Tuesday, July 1, 2025
spot_img
Homeताज्याकोतवाल रिक्त पदाची गुरुवारी सोडत

कोतवाल रिक्त पदाची गुरुवारी सोडत

कोतवाल रिक्त पदाची गुरुवारी सोडत

कोल्हापूर/ (जिमाका) : ‘कोतवाल’ रिक्त पदे भरण्यासाठी कोतवाल निवड समितीचे अध्यक्ष तथा करवीर विभागाचे उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक १० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नागाळा पार्क, कोल्हापूर येथे या पदाची सजानिहाय आरक्षण सोडत होणार आहे. सजा अंतर्गत असलेल्या सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील व इच्छुक नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करवीर तहसिलदार स्वप्नील रावडे यांनी केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार करवीर तालुक्यातील कसबा बावडा पश्चिम, वसगडे, मुडशिंगी दक्षिण, कावणे, हळदी, कुरुकली, सडोली खालसा, शिरोली दुमाला, सडोली दुमाला, केर्ले, पाडळी खुर्द, वरणगे, चिखली, कणेरी, गिरगांव, द-याचे वडगांव, हलसवडे, पाचगांव, सांगरुळ, आमशी, करवीर क्र. २, करवीर क्र.३, करवीर क्र.४, करवीर क्र. ५, करवीर क्र.६, कसबा बावडा पूर्व, टेंबलाईवाडी, उचगांव दक्षिण, मुडशिंगी उत्तर, कणेरीवाडी, उजळाईवाडी, तामगांव, मोरेवाडी, दोनवडे, हणमंतवाडी व नागदेववाडी या सजांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments