सानेगुरुजी वसाहत
उभा मारुती चौकातील मारुती मंदिरामध्ये महिलांच्या हस्ते जन्मकाळ सोहळा पार पडला. शनिवार पेठेतील सोन्या मारुती चौक सेवा मंडळ तर्फे सकाळी जन्मकाळ व त्यानंतर दुपारी महाप्रसाद वाटप करण्यात आले.
गंगावेस येथील नाभिक समाजाच्या हनुमान मंदिरात जन्म काळ पूजा अभिषेक आणि शिरा वाटप करण्यात आले. साने गुरुजी वसाहती मधील तुळजाभवानी कॉलनीतील स्वराज्य टेबल ट्रस्ट कडून मारुती मंदिराजवळ महाप्रसाद वाटप करण्यात आला. सद्गुरु श्री तोडकर महाराज आश्रमात द्रोणागिरी ट्रस्टतर्फे सकाळी ६ वाजून ३१ मिनिटांनी शंख, तुतारीच्या गजरात हनुमान जन्म काळ सोहळा झाला. अभिषेक प्रवचन करण्यात आले.
विविध ठिकाणी हनुमान जयंती साजरी करण्यात आली.
सकाळच्या वेळी सर्व मंदिरात हनुमान मूर्तीस अभिषेक घालून मूर्तीची पूजा करण्यात आली. जयंतीनिमित्त शहरातील मंदिरे फुलांनी सजविण्यात आली होती. ठिकठिकाणी महाप्रसादाची वाटप करण्यात आले. येथील नेहरूनगर हॉस्पिटल परिसरामध्ये ही जयंती भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. याठिकाणी भाविकांनी हनुमान मंदिरात मूर्तीचे दर्शन घेतले आणि सायंकाळी आयोजित महाप्रसादाचा लाभ घेतला.
यासाठी आतिश घरनिया, प्रशांत डमाकले, सयाजी आळवेकर, अमर ढेरे, प्रकाश पाटील, रणवीर जायकर, किरण रणदिवे, चारुदत्त रणदिवे, आनंद अतगोडेकर, प्रशांत पोलादे, उमेश डमाकले, बाळू डमाकले, सौरभ डमाकले, धनाजी खोपडे आदींनी यासाठी परिश्रम घेतले होते.तर संतोष धोकटे यांनी महाप्रसाद केला होता ज्याचा लाभ असंख्य भाविकांनी घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

गोकुळ’ शॉपी चे कागल पंचतारांकित एमआयडीसी येथे उद्‌घाटन

कागल पंचतारांकित एमआयडीसी येथे गोकुळचे दूध व दुग्धउत्पादने उपलब्ध ‘गोकुळ’ शॉपी चे कागल पंचतारांकित एमआयडीसी येथे उद्‌घाटन कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्‍या...

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १ वाजेपर्यंत कोल्हापूर 38.42% तर हातकणंगलेत 36.17 ,% मतदान

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १ वाजेपर्यंत कोल्हापूर 38.42% तर हातकणंगलेत 36.17 ,% मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत ४७ कोल्हापूर आणि ४८...

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी मतदान करण्यास चुरशीने सुरुवात

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी मतदान करण्यास चुरशीने सुरुवात कोल्हापूर/प्रतिनिधी : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत ४७ कोल्हापूर आणि ४८ हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी आज मंगळवार,...

१०२ वर्षाचे आजोबा बाबासो राजाराम यादव यांनी शिरोलीत केले मतदान

१०२ वर्षाचे आजोबा बाबासो राजाराम यादव यांनी शिरोलीत केले मतदान शिरोली/प्रतिनिधी : आज सात मे रोजी मतदाना कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाची प्रक्रिया सुरू...

Recent Comments