Tuesday, July 1, 2025
spot_img
Home Blog Page 321

महापालिकेच्या यशवंतराव विद्यामंदिराचा ऑनलाईन शिक्षणाचा यशस्वी प्रयोग

0

महापालिकेच्या यशवंतराव विद्यामंदिराचा ऑनलाईन शिक्षणाचा यशस्वी प्रयोग

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महापालिकेच्या यशवंतराव विद्यामंदिरातील शिक्षकांनी विध्यार्थ्याबरोबर गुगल मीट, वेबेक्स सारख्या माध्यमातून संवाद साधून ऑनलाईन शिक्षणाचा प्रयोग यशस्वी केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून ‘शाळा बंद शिक्षण सुरु ही मोहिम कोल्हापूर महापालिकेच्या शिक्षण समितीने यशस्वीपणे राबविली. याचाच एक भाग म्हणून महानगरपालिकेच्या यशवंतराव विद्यामंदिरात ऑनलाईन शिक्षणावर भर देऊन शिक्षणाचा पाया घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे विध्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून महापालिकेच्या पहिली ते सातवीचे अध्यापन करणारे शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणात सक्रीय पुढाकार घेतला. शासनाने तयार केलेल्या शैक्षणिक दिनदर्शिकेच्या आधारे अभ्यासाचे महिनानिहाय नियोजन करुन विध्यार्थ्यांचा अभ्यास घेऊन नियोजनानुसार अभ्यासक्रम पूर्ण केला. विध्यार्थ्यांची ऑनलाईन शिक्षणाला उपस्थिती वाढावी यासाठी आनलाईन चित्रकला, भाषण, निबंध, हस्तकला इत्यादी स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न केला.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या शिक्षकांनी तयार केलेल्या विविध व्हिडीओचा प्रभावी वापर करुन अध्यापन झालेल्या घटकावर आनलाईन टेस्टही घेतली जाते. यासाठी विविध ॲप, पीडीफ यांचा उपयोग केला जातो. शाळेचे मुख्याध्यापक सुनील गणबावले हे दर आठवड्यालाआनलाईनअध्यापना संदर्भात अढावा घेऊन मार्गदर्शन करतात. शाळेतील सर्व शिक्षक कोरोना योद्धा म्हणून काम करत असून सुद्धा विध्यार्थ्याच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून शिक्षक प्रयत्न करत आहेत.
नूतन महापालिका आयुक्त डॉ कादंबरी बलकवडे, शिक्षण सभापती श्रावण फडतारे, प्रथमिक शिक्षण प्रशासनाधिकारी एस.के. यादव आणि शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी यांच्या प्रेरणेतून ऑनलाईन शिक्षणाचा उपक्रम अखंडपणे सुरु राहावा यासाठी मुख्याध्यापक सुनील गणबावले, शिक्षक संजयकुमार देसाई, सुनील रावते, निलेश पोवार, सदाशिव पोवार, सौ वैशाली पाटील, सौ निर्मला ठाणगे, सौ सुजाता पोवार प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत. करत आहेत. ऑनलाईन शिक्षणाचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी शिक्षकाबरोबरच पालक आणि विद्यार्थ्यांचे मोठे योगदान आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात १८ विशेष पथके तैनात -आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे-महापौर सौ.निलोफर आजरेकर

0

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर
शहरात १८ विशेष पथके तैनात -आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे-महापौर सौ.निलोफर आजरेकर

कोल्हापूर/प्रतिनिधी : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात होणारी गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी महापालिकेच्यावतीने १८ विशेष पथके तैनात केली असून या पथकामार्फत गर्दी नियंत्रित करण्याबरेाबरच कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची कठोरपणे अंमलबजावणी केली जाणार असल्याचे आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी स्पष्ट केले.
कोरोना कमी झाला असला तरी धोका टळलेला नसल्याचे स्पष्ट करुन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात दिवाळी सणानिमित्त होणारी गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज आणि सतर्क असून शहरातील महत्वाची १८ ठिकाणे निश्वित करुन १८ विशेष पथके तैनात केली असून यासाठी १०८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक पथकामध्ये ६ कर्मचारी असून ही पथके सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत गर्दी नियंत्रित करणे आणि कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची कठोरपणे अंमलबजवणी करतील.
महापालिकेच्यावतीने शहरात नियुक्त करण्यात आलेली १८ ठिकाणे आणि त्याच्या फिरतीचे मार्ग पुढीलप्रमाणे आहे.
बिंदू चौक > बिंदू चौक,भवाजी मंडप-जल-शिवाजी चौक-लुगडी ओळ- लक्ष्मीपुरी मार्केट ते बिदू चौक- मिरजकर तिकटी > मिरजकर तिकटी- शिंगोशी मार्केट –महाराणी ताराबाई विद्यालय (फुलांचा बाजार)- नंगीवाली चौक-रेसकोर्स नाका-खरी कॉर्नर ते मिरजकर तिकटी.
जुना वाशीनाका > राजकपुर पुतळा- देवकर पाणंद-सानेगुरुजी वसाहत –आपटेनगर पाण्याची टाकी. आरकेनगर- जरगनगर-आरकेनगर-पाचगांव- आयटीआय-सुभाषनगर चौक-ध्यानचंद हॉकी स्टेडियम परिसर. पापाची तिकटी, जावळाचा गणपती- पाडळकर मार्केट- भाजी मार्केट-शुक्रवार पेठ- जोशी गल्ली-मनपा परिसर-पान लाईन ते पापाची तिकटी.
बिनखांबी गणेश मंदिर – महाव्दार रोड-अर्धा शिवाजी पुतळा-उभा मारुती चौक-ताराबाई रोड-श्री अंबाबाई – महालक्ष्मी मंदिर ते पापाची तिकटी. लक्ष्मीपुरी – महाराना प्रताप चौक- लक्ष्मीपुरी-कोंडा ओळ-उषा टॉकीज- दसरा चौक-आयोद्या टॉकीज. व्हीनस कॉर्नर – उषा टॉकीज-स्टेशन रोड-एसटी स्टँन्ड परिसर- ताराराणी चौक परिसर-ताराबाई पार्क परिसर-न्यू शाहुपुरी परिसर.
उमा टॉकीज – कॉमर्स कॉलेज- उमा टॉकीज- पार्वती टॉकीज-उद्यमनगर परिसर- गोखले कॉलेज. गोखले कॉलेज – हुतात्मा पार्क – वायपी पोवार नगर-माऊली चौक परिसर-जवाहर नगर परिसर. रंकाळा टॉवर – जुनावाशी नाका- जाऊळाची गणपती-खांडसरी-लक्षतीर्थ वसाहत-फुलेवाडी परिसर. राजारामपुरी – रेल्वे फाटक- जनता बाजार चौक-राजारामपुरी (सर्व गल्या जाता-येता वसरुटसह) सायबर परिसर-शाहुमिल.
जिल्हाधिकारी कार्यालय – जिल्हा परिषद-आरटीओ ऑफिस व परिसर- एमएसईबी-विवेकानंद कॉलेज परिसर . लाईन बाजार – जिल्हा न्यायालय-डॉ.डी.वाय.पाटील मेडीकल कॉलेज- भगवा चौक परिसर-फायर ब्रिगेड ऑफिस परिसर- शुगरमील फाटा.
कदमवाडी – सदर बाजार- भोसलेवाडी- कदमवाडी- लिशा हॉटेल परिसर. शाहुपूरी – शहुपुरी सर्व परिसर- बागल चौक- कुंभार गल्ली. मॉर्निंग वॉक – रंकाळा परिसर- शिवाजी विद्यापीठ- हॉकी स्टेडियम- आयटीआय – सानेगुरुजी वसाहन ते जिवबानाना पार्क- कळंबा.
मॉर्निंग वॉक – महावीर कॉलेज- डीएसपी ऑफीस- महावीर गार्डन- धैर्यप्रसाद हॉल- सर्कीट होऊस – नानानानी पार्क असा निश्चित केला आहे.
तरी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपायोजनांचे काटेकोरपणे पालन करुन कोरोना नियंत्रणासाठी महापालिकेस सहकार्य करावे, यामध्ये नागरिकांनी नेहमी मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सामाजिक अंतराचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, बाजारपेठात गर्दी करु नये शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहनही महापौर सौ. निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

गडहिंग्लज राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय गोरगरिबांना दिलासा देणारे केंद्र ठरेल-ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास 

0

गडहिंग्लज राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय गोरगरिबांना दिलासा देणारे केंद्र ठरेल-ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास 

 

गडहिंग्लज/प्रतिनिधी : गडहिंग्लज मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय गोरगरिबांना दिलासा देणारे केंद्र ठरेल, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या कार्यालयाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेच्या समस्या सुटाव्यात, हीच आपली भावना असल्याचे ते म्हणाले.                             गडहिग्लज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे स्थलांतर दसऱ्यानिमित्त नूतन इमारतीत झाले. या कार्यालयाला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सदिच्छा भेट दिली.यावेळी मंत्री श्री.  मुश्रीफ पुढे म्हणाले, गडहिंग्लज शहरात स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्यापासून पक्षाचे कार्यालय सुरू होते. परंतु; ती जागा अपुरी पडू लागल्यामुळे या नवीन इमारतीत कार्यालय स्थलांतरित केले.

यावेळी उदयराव जोशी, जिल्हापरिषद उपाध्यक्ष सतिश पाटिल, माजी उपनगराध्यक्ष किरण कदम, नगरसेवक हरुण सय्यद, कार्याध्यक्ष डाॕ. किरण खोराटे, माजी नगराध्यक्ष वसंतराव यमगेकर, जिल्हा उपाध्यक्ष राजू पाटील, नवाब मालदार, अरविंद बारदेस्कर, दास सर, अशपाक मकानदार, प्रशात शिंदे,नगरसेवक शुभदा पाटील, सौ रेश्मा कांबळे, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष उज्वला कुंभार, सुनिता नाईक, शारदा आजरी, सुनिल चौगुले, युवक शहर अध्यक्ष गुंडू पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष  महेश सलवादे,अर्बन बँक अध्यक्ष बाळासाहेब  घुगरी,अल्फसंख्याक शहर अध्यक्ष राजू जमादार, उदय परीट, मुरली कांबळे, राहूल शिरकोळे, तुषार यमगेकर, शिवराज पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते

मेटाचा मार्ग झोपडपट्टीतील अपघातग्रस्ताना हसन मूश्रीफ फौंडेशन तर्फे आर्थिक मदत.

0

मेटाचा मार्ग झोपडपट्टीतील अपघातग्रस्ताना हसन मूश्रीफ फौंडेशन तर्फे आर्थिक मदत.

कोल्हापूर/प्रतिनिधी : गडहिंग्लज शहर व परिसरात मध्यंतरी झालेल्या वळीवाच्या पावसात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड हद्दीत उच्च दाबाची विद्युत वाहिनी
तुटून खाली पडल्यामुळे त्या ठिकाणी खेळत आसणारा कू. बसवराज दत्ता जाधव वय 10 वर्षे हा त्या वाहिनीच्या संपर्कातून जागीच मृत्यू झाला होता तर हूल्यापा लक्ष्मण बहूरूपी याच्या झोपडी घरावर पडलेल्या झाडामूळे घराचे नूकसान झालेले होते याची कल्पना दानिविप संघटनेचे अध्यक्ष श्री रमजानभाई अत्तार यांनी नगरविकास मंत्री मा.ना.हसन मूश्रीफ साहेब यांना दिलेली होती. मंत्री हसन मूश्रीफ साहेब हे तात्काळ या ठिकाणी स्वतः झोपडपट्टीत जाऊन या दोन्ही कूटूंबाचे सांत्वन केले होते.
आज दसर्याच्या मुहूर्तावर नविन जागेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचे स्थलांतर व उद्घाघटन हसन मूश्रीफ फौंडेशनचे अध्यक्ष मा.श्री. नविद मूश्रीफ साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या दोन्ही कूटूंबाना सौ.महादेवी जाधव व हूल्यापा सूर्यवंशी यांना हसन मूश्रीफ फौंडेशन तर्फे श्री. नविद मूश्रीफ साहेबांच्या हस्ते आर्थिक मदतीचा त्यांचे नावे धनादेश देण्यात आले.
यावेळी जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष सतिश पाटील, उदयराव जोशी, शहर अध्यक्ष सिध्दार्थ बन्ने, वसंतराव यमगेकर, नगरसेविका सौ.साविञी पाटील, सौ.रेश्मा कांबळे, सौ रुपाली परीट, माजी नगराध्यक्षा सौ लक्ष्मी घुगरी, सौ.सुरेखा कांबळे, श्रीमती शारदा आजरी, अल्फसंख्याक शहर अध्यक्ष राजू जमादार, नगरसेवक हारुण सय्यद, आशपाक सर, युवक शहर अध्यक्ष गुडू पाटील, जिल्हाउपाध्यक्ष युवक महेश सलवादे, रश्मिराज देसाई, अमर मांगले, सुनिल चौगुले, शिवराज पाटिल, तुषार येमगेकर, उदय परीट, संतोष कांबळे, आण्णासाहेब देवगोंडा, प्रशात शिंदे, राहूल शिरकोळे, पटेल सर, चितामणी वाली, शितल माणगावे, नवाब मालदार, अक्रम जमादार, डाॕ सिंकदर जमादार, आरीफ तांबोळे, चंद्रकात मेवेकरी, राजू खलिफा, इकबाल शाइन्नावर, महादेव कुंभार, दिलीप उपराटे, अनिल गुरव, विजय बनगे, महेश गाडवी, अरुण तेंलग, एल.डी.पोवार, अदित्य पाटील, आंनदा पोवार, एस आर पाटील, तानाजी मोहिते, विजय मोहिते, पुथ्वीराज पाटील, विजय पाटील, संभाजी पाटील, सुदेश चौगुले, के बी पोवार, नेताजी पाटील, बंटी पाटील, संग्राम पाटील, शहाजी पाटील, बाळू मुल्लाणी, आनदा पाटील, राम पाटील, शामराव जगताप, अवधुत रोटे, विजय पाटील, स्वनिल गायकवाड, सचिन पोवार, अनिल जाधव, तानाजी राणगे, सखाराम खोत व प्रमुख कार्यकर्त्ये उपस्थित होते.

हसूर बुद्रुक ग्रामस्थांच्यावतीने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार

0

 

हसूर बुद्रुक ग्रामस्थांच्यावतीने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार

कागल/प्रतिनिधी : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्याने अखेर हसूर बुद्रुक ते बोळावी या वनविभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रश्न मिटला आहे. वन विभागाने हा रस्ता खडीकरणासह, रुंदीकरण व डांबरीकरण करण्यास परवानगी दिली आहे. याबद्दल पाठपुरावा करणारे मंत्री श्री. मुश्रीफ यांचा सत्कार आज हसूर बुद्रुक येथील सरपंच दिग्विजय पाटील, उपसरपंच मनोज वास्कर,  गिरीष कुलकर्णी या प्रमुखांसह ग्रामस्थांनी केला.             यावेळी सूर्यकांत शिंदे, शामराव केसरकर, दत्तात्रय हजारे, मधुकर चावरे,केदार देशपांडे, भिकाजी बोटे,माजी सरपंच ज्ञानदेव जाधव, पुरुषोत्तम साळुंखे, अशोक कांबळे, पसू भोसले, शिवाजी दत्तू भोसले, शंकर तिप्पे, नारायण रेडेकर, शामराव तिप्पे, बळवंत बोरे, बजरंग जाधव, शशिकांत बोटे आदी मान्यवर उपस्थित होते

बामणी येथे ३ कोटी ५७ लाख रुपयाचे विविध विकास कामाच्या प्रारंभ

0

बामणी येथे ३ कोटी ५७ लाख रुपयाचे विविध विकास कामाच्या प्रारंभ

कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. श्री. नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या फंडातून बामणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ३ कोटी ५७ लाख रुपयाचे विविध विकास कामाचे उद्घाटन संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री नविद मुश्रीफ साहेब व जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या बाबा माने यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी १४ व्या वित्त आयोगातून कचरा कुंडी प्रत्येक घरी वाटपाचे प्राथमिक स्वरुपात वाटप करण्यात आले.
यामध्ये राष्ट्रीय पेयजल योजना १ कोटी १६ लाख, गाव तलाव सुशोभीकरण ८४ लाख, हायमास्ट दिवे ३ लाख, बामणी फाटा ते हनुमान मंदिर मानीची पाणंद ६४ लाख, बामणी गावातील रस्ते १० लाख, पठार पाणंद रस्ता करणे १० लाख, अंतर्गत रस्ता करणे १० लाख, विठ्ठल मंदिर हॉल १५ लाख, गहिनीनाथ मंदिर हॉल व पेव्हींग ब्लॉक १० लाख, स्मशानभूमी शवदाहीनी व सुशोभीकरण १० लाख, मागासवर्गीय वस्ती गटर्स करणे ५ लाख, मागासवर्गीय वस्ती समाजमंदिर सुधारणा ५ लाख, बामणी मागासवर्गीय वस्ती रस्ते खडीकरण, डांबरीकरण १५ लाख अश्या विविध विकास कामाचा आज शुभारंभ झाला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज भाऊ फराकटे, दत्ता पाटील केनवडेकर, कृष्णात मेटील, सरपंच रावसाहेब बाळू पाटील, उपसरपंच सुनील मगदूम, शिवाजी मगदूम, शिवाजी राजाराम मगदूम, बुवासाहेब, युवराज पाटील, पी आर पाटील, एम डी पाटील, राजाराम चौगुले, पुंडलिक बापू, युवराज कोईगडे, मेजर चंद्रकांत पाटील, यशवंत गोविंद मगदूम, भाऊसाहेब पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपा महिला मोर्चाच्यावतीने नवदुर्गांचा सन्मान

0

भाजपा महिला मोर्चाच्यावतीने नवदुर्गांचा सन्मान

कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महिला मोर्चाच्यावतीने नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणा-या ९ महिलांना भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा सौ उमाताई खापरे यांच्या हस्ते नवदुर्गा पुरस्काराचे सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा, कोल्हापूर महिला मोर्चा प्रभारी सौ सुवर्णा पाटील, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा ज्योती जाधव, पिंपरी चिंचवड महिला पदाधिकारी सौ संजीवनी पांडे, सातारा जिल्हा उपाध्यक्षा सौ निर्मला पाटील, भाजपा महीला मोर्चा कोल्हापूर अध्यक्षागायत्री राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा सौ उमाताई खापरे यांचे पुस्तक भेट देऊन स्वागत केले व नवदुर्गा पुरस्कार प्राप्त महिलांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.प्रास्ताविक करताना भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गायत्री राउत यांनी कोल्हापूर महिला मोर्चाच्या कार्याचा आढावा देत आजच्या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. कोल्हापूरात आदिशक्तीचा जागर सुरु असताना अशा कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करणे भाग्याची गोष्ट असल्याचे नमूद केले.
याप्रसंगी बोतलाना भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा सौ उमाताई खापरे म्हणाल्या, आजची महिला ही समाजामध्ये आपले कर्तुत्व दाखवून उल्लेखनीय कामगिरी करत आहे. कोरोनासारख्या गंभीर परिस्थिती मध्ये महिलांनी आपले काम पार पाडत कठीण प्रसंगी आपली भूमिका सक्षमपणे निभावली आहे. या नवरात्रोत्सवाच्या निमित्याने यावेळी प्रदेश महिला मोर्चाच्यावतीने डॉक्टर, वकील, अंगणवाडी सेविका, बचत गट चालवणा-या महिला यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या महिलांचा सन्मान करण्याचे आयोजन केले असल्याचे नमूद केले. करवीर नगरीत यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात नवरात्रोत्सव साजरा होऊ शकत नाही परंतु या पुरस्कारांच्या माध्यमातून महिलांच्या रूपाने नवदुर्गांचा सन्मान होत असल्याचे नमूद केले. महिलांवरील वाढते अत्याचार लक्षात घेता समाजामध्ये प्रबोधन करणे गरजेचे असून यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. महिलांचे प्रश्न सोडवण्याकरीता प्रत्येक जिल्ह्यामध्ये विविध प्रकोष्ठ तयार करणार असून यामाध्यमातून विविध क्षेत्रातील काम करणा-या महिलांचे समाजहितासाठी उपयुक्त असे संघटन करणार असल्याचे नमूद केले.
यांनतर मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
भाजपा महिला आघाडीच्यावतीने सत्कार झालेल्या महिलांची नावे पुढील प्रमाणे : सौ सुनिता काळे (योग प्रशिक्षिका) अॅड.चारूलता चव्हाण, कु.ऐश्वर्या मुनीश्वर (सामाजिक कार्यकर्त्या) डॉ.चैताली कांबळे (अॅपल हॉस्पीटल कर्करोग तज्ञ) डॉ.प्रतिभा खरे, डॉ.मीना खंडेलवाल, डॉ.सुनिता देसाई, डॉ.श्रुती निप्पाणीकर (एम.डी.आयुर्वेद) सौ दिना चौगुले (AWS संभाजीनगर आगार) यांना मान्यवरांच्या हस्ते नवदुर्गा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमा प्रसंगी डॉ.सुनिता देसाई यांनी महिलांना प्रोत्साहन देणारी कविता  सादर केली. त्याचबरोबर ७४ वर्षाच्या डॉ.प्रतिभा खरे यांनी आपल्या जीवनातील विविध प्रेरणादायी अनुभव सांगत महिलांनी आपले छंद जोपासण्याचे आवाहन केले. अॅपल हॉस्पीटलच्या डॉ.चैताली कांबळे यांनी ब्रेस्ट कॅन्सर विषयी महिलांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जाधव यांनी केले. याप्रसंगी भारती जोशी, सुलभा मुजूमदार, रजनी भुर्के, प्रमोदिनी हार्डीकर, विद्या बनछोडे, विद्या म्हमाणे, आसावरी जुगदार, मंगला निप्पाणीकर, सुनीता सूर्यवंशी, स्वाती कदम, वैशाली पोतदार, कार्तिकी सातपुते, विजयमाला जाधव, शोभा कोळी, लता बर्गे, शुभांगी चितारी, राधिका कुलकर्णी, कविता पाटील, श्वेता कुलकर्णी आदींसह भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

शारदीय नवरात्रोत्सवाच्या नवव्या दिवशी विजया दशमीला करवीर निवासिनी श्री आई अंबाबाई देवीची अश्वारूढ स्वरुपामध्ये अलंकार पुजा

0

शारदीय नवरात्रोत्सवाच्या नवव्या दिवशी विजया दशमीला करवीर निवासिनी श्री आई अंबाबाई देवीची अश्वारूढ स्वरुपामध्ये अलंकार पुजा

कोल्हापूर/प्रतिनिधी : साडे तीन शक्ती पीठांपैकी एक अश्या दक्षिण काशी असणाऱ्या कोल्हापुरात शारदीय नवरात्रोत्सव दरम्यान उत्सवाच्या नवव्या दिवशी विजया दशमीला करवीर निवासिनी श्री आई अंबाबाई देवीची अश्वारूढ स्वरुपामध्ये अलंकार पुजा बांधण्यात आली आहे.ही पूजा माधव व मकरंद मुनींश्वर यांनी बांधली आहे.

पालकमंत्री सतेज पाटील यांचा कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघाच्या वतीने सत्कार

0

पालकमंत्री सतेज पाटील यांचा कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघाच्या वतीने सत्कार

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना शासनाने सातवा वेतन आयोग लागू केल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे गृह राज्यमंत्री नामदार सतेज पाटील यांचा कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघाच्या वतीने आज सत्कार करण्यात आला.
महापालिकेच्या रोजदारी कामगारांना कायम करण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू, आशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी दिली.
महानगरपालिका कर्मचारी संघाच्या वतीने अजिंक्यतारा येथे आज पालकमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी महापालिकेचे काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले, जनरल सेक्रेटरी दिनकर आवळे ,उपाध्यक्ष काका चरापले, कार्याध्यक्ष विजय वनकुद्रे, सहसचिव अजित तिवले यांच्यासह कर्मचारी संघाच्या कार्यकारणीचे सर्व सदस्य, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वच्छता मोहिमेत आपट्याची झाडे लावून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश, आयुक्तांनी केली यल्लमा मंदिर परिसरात स्वच्छता

0

स्वच्छता मोहिमेत आपट्याची झाडे लावून
दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश,
आयुक्तांनी केली यल्लमा मंदिर परिसरात स्वच्छता

कोल्हापूर /प्रतिनिधी : चला हिरवं सोनं वाचवूया : सर्वांनी सोन्यासारखं राहूया ! हा पर्यावरण रक्षणाचा आणि हिवरायीचा संदेश देत आजच्या 78 व्या स्वच्छता मोहिमेत यल्लमा मंदिर परिसर तसेच जयंतीनाला परिसरात आपटा आणि कांचन वृक्षाची झाडे लावून विजयादशमी दसरा साजरा करण्यात आला.
महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या महास्वच्छता अभियानात वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणावर खऱ्या अर्थाने भर देण्यात आला. आज स्वरा फौंडेशन आणि वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशनच्यावतीने विजयादशमी दसऱ्यानिमित्ताने जुन्या रूढी परंपरांना फाटा देत नव्या पर्यावरण पूरक विचारांना उभारी देण्यासाठी तसेच चुकीच्या व घातक प्रवृत्तीचे सीमोल्लंघन करण्यासाठी झाडांची पाने न तोडता यल्लमा मंदिर परिसर,जयंतीनाला तसेच शहर ट्राफिक ऑफिस ते खानविलकर पेट्रोल पंप रोडवर आपटा आणि कांचन वृक्षाची प्रत्यक्षात झाडे लावून पर्यावरणपूरक विजयादशमी दसरा साजरा करण्यात आला.
यावेळी स्वरा फौंडेशनमार्फत यल्लमा मंदिर परिसर तसेच जयंतीनाला परिसरात ४० आपट्याची झाडे लावण्यात आली. तसेच वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन संस्थेमार्फत शहर ट्राफिक ऑफिस ते खानविलकर पेट्रोल पंप रोडवर आपटा, कांचन वृक्ष लावण्यात आले.
आजच्या ७८ व्या स्वच्छता मोहिमेत आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी यलम्मा मंदिर परिसर तसेच जयंती नाला परिसरात हातात झाडू घेऊन प्रत्यक्षपणे स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. आजच्या स्वच्छता मोहिमेत यलाम्मामंदिर परिसर, जयंती नाला, दसरा चौक, अंबाई टँक परिसर, महावीर कॉलेज ते पोलीस अधिक्षक कार्यालय रोड, तसेच कावळा नाका ते तावडे हॉटेल रोडवरील कचरा व प्लास्टिक गोळा करण्याबरोबरच झाडे, झुडपे आणि कचरा काढून परिसर स्वच्छ आणि नेटका बनविला. यामुळे स्वच्छतेबरोबरच पर्यावरण संवर्धनाच्या कामासही गती मिळाली.
कोल्हापूर महानगरपालिका आणि विविध सेवाभावी-स्वयंसेवी संस्‍थांच्या सहकार्याने राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत २ टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आले. आजच्या स्वच्छता मोहिमेत २ पाण्याचे टँकर, १ औषध फवारणी टँकर, ३ आर.सी.गार्ड, ६ डंपरचा वापर करण्यात आला. तसेच महापालिकेच्या स्वच्छता कर्मचा-यांच्या सहाय्याने तसेच शहरातील विविध सेवाभावी-स्वयंसेवी संस्‍थांच्या सहकार्याने मोहिम राबविण्यात आली.
आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी यलम्मा मंदिर परिसरात स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन या मोहिमेला बळ दिलं. तसेच या परिसरातील नागरिकांना कोल्हापूर शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी योगदान देण्याचे आवाहनही केले. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग नियंत्रणासाठीच्या प्रतिबंधक उपायोजनांची माहिती दिली. कोरोना कमी झाला असला तरी धोका टळलेला नसल्याने नागरिकांनी नियमितपणे मास्क वापरण्याबरोबरच सामाजिक अंतर पाळावे, साबनाने वारंवार हात धुवावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, गर्दी टाळावी तसेच कोरोनाची लक्षणे दिसताच तपासणी करुन घ्यावी, असे आवाहनही डॉ. बलकवडे यांनी केले.
महानगरपालिका तसेच स्वरा फौंडेशनच्यावतीने यल्लमा मंदिर येथे बी वार्ड कर्मचाऱ्यांनी राबवलेल्या स्वछता अभियानात आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासह नगरसेविका सौ. अश्विनी बारामते, आरोग्यधिकारी डॉ अशोक पोळ, उपशहर अभियंता एन.एस.पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पोवार, स्वरा फौंडेशनचे प्रमोद माजगावकर, स्वच्छता दूत अमित देशपांडे तसेच महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोलकर, सुशांत कवडे, श्रीराज होळकर, स्वरा फौंडेशनचे उपाध्यक्ष पियुष हुलस्वार, सन्मेश कांबळे, धर्मराज पाडळकर, आदित्य पाटील, मानसी कांबळे, फैजान देसाई, सुफीयन शेख आदिजण उपस्थित होते.
वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन संस्थेमार्फत आज शहर ट्राफिक ऑफिस ते खानविलकर पेट्रोल पंप रोडवर आपटा, कांचन वृक्ष लावण्यात आली. यावेळी वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्ढ़े, सतीश कोरडे, रोहन बेवीनकट्टी, विजय जाधव, सौ सविता साळुंखे, साजिद शेख, अनुज वागरे, प्रसाद भोपळे, परितोष उरकुडे, अक्षय कांबळे, शैलेश टिकार, तात्या गोवावाला,सागर कुरबेट्टी, उदयसिंह जाधव, प्रवीण मगदूम आदिंनी सहभाग घेतला. यावेळी जयंती पपिंग स्टेशन येथे जयंती उद्यान सकारण्याच्या दृष्टीने वाढलेले गवत, तण काढून स्वछता करण्यात आली, नंतर जयंती नदीच्या काठावर महापालिकेच्या ड्रेनेज व पाणीपुरवठा अभियंत्यांच्या हस्ते आपटा झाडाचे वृक्षरोपण करण्यात आले.आजच्या मोहिमेत महापालिकेचे सर्वच आरोग्य निरिक्षक,कर्मचारी तसेच विविध सेवाभावी-स्वयंसेवी संस्‍थांचे पदाधिकारी आणि नागरिकही सहभागी झाले.