जुन्या व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन तरुणांनी काम करावे – खासदार प्रा.संजय मंडलिक यांचे उदगार
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेच्या कोल्हापूर सेंटरच्या वतीने पदाधिकारी व कार्यकारीणी सदस्यांचा पदग्रहणसमारंभ तसेच कोल्हापुरातील जेष्ठ बांधकाम व्यावसायिकांना जीवन गौरव पुरस्कार अर्पण आणि उत्कृष्ठ वास्तू निर्मिती पुरस्कार प्रदान समारंभ संपन्न
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर बिल्डर ऑफ असोसिएशनचे वटवृक्षात रूपांतर झाले असून कोल्हापूरमध्ये चांगलं नावलौकिक या असोसिएशन ने मिळवलेला आहे. ब्रिटिशांच्या काळामध्ये सुरू झालेली ही संघटना चांगल्या पद्धतीने काम करत असून अनेक त्रुटी या संघटनेने आजपर्यंत दूर केल्या आहेत.नवीन बांधकाम क्षेत्राला उजाळा देण्याचे काम या संघटनेने केले असून जुनी माणसे ज्यांनी नावलौकिक आपल्या क्षेत्रात मिळविला मिळविलेला आहे त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आजच्या तरुणांनी काम करत राहणे आवश्यक आहे असे उद्गार खासदार प्राध्यापक संजय मंडलिक यांनी काढले. आज देशाची वाटचाल पंतप्रधान व महाराष्ट्राची वाटचाल पायाभूत सुविधा पूर्वीत यशस्वीपणे चालू आहे.असेही त्यांनी सांगितले.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय पातळीवरील बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेच्या कोल्हापूर सेंटरच्या वतीने नव्याने निवडण्यात आलेल्या पदाधिकारी व कार्यकारीणी सदस्यांचा पदग्रहणसमारंभ तसेच कोल्हापुरातील जेष्ठ बांधकाम व्यावसायिकांना जीवन गौरव पुरस्कार अर्पण आणि उत्कृष्ठ वास्तू निर्मिती पुरस्कार प्रदान समारंभ आज हॉटेल सयाजी येथे पार पडला.यावेळी समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून मा. कुंवर. मानसिंगजी चंबियाल (चंबा व्हॅली रियासत, हिमाचल प्रदेश) आणि प्रमुख अतिथी खा. श्री. संजय मंडलिक उपस्थित होते.यावेळी मा. चेअरमन श्री. मदन भंडारी नूतन चेअरमन ,जी.सी.मेंबर श्री.विजय कोंडेकर, सध्याचे चेअरमन ऋषींकेश यादव.व्ही. बी. पाटीलसो, मा. अनिल गोयल डायरेक्टर कालिका स्टील व पाटबंधारे खात्याचे अधिक्षक अभियंता श्री. महेश सुर्वे उपस्थित होते. नव्या पदाधिकारी व कार्यकारणीच्या पदग्रहन समारंभ पार पडला.चेअरमन ऋषींकेश यादव यांनी नूतन चेअरमन मदन भंडारी यांच्याकडे नूतन कार्यभार सोपविला.
मा. कुंवर. मानसिंगजी चंबियाल (चंबा व्हॅली रियासत, हिमाचल प्रदेश) यांनी यावेळी बोलताना असोसिएशनच्या कामकाजाला शुभेच्छा दिल्या.यावेळी स्वागत पर प्रास्ताविक भाषणात श्री प्रताप(बापू) कोंडेकर यांनी संस्थेच्या वाटचालीची माहिती सांगितली.याचबरोबर संस्थेने अनेक सामाजिक उपक्रम राबविल्याचे सांगितले.बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य चेअरमन श्री. सचिन देशमुख यांनी मनोगत व्यक्त करताना कोल्हापूर ची संस्था चागल्या पद्धतीचे काम करत असून भविष्यात महाराष्ट्र चेअरमन म्हणून मी नेहमीच आपल्या अडचणी सोडविण्यासाठी पुढे असणार आहे आपण कधीही अडचण सांगा असे आश्वासन दिले.
बांधकाम क्षेत्रात आपल्या अतुलनीय कर्तुत्वाने नावलौकिक कमवलेले जुन्या काळातील कॉन्ट्रॅक्टर श्री. लक्ष्मणराव विठ्ठलराव कदम, तसेच उत्कृष्ट वास्तुनिर्मिती साठी पुरस्कार महाभारत कंस्ट्रक्शन चे जयेश कदम व बाळासाहेब कलशेट्टी यांना प्रदान करण्यात येणार आहे. कोल्हापूरचे सुपुत्र ज्यांनी कोल्हापूरचे नाव आर्कीटेक्ट क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरले ते आर्कीटेक्ट श्री. सुनील पाटील यांना खास पुरस्कार प्रदान करणेत येणार आहे. तसेच कोल्हापुरातील जुने बांधकाम व्यावसायिक श्री. बी. वाय. पाटील यांना त्यांच्या बांधकाम क्षेत्रातील कर्तृत्वाबद्दल मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करणेत येणार आहे. त्याचबरोबर प्रामुख्याने सर्व प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चरल कामे उदा. पूल, रस्ते, पाईपलाईन व सिंचनाशी संबंधित विविध कामे एकाच कंपनीच्या छताखाली देशातील जवळ जवळ सर्व राज्यात आजही कार्यरत असणारे लक्ष्मी सिव्हील इंजीनिअरिंग सर्व्हीसेस प्रा.लि. चे सर्वेसर्वा श्री. विजयभाई शहा व बच्चूभाई उर्फ राजेंद्र दोशी यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी महाभारत कंस्ट्रक्शन चे जयेश भाई कदम आर्कीटेक्ट श्री. सुनील पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.आज माझा आणि वडिलांचा सन्मान केला याचा मी आयुष्यभर ऋणी राहीन असे उदगार सुनील पाटील यांनी काढले.यावेळी जलसंपदाचे महेश सुर्वे कोल्हापूर जिल्ह्यात अनेक चांगली बांधकामे केली आहेत चांगली धरणे बांधलेली आहेत .मी कोणत्याही ठिकाणी गेलो तर मला कोल्हापूरचे नाव हे नेहमीच आठवत राहते असे सांगितले.यावेळी आभार नूतन अध्यक्ष मदन भंडारे यांनी मानले.या कार्यक्रमासाठी माजी चेअरमन राजीव लिंग्रस मा. चेअरमन श्री. मदन भंडारी
श्री प्रताप(बापू) कोंडेकर,जी.सी.मेंबर श्री.विजय कोंडेकर, माजी चेअरमन ऋषींकेश यादव आदीनी परिश्रम घेतले