चलो कोल्हापूर,चलो दसरा चौक आज जवाब दो आंदोलन
आज सोमवार ४ सप्टेंबर सकाळी ११.३० वाजता.
कोल्हापूर/प्रतिनिधी : जालना येथे उपोषणास बसलेल्या मराठ्यांवर बेछूट लाठीमार व गोळीबार केला. तसेच छत्रपती शिवरायांच्या भूमित वयस्कर महिला,मुलांना रक्तबंबाळ केले, डोकी फुटपर्यंत मारहाण केली या पुरुषार्थाचा जाब विचारण्यासाठी आज सोमवार दि ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वा. ऐतिहासिक दसरा चौक, कोल्हापूर येथे जवाब दो आंदोलन करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा समाज कोणत्याही प्रकारे बंद पुकारणार नाही, अथवा चक्काजाम करणार नाही ,जाळपोळ करणार नाही, पण सनदशीर मार्गाने लोकशाही पद्धतीने श्री वसंत मुळीक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे.
मराठा समाजाला पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज विरोधात हे आंदोलन करायच आहे.
तमाम सकल मराठा समाजाने दसरा चौकात येथे येताना आपले राजकीय पक्ष, विविध संघटना , सामाजिक संस्था या बाजूला ठेवून फक्त आणि फक्त सकल मराठा समाज यावर सातत्याने होत असलेल्या अन्याय विरोधात एकत्र येणे महत्वाचे आहे म्हणून हे आंदोलन करण्यात येत आहे असे आवाहन वसंतराव मुळीक, दिलीप देसाई यांनी केले आहे.