Monday, June 30, 2025
spot_img
Homeताज्यामुलं पुस्तकं वाचतात...

मुलं पुस्तकं वाचतात…

मुलं पुस्तकं वाचतात…

या फोटोतील दोन मुली यातील दिशा इयत्ता पाचवीत व ईशा सहावीत शिक्षण घेत आहे. एकटी विद्यापीठ हायस्कूल येथे शिकते तर दुसरी पद्मराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये शिकते. परवा करवीर नगर वाचन मंदिरमध्ये आमचे मार्गदर्शक, कवी, लेखक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. त्यावेळी या दोन मुली माझ्या पाठीमागे बसल्या होत्या. अख्या सभागृहात लहान-लहान मुलं कशी काय म्हणून मी त्यांच्याशी संवाद सुरू केला. यावर समजले की, करवीर नगर वाचन मंदिर ने लहान मुलांसाठी एक विशेष योजना राबवली आहे. त्यामध्ये वर्षभर त्यांना विविध प्रकारची पुस्तके मोफत वाचायला दिली जातात आणि या वाचकांच्यामध्ये विविध स्पर्धा घेतल्या जातात.
उत्सुकतेपोटी त्यांना मी विचारलं या ग्रंथालयातून कोण कोणती पुस्तके वाचतात तर त्यांनी सांगितले ‘आम्ही महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सावित्रीबाई फुले व अहिल्याबाई होळकर या महानव्यक्तीमत्वांची पुस्तक वाचली आहेत. अकबर बिरबल च्या गोष्टी सुद्धा आम्ही वाचल्या आहेत. आम्हाला वाचायला खूप आवडतं. इथून भरपूर पुस्तकं मिळतात म्हणून आम्ही वाचू शकतो. घरात मोबाईल आहे पण पुस्तक मिळत असल्यामुळे आम्ही जेवढा मोबाईल वापरतो त्याच्यापेक्षा दुप्पट वेळ पुस्तके वाचण्यात घालवितो.’
मला या घटनेतून एक लक्षात आलं जी मी नेहमीच म्हणत असतोच ‘की मुलं वाचतात फक्त त्यांना आपण ती उपलब्धता करून द्यायला हवी’, केवळ मोबाईल घेतात हा आरोप करण्यापेक्षा ती चांगलं वाचन करू शकतात म्हणून आपण छोटी छोटी का असेना पुस्तके खरेदी करून घरात ठेवली पाहिजेत. कधी ना कधी त्या पुस्तकांना हात लागतोच. अगदीच पुस्तके खरेदी करायला जमत नसेल तर ग्रंथालयातून पुस्तके आणली पाहिजेत. त्यामुळे मुलं वाचतात आणि सध्याचा काळ पाहिला की पालक आणि पाल्य याच्यांतला वाढत चाललेला दुरावा हा कमी करायचा असेल तर पुस्तके वाचणे शिवाय पर्याय नाही. अन्यथा हरवत चाललेले सामाजिक स्वास्थ असेच बिघडत जायला वेळ लागणार नाही.

युवराज सतबा कदम
वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्था, कोल्हापूर
दि. 28 जून 2023
8975192626

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments