प्रा.डॉ.मंजिरी मोरे यांचा ‘अँकॅडेमिक लीडरशिप अवॉर्डने सन्मान
कोल्हापूर /प्रतिनिधी : कोल्हापूर येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासन अधिकारी प्रा. डॉ.मंजिरी अजित मोरे यांना इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनतर्फे अँकॅडमी लिडरशिप अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. थायलंड येथे के.यु.होम कासेटमार्ट युनिव्हर्सिटीमध्ये पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाला.
प्रा.मंजिरी मोरे यांच्याकडे गोखले महाविद्यालयातील प्राणी शास्त्र विभागप्रमुख पदाची जबाबदारी आहे. त्यांनी एम.एससी (प्राणिशास्त्र),व पीएचडी पदवी शिवाजी विद्यापिठातुन तर, डिलीट ही पदवी युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ अमेरिकेमधून विशेष श्रेणीसह संपादन केली आहे.
त्यांचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधनपर लेख सादर झाले आहेत. शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक प्राचार्य एम.आर. देसाई यांच्या त्या नात असून त्यांचा शैक्षणिक वारसा प्रा. मोरे यांनी जोपासला आहे.या मंडळाचे सेक्रेटरी प्रा. जयकुमार देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली त्या सध्या महाविद्यालयात कार्यरत आहेत.