Saturday, June 28, 2025
spot_img
Homeताज्याशाहू मिलमधील आयटी एक्स्पो प्रदर्शनाचा ३५० विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

शाहू मिलमधील आयटी एक्स्पो प्रदर्शनाचा ३५० विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

शाहू मिलमधील आयटी एक्स्पो प्रदर्शनाचा ३५० विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

अभियंता शाखेच्या विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन

कोल्हापूर/ प्रतिनिधी : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभाअंतर्गत आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूर च्या सहकार्यातून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये नेटवर्किंग मधील नवीन तंत्रज्ञान आणि आयओटी या विषयावर डॉ. अजित पाटील यांनी तर आयपीओसाठीची माहिती या विषयावर विराज सरनाईक यांनी कार्यशाळेत माहिती दिली. यामध्ये ३५० विद्यार्थी सहभागी झाले.
कार्यक्रमास असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप पाटील, सचिव रणजीत नार्वेकर, खजिनदार राहुल मेंच, संचालक मंदार पेटकर,आदिनाथ पाटील, विश्वजित देसाई, धवल चौगुले, प्रसना कुलकर्णी उपस्थित होते.
पदवी व पदविका घेऊन कॉलेज व युनिव्हर्सिटीमधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी जॉबफेअरचे आयोजन १३ आणि १४ मे २०२३ रोजी करण्यात आले आहे.
या सर्व कार्यक्रमांचा लाभ अभियंता शाखेच्या जास्तीत जास्त विद्यार्थी- विद्यार्थिनींनी तसेच नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आयटी असोसिएशनने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments