रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने आयोजित यामिनी प्रदर्शन उत्कृष्ट,प्रदर्शनास नेहमीच सहकार्य राहील – डिस्ट्रिक गव्हर्नर रोटेरियन श्री नासिर बोरसदवाला
रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या “यामिनी” प्रदर्शनास सुरुवातहॉटेल सयाजी येथे चालु असलेल्या प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद भेट देण्याचे संयोजकांचे आवाहन
कोल्हापूर/प्रतिनिधी : दसरा दिवाळी जवळ येताच कोल्हापुरच्या जनतेला वेध लागतात ते यामिनी या प्रदर्शनाचे. दरवर्षीच्या वाढत्या प्रतिसादामुळे रोटरी क्लब ऑफ गार्गीजने यावर्षी हे प्रदर्शन ६,७ व ८ ऑक्टोबर २०२३ रोजी विक्टोरिया हॉल, सयाजी हॉटेल, कोल्हापूर येथे आयोजित केले आहे.या प्रदर्शनास आजपासून सुरुवात झाली असून या प्रदर्शनाचे डिस्ट्रिक गव्हर्नर रोटेरियन श्री नासिर बोरसदवाला रो.सचिन मालू,पूर्व प्रांतपाल गौरीश धोंड,पुढील वर्षीचे प्रांतपाल शरद पै यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.यावेळी बोलताना रो. श्री नासिर बोरसदवाला यांनी दरवर्षी भरविण्यात येणारे यामिनी प्रदर्शन उत्कृष्ट व चांगले असते यातुन जमा होणाऱ्या निधीचा उपयोग रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने समाज कार्यासाठी केला जातो अशा या प्रदर्शनास माझे नेहमीच सहकार्य राहील असे उदघाटन प्रसंगी बोलून दाखविले.यावेळी पूर्व प्रांतपाल गौरीश धोंड,शरद पै यांनीही प्रदर्शन उत्कृष्ट भरविल्याबद्दल गार्गीजच्या सर्व पदाधिकारी महिलांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.यावेळी रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या माजी अध्यक्षा व सेक्रेटरी यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या प्रदर्शनास चांगला प्रतिसाद हा मिळत असून भेट देण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
यावेळी व्यासपीठावर क्लबच्या अध्यक्षा रो. कल्पना घाटगे,अजय मेनन, सेक्रेटरी रो. शोभा तावडे ट्रेझरर रो. ममता झंवर याचबरोबर यामिनीच्या प्रमुख समन्वयक रो. रेणुका सप्रे, रो. आरती पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यामिनी प्रदर्शनाचे हे दहावे यशस्वी वर्ष आहे. यावर्षी प्रदर्शनात ९० हून अधिक स्टॉल आहेत. यात ककडे यांचे स्टॉल साड्या, ड्रेस मटेरियल, रेडमेड ड्रेसेस, ज्वेलरी, फुटवेअर, डिझायनर चपला, कास्टाईलची भांडी,होम डेकोर आयटम आणि बचत गटांचा स्टॉल ज्यामध्ये मतिमंद मुलांनी तयार केलेली पणती,ट्रे, पेंटिंग
आहेत.ड्रेसेस, साड्या, लहान मुलांचे कपडे, ज्वेलरी, डेकोरेटिव्ह वस्तू, स्किन केअर प्रॉडक्ट याबरोबरच रियल ज्वेलरी व डायरेक्ट विणकारांकडून बनारसी व चंदेरी साड्या यांचा यात समावेश आहे.शिवाय भागीरथी महिला संस्थेचा डोरी हँडलूमचा स्टॉल प्रदर्शनात आहे. कोल्हापूर, सांगली इचलकरंजी याबरोबरच दिल्ली बनारस गोवा मुंबई पुणे बेळगाव आणि इतर विविध शहरातून स्टॉल धारक आलेले आहेत त्यांनी आपले स्टॉल मांडले आहेत.समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची उमेद देणे हा मुख्य उद्देश या प्रदर्शनाचा असून त्यामुळे बचत गट व अंकुर व स्वयम च्या मुलांनी बनवलेल्या विविध वस्तू आपल्याला प्रदर्शनात बघायला मिळणार आहेत.
या प्रदर्शनातून उपलब्ध निधीतून हॅपी स्कूल करिता विविध उपक्रम, महिला सबलीकरण, गरजूंसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, मुर्तीसाठी सर्वाइकल कॅन्सरचे वैक्सिंग, अशा विविध उपक्रमासाठी वापरला जाणार आहे.याचबरोबर रो. दीपिका कुंभोजकर,रो.सुजाता रोहिया, रो प्रीती मर्दा, रो प्रीती मंत्री, गिरीजा कुलकर्णी, रो.मेघना शेळके, रो. योगिनी कुलकर्णी,रो.लक्ष्मी शिरगावकर,रो.सुप्रिया डोईजड व रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या सर्व पदाधिकारी आदी उपस्थित होते.
प्रदर्शन उद्या ७ व ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सुरू राहणार आहे. तरी सर्व कोल्हापूरवासीयांनी या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.यावेळी क्लबच्या अध्यक्षा रो. कल्पना घाटगे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.यामिनीच्या प्रमुख समन्वयक रो. रेणुका सप्रे यांनी रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या कार्याची माहिती सांगितली.व सेक्रेटरी रो. शोभा तावडे यांनी आभार मानले.