Friday, June 27, 2025
spot_img
Homeताज्याजीतोच्या अहिंसा रॅलीची गिनिस बुकने घेतली दखल उद्या होणाऱ्या स्पर्धेची तयारी पूर्ण...

जीतोच्या अहिंसा रॅलीची गिनिस बुकने घेतली दखल उद्या होणाऱ्या स्पर्धेची तयारी पूर्ण – गिरीश शहा

जीतोच्या अहिंसा रॅलीची गिनिस बुकने घेतली दखल उद्या होणाऱ्या स्पर्धेची तयारी पूर्ण – गिरीश शहा

कोल्हापूर – ३१ मार्च /प्रतिनिधी : जीतोच्या वतीने येत्या रविवारी, ता. २ एप्रिलला निघणाऱ्या अहिंसा रॅलीची लिम्का बुकबरोबर गिनिस बुकने दखल घेतली असून तशा स्वरूपाचे पत्र गिनिसच्या वतीने आल्याची माहिती जीतो चेअरमन गिरीश शहा यांनी आज दिली.जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या वतीने जगभरात भगवान महावीरांची बहुमोल उपदेश अहिंसा आणि शांततेचा प्रसार होण्यासाठी २ एप्रिलला रोजी अहिंसा रॅलीचे आयोजन केले आहे. देशभरामध्ये ६५ शहरांमध्ये ही रॅली निघेल. इतक्या मोठ्या प्रकारचा देशातील हा पहिला उपक्रम असल्याने त्याची नोंद लिम्का बुक आणि गिनिस बुक ऑफ वर्ल्डने घेतली आहे.
दरम्यान, कोल्हापुरात तीन, पाच आणि दहा किलोमीटर अशी रॅली निघेल. अलंकार हॉलपासून धैर्यप्रसाद हॉल ते कसबा बावडा येथील सेवा हॉस्पिटल पुढे व परत असा मार्ग आहे. यासाठी एकूण २५०० स्पर्धकांनी नोंद केली आहे. रविवारी सकाळी ६ वाजता स्पर्धेला सुरवात होईल. येथे खेळाबरोबर मनोरंजनाचे विविध प्रकार असतील.
स्पर्धेमध्ये ज्येष्ठ दिग्दर्शक महेश मांजरेकर, संजय घोडावत, आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील, मालोजीराजे छत्रपती, सौ. मधुरिमाराजे छत्रपती, जिल्हाधिकारी राहुल रेखावर, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे आदी सहभागी होणार आहेत.
स्पर्धेसाठी प्रत्येक खेळाडूला टी शर्ट, प्रमाणपत्र, चषक देण्यात येणार आहे. या कीटचे वाटप आजच रग्गेडियन जीम सासने ग्राऊंड येथे सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. लेडीज विंग चेअरमन श्रेया गांधी, सेक्रेटरी माया राठोड, आरती संघवी, वैशाली संघवी यांनी स्पर्धेसाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. यावेळी रोमचे कन्व्हेनर जितेंद्र राठोड, चीफ सेक्रेटरी अनिल पाटील, ट्रेझरर रमणलाल संघवी, राजीव पारीख, हर्षद दलाल, अतुल शहा, आशिष कोरगावकर, आकाश कोरगावकर,रवी संघवी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments