Thursday, June 26, 2025
spot_img
Homeदेशराजर्षी शाहू फाउंडेशन मार्फत लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त वृक्ष...

राजर्षी शाहू फाउंडेशन मार्फत लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त वृक्ष संवर्धन मोहिमेस सुरुवात

राजर्षी शाहू फाउंडेशन मार्फत लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त वृक्ष संवर्धन मोहिमेस सुरुवात

भुये/प्रतिनिधी : भुई ता.करवीर येथील भैरोबा माळावरील टेकडीवर लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या १४९ व्या जयंतीच्या निमित्ताने राजर्षी शाहू फाउंडेशन मार्फत वृक्ष संवर्धन व वृक्षारोपण मोहिमेस सुरुवात केली आहे. तसेच फाउंडेशन मार्फत सुरू असलेल्या अकॅडमीमध्ये प्रतिमा पूजन संस्थेचे अध्यक्ष अमर पाटील व संस्थेच्या सचिव सविता पाटील यांचे हस्ते संपन्न झाले.भुये व भुयेवाडीच्या ऐतिहासिक भैरोबा टेकडीवर गेल्या दहा वर्षांपासून वृक्षारोपण सुरू आहे. चालू वर्षी पावसाळा लांबणीवर पडला असल्यामुळे वृक्ष संवर्धन व वृक्षारोपण मोहीम गावातील तरुणांनी हाती घेतली आहे .यामध्ये झाडांना आळी करणे , परीसर स्वच्छता करणे तसेच चालू वर्षी वृक्षारोपण करावयाचे आहे त्यासाठी देशी झाडांची रोपे आणली असून पाऊस नसल्यामुळे त्यांना व्यवस्थित रित्या ठेवून त्याचे संगोपन करणे व वृक्षारोपणासाठी खड्डे काढणे आणि आळी उजरणी आदीं कामे शाहू जयंतीच्या निमित्त पूर्ण करून घेतली.
शाहू अकॅडमीमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमांमध्ये संस्थेचे अध्यक्ष अमर पाटील सचिव सविता पाटील आदिती पाटील यांचे सह मान्यवर उपस्थित होते. तसेच वृक्ष संवर्धन मोहिमेमध्ये अमर मिसाळ, सचिन भाऊ पाटील, सचिन पाटील प्रदीप पाटील समीर निरुखे चंद्रकांत पाटील रुपेश शिंदे ,विश्वास पाटील, आदित्य पाटील ,क्षितिज पाटील अथर्व पाटील रोहन सुतार दीपक पाटील केदार पाटील यांचे सह भैरोबा फक्त व बालचमू मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments