आता कोल्हापूरमध्ये हृदय विकार आणि फुप्फुसांच्या अतिगंभीर आजारांसाठी बाह्यरुग्ण विभाग सुरू होणार
सज्ज पुण्यातील डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल द्वारे कोल्हापूर परिसरात ओपीडी सुरू होणार
कोल्हापूर/प्रतिनिधी : हृदय विकार आणि फुप्फुसांच्या अतिगंभीर आजारांच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पिंपरी, पुणे यांचे कोल्हापुरातील डायमंड हॉस्पिटल (डॉ. साई प्रसाद), पद्मा क्लिनिक (डॉ. मनाडे) आणि सिद्धी विनायक नर्सिंग होम (डॉ. संजय देसाई) मध्ये बाह्यरुग्ण विभाग सुरु होत आहे. या सुविधेमुळे तज्ज्ञांचे समुपदेशन व मार्गदर्शन मिळणे शक्य होईल. या ओपीडी द्वारे कोल्हापूर आणि आसपासच्या भागातील रुग्णांना याचा फायदा होणार आहे. तसेच ऑक्सिजनवर अवलंबून किंवा अतिगंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांवर काहीवेळा अवयव प्रत्यारोपण सुद्धा करावे लागतात त्याकरिता महाराष्ट्रातील रुग्णांना हैदराबाद, चेन्नई मध्ये जावून उपचार घ्यावे लागतात ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसे दोन्ही मोठ्या प्रमाणात खर्च होतो. परंतु पुण्यातील डीपीयू हॉस्पिटलमध्ये आता ह्या प्रत्यारोपणाच्या सर्व सेवा सुविधा, अनुभवी कुशल डॉक्टरांच्या टीम उपलब्ध असल्याने वेळ व पैश्याची बचत देखील होईल. त्यामुळे कोल्हापूर परिसरातील रुग्णांना याचा लाभ होणार आहे.
फुप्फुस संबंधी दुर्धर, बऱ्या होऊ न शकणाऱ्या, कोवीडमुळे लंग फ्रायबोसीस झालेल्या, अंथरुणावर खिळलेले तसेच ऑक्सिजनवर अवलंबून असणाऱ्या रुग्णांसाठी आवश्यक उपचार प्रक्रिया व फुप्फुस किंवा हृदय प्रत्यारोपण सुविधा लोकांना माहिती व्हावी आणि त्याचा प्रसार होणे गरजेचे आहे. कारण अशा गंभीर आजारांच्या उपचारांसाठी कोल्हापूर, सातारा, सांगली किंवा इतर महाराष्ट्रातील रुग्ण प्रामुख्याने हैदराबाद, चेन्नईला जाऊन उपचार घेतात. त्यासाठी अनेक महिने प्रतीक्षा यादीत नाव नोंद करून वाट पाहावी लागते, त्यामुळे उपचार करण्यात उशीर होऊन खर्चही अधिक होतो. त्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे.काही परिस्थितीमध्ये अतिगंभीर जसे की हृदय विकार किंवा ऑक्सिजनवर अवलंबून असलेल्या रुग्णांना बाह्यरुग्ण विभागाद्वारे तज्ज्ञांचे समुपदेशन व मार्गदर्शन मिळणे शक्य होईल रुग्णाचे आरोग्यहित साध्य व्हावे याचाच विचार करून पुण्यातील डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल द्वारे कोल्हापूर विभागामधील रुग्णांसाठी ओपीडी सेवा सुरु करणार आहे. त्यामुळे सर्व गंभीर आजारांवर डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे येथे उपचार उपलब्ध असल्याने या सेवेचा लाभ पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला ही घेता येणार आहे.
पुण्यातील डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये या पूर्वी अवयव प्रत्यारोपणाच्या आता पर्यंत ३०० हुन अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून त्यात हृदय प्रत्यारोपण, फुप्फुस प्रत्यारोपण, हृदय – फुप्फुस असे दुहेरी प्रत्यारोपणाचा समावेश आहे आता हे सर्व रुग्ण ऑक्सिजनच्या आधाराशिवाय सर्व सामान्य जीवन जगत असून, त्यातील काहीजण पुन्हा कामावर रुजू सुद्धा झाले आहेत.
डॉ. भाग्यश्री पी. पाटील, प्र-कुलपती, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे, म्हणाल्या, ” महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहचून हृदय विकार, फुप्फुस प्रत्यारोपण सारख्या गंभीर आजारांवर जनतेला अधिकाधिक दर्जेदार आणि सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळावी याच उद्दिष्टाने ही ओपीडी सुरु करण्यात आली आहे. आम्ही आरोग्यसेवेमध्ये सतत नवीन आणि आधुनिक अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे रुग्णसेवा जास्तीत जास्त सुरक्षित करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.”डॉ. यशराज पाटील, विश्वस्त व खजिनदार, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे म्हणाले, “वैद्यकीय सेवेचे विस्तार होणे काळाची गरज आहे. त्यामुळे, अशा विभागवार ओपीडीच्या माध्यमातून रुग्णाचे आरोग्य हित साध्य व्हावे या दिशेने आम्ही कार्यरत आहोत. महाराष्ट्राच्या जनतेला जागतिक दर्जाची वैद्यकीय सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकांपर्यंत उत्तम तसेच जागतिक दर्जाची वैद्यकीय सेवा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
यावर भाष्य करताना डॉ. मनीषा करमरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे म्हणाल्या, “रुग्णांना अधिक सुलभ आणि आधुनिक आरोग्यसेवा देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. त्याचेच हे उदाहरण असून प्रत्यारोपण सेवा अधिक सुलभ केल्याने रुग्णांना त्याचा लाभ होणार आहे. आम्ही नेहमीच प्रत्येक रुग्णाची वैयक्तिक काळजी घेऊन त्यांना सर्वोत्तम आणि सर्वात प्रगत आरोग्य सेवा प्रदान करण्याचा प्रयत्न करतो.
या पत्रकार परिषदेला डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. संजय पठारे यांनी संबोधीत केले. यावेळी हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉ सुशीलकुमार मलानी तसेच, हृदयरोग तज्ञ डॉ. विवेक मनाडे, फुफ्फुस प्रत्यारोपण व श्वसन विकार तज्ञ् डॉ. राहुल केंद्रे आणि हृदय शल्यचिकित्सक डॉ. आशिष डोळस उपस्थित होते.या बाह्यरुग्ण विभागाची माहिती सर्वांना व्हावी तसेच या सेवेचा लाभ रुग्णांनी घ्यावा असे आवाहन डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल द्वारे करण्यात आले आहे. अधिक माहिती आणि भेटीसाठी संपर्क ९२२६००७५०२ आणि ९७६६७८३१५३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधायचा आहे.