जागतिक क्रमवारी मध्ये केआयटी चे ४० प्राध्यापक
एडी सायंटिफिक इंडेक्सची २०२३ ची क्रमवारी घोषित
कोल्हापूर/प्रतिनिधी : एडी सायंटिफिक इंडेक्स ही जर्नल्स आणि युनिव्हर्सिटीचे मूल्यमापन करणार्या इतर सिस्टम्सच्या विपरीत, वैज्ञानिक कामगिरी आणि वैयक्तिक शास्त्रज्ञांच्या वैज्ञानिक उत्पादकतेच्या अतिरिक्त मूल्यावर आधारित रँकिंग आणि विश्लेषण प्रणाली आहे. एकूण नऊ पॅरामीटर्स वापरून, ” एडी सायंटिफिक इंडेक्स” ११ विषयांमध्ये (कृषी आणि वनीकरण, कला, डिझाइन आणि आर्किटेक्चर, व्यवसाय आणि व्यवस्थापन, अर्थशास्त्र आणि अर्थमिती, शिक्षण, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, इतिहास, तत्त्वज्ञान,) शास्त्रज्ञांची क्रमवारी दर्शविते. एडी सायंटिफिक इंडेक्स “वर्ल्ड सायंटिस्ट आणि युनिव्हर्सिटी रँकिंग्स” मध्ये एक अनोखी कार्यपद्धती आहे ज्यामध्ये तुमच्यासाठी, तुमची संस्था, तुमचा देश आणि तुमच्या विषयासाठी सर्वात उपयुक्त शैक्षणिक विश्लेषण समाविष्ट आहे.
कोल्हापूर येथील केआयटी अभियांत्रिकी स्वायत्त महाविद्यालयातील ४० प्राध्यापकांना ए.डी. सायंटिफिक इंडेक्स च्या २०२३ च्या जागतिक क्रमवारीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत.सदर प्राध्यापकांची विभागश: यादी खालील प्रमाणे मेकॅनिकल विभाग:- डॉ.गिरीश नाईक, डॉ.शिवलिंग पिसे, डॉ.सुनील कारीदकर, डॉ.जितेंद्र भाट,प्रा.शैलेश शहा,प्रा.भूषण कांबळे,प्रा.राहुल भेडसगावकर,प्रा.सयाजी पाटील, प्रा.रोहित गुलनवार,प्रा.संदेश सांगळे.
इलेकट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग:-डॉ.मानसी दीक्षित, डॉ.संगीता चौगुले, डॉ.युवराज पाटील,डॉ.अमित सरकार,डॉ.मंदार सोनटक्के,प्रा.नितीन सांबरे, प्रा.अमर रेणके.संगणक व संबंधित विभाग:- डॉ.ग्रंतेज ओतारी,डॉ.अमित चांचल,डॉ.उमा गुरव,प्रा.अर्चना सावंत,प्रा.दिपाली जाधव.इलेकट्रीकल विभाग:- डॉ. विलास बुगडे, प्रा.प्रकाश चव्हाण,प्रा.संतोष मडिवाळ.
बायोटेक विभाग :- डॉ.राधिका माळकर, प्रा,डॉ.मेधा पेटकर.
बेसिक सायन्स विभाग :- डॉ.दत्तात्रय साठे,डॉ.गणेश कांबळे, डॉ.महेश शिंदे, डॉ.सचिन धनानी.
· सिव्हील विभाग :- डॉ.विदुला स्वामी, प्रा.अमोल सावंत,प्रा. सुनील शहा,प्रा.राजीव चावरेकर.
·सिव्हील अँड एनव्होर्नमेंटल विभाग – डॉ.अक्षय थोरवत,प्रा.भरत इंगवले,प्रा.अमर काटकर,प्रा.पारुल सालेर. प्रा.किरण कांगले.एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील ४० प्राध्यापक आंतरराष्ट्रीय स्तरावरील यादीमध्ये समाविष्ट होणे ही केआयटीच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे असे मत संस्थेचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी व्यक्त केले.केआयटीच्या ४० वर्षाच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये तेथील प्राध्यापकांचे मोठे योगदान आहे अशा भावना संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनील कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या. संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष श्री. साजिद हुदली,सचिव श्री. दीपक चौगुले अन्य विश्वस्त यांनी या सर्व प्राध्यापकांचे अभिनंदन केलेले आहे.