विविध प्रांतातील कलाकारांचा उद्या १३ व १४ मे रोजी शाहू मिलमध्ये कार्यक्रम
लोककलेतून दिली जाणार शाहू महाराजांना मानवंदना
कोल्हापूर/ प्रतिनिधी : विविध प्रांतातील कलाकारांचा लोककलेचा विनामूल्य कार्यक्रम श्री छत्रपती शाहू मिलमध्ये उद्या शनिवार दि.१३ मे व रविवार १४ मे रोजी सायंकाळी ६ ते ९ यावेळेत होणार आहे.
शनिवार १३ मे रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी भाऊसो पाटील यांचे ऍनिमेशन आणि कार्टून फिल्म निर्मिती आणि त्यातील चित्रकलेचे योगदान याबद्दल प्राथमिक माहिती कार्यशाळा घेण्यात येणार आहे.
नृत्य दिग्दर्शक सागर बगाडे यांची १४ मे रोजी सकाळी १०.३० ते १२.३० यावेळेत विविध नृत्य प्रकारांवर आधारित विनामूल्य प्रशिक्षण व सादरीकरण कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी होणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.