जालना येथे झालेल्या लाठीचार्ज विरोधात सकल मराठा समाजाची उद्या ५ रोजी कोल्हापूर बंदची हाक
कोल्हापूर/प्रतिनिधी : दसरा चौक, कोल्हापूर येथे सकल मराठा समाज कोल्हापुर व अखिल भारतीय मराठा महासंघ कोल्हापुर यांच्यावतीने राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्याच्या निषेधार्थ रोजी जवाब दो आंदोलन करण्यात आले. यावेळी कोल्हापूरातील स्वाभिमानी जनतेने, समाज बांधवांनी, कार्यकर्ते, सर्व पक्ष, संघटना सह विजय देवणे शिवसेना ठाकरे गट संजय पवार शिवसेना ठाकरे गट, सुनील मोदी शिवसेना ठाकरे गट,रविकिरण इंगवले शिवसेना ठाकरे गट,बाबा इंदुलकर, सकल मराठा संघ, दिलीप देसाई, हर्षल सुर्वे शिवसेना ठाकरे गट, संदीप देसाई आम आदमी पार्टी, किशोर घाटगे,श्रीमती शैलजा भोसले, विक्रम जरग, गिरीश फोन्डे ऑल इंडिया युथ फेडरेशन, गिरीश खडके बार कौन्सिल अध्यक्ष कोल्हापूर,गणी आजरेकर, अब्दुल फरास राजू जाधव मनसे आधी सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणतय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, मराठ्यांच्या जीवावर उठणाऱ्या राज्य सरकारचा धिक्कार असो, बेजबाबदार गृहमंत्र्यांचे करायचं काय खाली डोकं वर पाय,जवाब दो जवाब दो महाराष्ट्र सरकार जवाब दो, जनरल डायर कोण रे पायतान मारा दोन रे, हे गाजर कशाचं मराठा आरक्षणाचा, अशा घोषणा देण्यात आल्या.
सदर आंदोलनास महिला कार्यकर्ते यांचा हस्ते शाहू महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून सुरुवात झाली. आंदोलनादरम्यान खालील पदाधिकारी यांनी आंदोलन कर्ते यांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना अखिल भारतीय मराठा महासंघ अध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी गेले अनेक वर्ष मराठ्यांनी रस्त्यावरची लढाई करून आरक्षण आणि मोठ्या ताकतीने प्रयत्न करत आहोत भावी पिढीसाठी कोणाचाही नेतृत्व नाही घेता समाजातील समाज बांधव स्वतःहून हे आंदोलन करत आहेत जालना या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालू असताना. आंदोलकांची तब्येत बिघडलेली आहे. असा कांगावा करून जिरंगे यांच्या अधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी आंदोलन मागे घेण्याचानिर्णय झाला असतानाही
आंदोलन शांततेत सुरू असताना अचानक त्या आंदोलन स्थळी पोलिसांचा घेरावा पडला पोलिसांनी मांडवात खुसखोरी करून लाठीचार्ज सुरू केला. यावेळी महिलांचा बालकांचा सुद्धा विचार केला नाही. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. हेल्मेट अश्रू धूर आणि हत्यार घेऊन पोलीस आले होते.
-उपोषणकर्त्याचे तब्येत बिघडली असे कारण सांगून आंदोलनात हस्तक्षेप करणारे मागे मास्टरमाइंड कोण आहे याचा विचार करा.
– आंदोलनाच्या ठिकाणी हत्यार धारी पोलीस यंत्रणा का याचे उत्तर प्रशासन दिले पाहिजे.
-उपोषण मंडपात महिला बालकांची मोठ्या प्रमाणात संख्या असतानाही पूर्व सूचना न देता लाठीचार्ज केला गेला. उत्तर प्रशासन द्यायला पाहिजे
यावेळी एसपी कलेक्टर यांच्याबरोबर उपाधीक्षक पोलीस व इतर पोलिस अधिकारी उपस्थित होते. का याचे उत्तर आम्हाला हवे आहे
-यावेळी गोळीबार करण्याचा आदेश कोणी दिला.
-मराठ्याची जिरवली कशी असा म्हणणारे अधिकाऱ्यांच्या शोध घेतला पाहिजे.
– बेजबाबदार पण कारवाई करणाऱ्या पोलीस अधीक्षक व पोलिसउपअधिकारी कारवाई करायला हवे असतानाही शासनाच्या निर्णय यामागे काय गोड बंगाल आहे.
-जालना येथील घडलेल्या घटनेबद्दल साधी दिलगिरी फडणवीस यांनी व्यक्त केलेली नाही.घटनेबाबत कोल्हापूरच्या जनतेने तीन निर्णय घ्यायचा आहे.
लाटी चार्ज व गोळीबार करणाऱ्या पोलीस अधीक्षक व पोलीस उपाध्यक्ष यांचे बदली करावी की त्यांना निलंबित करावं
-घटनेची चौकशी कार्यालयीन चौकशी व्हावी की न्यायालयीन चौकशी व्हावी.
– या अमानुष घटनेचे नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी समाजाचे माफी मागावी की राजीनामा द्यावा
आंदोलन आता असंच नाही संपणार आहे जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहील असे सांगितले.
संजय पवार शिवसेना यांनी बोलताना या मुडदार झालेल्या सरकारला धडा शिकवायचा असेल तर सगळ्यांचा होकार असेल तर उद्या कोल्हापूर शहर बंद करून आपल्या भावना व्यक्त कराव्या लागणार आहेत. सगळ्या असोसिएशन ला मराठी समाजाच्या वतीने विनंती करतो की आज आमच्यावर हल्ला झाल्या उद्या तुमच्यावरही हल्ला होऊ शकतो हे सरकार फक्त खुर्चीसाठी पाहिजे ते करायला तयार असते त्यामुळे एक सुद्धा टपरी किंवा हॉटेल वाहन रस्त्यावर या शहरात दिसता कामा नये अशा प्रकारे आपण कोल्हापूर बंद करू, कायदा हातात न घेता आपण जे दुकान उघडे दिसेल तर
आपण फिरून बंद करायला लावू
उद्या दहा वाजता एकत्र जमून मोठ्या ताकतीने कोल्हापूर बंद करू की परत कोणत्याही सरकारने मराठा विरुद्ध कारवाई करण्यास धजणार नाही. असा इशारा दिला आहे.
यावेळी वसंतराव मुळीक,आमदार ऋतुराज पाटील, शशिकांत पाटील, संदीप देसाई, बाबा पार्टे, उदय घोरपडे, उत्तम जाधव, ऍड इंद्रजीत चव्हाण, काका जाधव, विक्रम जरग, संजय पवार, रविकिरण इंगवले, विजय देवणे, सुनील मोदी,शाहीर दिलीप सावंत, पंडित कंदले, प्रशांत पटकारे, विजय काकोडकर, शैलजा भोसले, संयोगीता देसाई, अनिता टिपूगडे, रंजना जाधव, बबिता जाधव, रोहिनी मुळीक, संपत्ती पाटील, अनुराधा पाटील, मेघा मुळीक, प्रियंका जाधव, मिनल मुळीक, विद्या मुळीक, नेहा पाटील, भारती पाटील, हेमा देसाई, चारुशीला पाटील, विजय काकोडकर, उत्तम जाधव, सुनील पाटील, जयकुमार शिंदे, विकी जाधव, लाला गायकवाड, आदिल फरास, कादर मकबारी, अर्जुन माने, हर्षल सुर्वे, दिलीप देसाई, c m गायकवाड, विजय पाटील, आर डी पाटील, गाणी आजरेकर, प्रकाश गवंडी, प्रकाश पाटील, दुर्वास कदम, दादा पाटील, महादेव पाटील, शारगधंर देशमुख, सुनील पाटील, बाबा इंदूकर, पोवार, चंद्रकांत चव्हाण, दत्ता पाटील, डॉ प्रदीप पाटील, सुजित खामकर, विराज पाटील,प्रभाकर पाटील, रवी पाटील आदी उपस्थित होते.