तिसऱ्या दिवशी सुर्याची किरणे महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या पोहोचली कमरेपर्यंत
कोल्हापूर/प्रतिनिधी : आज किरणोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सुर्याची किरणे महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या कमरेपर्यंत पोहोचली.देवी अंबाबाईचा किरणोत्सव हा करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई चा अनोखा सोहळा सूर्यास्तापूर्वी काही क्षण सूर्याची सोनेरी किरणे पहिल्या दिवशी आईच्या चरणावर दुसऱ्या दिवशी छातीवर आणि तिसऱ्या दिवशी मुखकमलावर स्पर्श करतात.साधारण दिडशे मीटर हून अधिक अंतर कापून ही किरणे महाद्वार कमानीतून येणारी ही किरणं गरुड मंडप गणेश मंडप मध्य मंडप अंतराल मंडप गर्भागार अशा रस्त्याने देवीच्या भेटीला येतात तेव्हा मंदिरातले सर्व विद्युत दिवे बंद केले जातात या सोनेरी किरणांच्या प्रकाशात जगदंबेचं दुर्गा सप्तशती च्या प्राधानिक रहस्यात दिलेलं तप्तकांचन वर्णभा अर्थात तापलेल्या सोन्याच्या रंगाची हे वर्णन सार्थ ठरते . या किरणांचा स्पर्श होताच मोठा घंटानाद करून सहावी आरती केली जाते .गेली कित्येक शतके अव्याहत सुरू असलेला सुंदर व अलौकिक उत्सव . आज दि.१० नोव्हेंबर २०२० रोजी सुर्याची किरणे देवीच्या कमरेपर्यंत जावून डाव्याबाजूस लुप्त झाली.