Sunday, June 29, 2025
spot_img
Homeताज्याशिवाजी चौकात आज सायंकाळी शॉर्ट सर्किट मुळे ७ दुकानांचे नुकसान ५० लाखाचे...

शिवाजी चौकात आज सायंकाळी शॉर्ट सर्किट मुळे ७ दुकानांचे नुकसान ५० लाखाचे झाले आहे नुकसान

शिवाजी चौकात आज सायंकाळी शॉर्ट सर्किट मुळे ७ दुकानांचे नुकसान ५० लाखाचे झाले आहे नुकसान

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात आज सायंकाळी शॉर्ट सर्किट मुळ सुपर मार्केट या दुकानला आग लागली.काही वेळातच या आगीने रौद्ररूप धारण केले या आगीने शेजारील सहा दुकानांना देखील घेरले त्यामुळे या आगीत एकूण ७ दुकाने आणि एक घर जळून खाक झाले आहे.अग्निशामक दलाकडून सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठी मदत केली.सुदैवाने कोणतीही जीवितहानी नसली तरी जवळपास ५० लखाहून अधिकचे नुकसान या आगीत झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात शिवाजी रोडवर शहीद मोमीन यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे विक्री करण्याचे सुपर मार्केट नावाचे दुकान आहे. या दुकानात लाखो रुपये किमतीचे इलेक्ट्रिक वस्तू खेळणी प्लास्टिकचे साहित्य खेळाचे साहित्य विक्रीसाठी ठेवले होते. आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे या दुकानाला आग लागली. बघता बघता या आगीने रौद्ररूप धारण केले.त्यामुळे या आगीने रिकिंबदार गल्लीतील शरीफ मोमीन यांचे घर, वसीम टेलर यांचे दुकान, विलास बकरे यांचे श्री प्रोसेस प्रिंटिंग प्रेस, शिवाजी रोडवरील राजू मुजावर यांच्या मालकीचे ए. वन इलेक्ट्रिक दुकान,अनिल उरुणकर यांच्या मालकीचे एस टेलर्स यांच्या दुकान, ज्योतिर्लिंग कापड दुकान,माने यांचे इंडीयन हेअर कटिंग सलून दुकान, प्रभात वॉशिंग कंपनी या दुकानांना आग लागली.रिकिंबदार गल्ली आणि शिवाजी रोडवरील
स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दलाला याची वर्दी दिली.
शहरातील विविध ठिकाणच्या अग्निशामक दलाचे जवान आठ ते दहा बंब घटनास्थळी घेवून दाखल झाले. त्यानी तात्काळ आग विझवण्याच्या कामाला सुरुवात केली मात्र बघ्यांची गर्दी अरुंद गल्ली आणि एकमेकांना खेटून असलेली इमारती यामुळे आग विझवण्यात मोठ्या अडथळे निर्माण झाले होते.आग विझवण्याच्या कामात स्थानिक नागरिकांनी जीवाची परवा न करता मदत केली. तब्बल तीन तास आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू होते. अक्षरशः जेसीबीच्या साह्याने छत उचकटून काढत अग्निशमन दलाच्या जवानानी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.घटनास्थळी महापालिकेच्या प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी तसंच लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी आगीबाबत माहिती घेतली. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते.
रात्री उशिरापर्यंत धुराचे लोट दिसत होते. बघ्यांनी याठिकाणी मोठी गर्दी होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments