बामणी येथे ३ कोटी ५७ लाख रुपयाचे विविध विकास कामाच्या प्रारंभ
कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. श्री. नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या फंडातून बामणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ३ कोटी ५७ लाख रुपयाचे विविध विकास कामाचे उद्घाटन संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री नविद मुश्रीफ साहेब व जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या बाबा माने यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी १४ व्या वित्त आयोगातून कचरा कुंडी प्रत्येक घरी वाटपाचे प्राथमिक स्वरुपात वाटप करण्यात आले.
यामध्ये राष्ट्रीय पेयजल योजना १ कोटी १६ लाख, गाव तलाव सुशोभीकरण ८४ लाख, हायमास्ट दिवे ३ लाख, बामणी फाटा ते हनुमान मंदिर मानीची पाणंद ६४ लाख, बामणी गावातील रस्ते १० लाख, पठार पाणंद रस्ता करणे १० लाख, अंतर्गत रस्ता करणे १० लाख, विठ्ठल मंदिर हॉल १५ लाख, गहिनीनाथ मंदिर हॉल व पेव्हींग ब्लॉक १० लाख, स्मशानभूमी शवदाहीनी व सुशोभीकरण १० लाख, मागासवर्गीय वस्ती गटर्स करणे ५ लाख, मागासवर्गीय वस्ती समाजमंदिर सुधारणा ५ लाख, बामणी मागासवर्गीय वस्ती रस्ते खडीकरण, डांबरीकरण १५ लाख अश्या विविध विकास कामाचा आज शुभारंभ झाला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज भाऊ फराकटे, दत्ता पाटील केनवडेकर, कृष्णात मेटील, सरपंच रावसाहेब बाळू पाटील, उपसरपंच सुनील मगदूम, शिवाजी मगदूम, शिवाजी राजाराम मगदूम, बुवासाहेब, युवराज पाटील, पी आर पाटील, एम डी पाटील, राजाराम चौगुले, पुंडलिक बापू, युवराज कोईगडे, मेजर चंद्रकांत पाटील, यशवंत गोविंद मगदूम, भाऊसाहेब पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.