Saturday, June 28, 2025
spot_img
Homeताज्यासरपंच सौ. शोभा शिवाजी पाटील यांचे गर्व महाराष्ट्राचा" या ऑनलाइन स्पर्धेत मत...

सरपंच सौ. शोभा शिवाजी पाटील यांचे गर्व महाराष्ट्राचा” या ऑनलाइन स्पर्धेत मत देण्याचे आवाहन

सरपंच सौ. शोभा शिवाजी पाटील यांचे गर्व महाराष्ट्राचा” या ऑनलाइन स्पर्धेत मत देण्याचे आवाहन

कोल्हापूर/प्रतिनिधी : रेडिओ सिटी या एफ. एम. चॅनेलच्यावतीने विधायक काम करणाऱ्यांसाठी “गर्व महाराष्ट्राचा” ही ऑनलाइन स्पर्धा सुरू आहे. आपणा सर्वांचे आशीर्वाद निश्चितच मला “गर्व महाराष्ट्राचा” या पुरस्कारापर्यंत पोहोचवतील, अशी अपेक्षा सरपंच सौ. शोभा शिवाजी पाटील यांनी व्यक्त केली आहे.
https://www.radiocity.in/gm/1 लिंकवर क्लिक करून ओपन झाल्यानंतर आपण माझ्या नाव व फोटोखालील चौकटीमध्ये क्लिक करा. त्यानंतर, लिंकच्या तळातील [I’m not a robot ] या पट्टीमधील चौकटीमध्ये क्लिक करून त्याखालील तळातील पट्टीमध्ये आपले मत SUBMIT करावे, अशी विनंती केली आहे.

त्यांच्याकडून गावामध्ये झालेले काम असे

गोरंबे, ता. कागल येथे गेल्या अडीच वर्षात ३० कोटीहून अधिक निधीची विकासकामे पूर्ण. शेत- शिवारातील पानंद रस्ते खडीकरण, गावातील अंतर्गत रस्ते डांबरीकरण, सांडपाणी व्यवस्थापन आदी कामे पूर्ण. पिण्याचे शुद्ध व मुबलक पाण्यासाठी जलजीवन पाणीपुरवठा योजना प्रगतीपथावर.(UNICEF) युनिसेफच्या सहयोगातून CHILD FRIENDLY – बालस्नेही हा पथदर्शी प्रकल्प महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम कागल तालुक्यात विद्या मंदिर -गोरंबे या शाळेमध्ये सुरू आहे.देशातील पहिली फ्युच्युरिस्टिक क्लासरूम “FUTURISTIC CLASSROOM” विद्यामंदिर गोरंबे या शाळेमध्ये साकारली. पहिलीपासून सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अभ्यासक्रम शिकविला जात आहे.
देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून प्राथमिक शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी PM- SHRI म्हणजेच PM – SCHOOLS FOR RISING INDIA या केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी व देश पातळीवरील योजनेमध्ये विद्यामंदिर गोरंबे शाळेचा समावेश. येत्या शैक्षणिक वर्षापासून शाळेमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण शिकविले जाणार आहे.गावात ५० बचतगटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण व आर्थिक उन्नतीकरण गतीने कार्यरत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments