आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत पॅकर्स, भिडे, फायटर्स, मोगणे विजयी
कोल्हापूर/प्रतिनिधी : शांद फाऊंडेशन व परिवहन कल्चर स्पोर्टस् फाऊंडेशन यांच्यावतीने आयोजित आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत आज शास्त्रीनगर क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात पॅकर्स क्लबने सातारा संघाचा पराभव केला. पॅकर्स क्लबने प्रथम प्रलंदाजी करताना २० षटकात पाच बाद १३२ धावा केल्या. त्यामध्ये प्रतीक कदमने ४६ चेंडूत ६७ धावांची नाबाद खेळी केली. सातारा संघाच्या सिद्धार्थ जगदाळेने दोन बळी घेतले. सातारा संघाला सात बाद १२१ धावा पर्यंत मजल मारता आली. या सामन्यात प्रतीक कदम मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला.
दुसरा सामना भिडे स्पोर्ट्स विरुद्ध सागरमाळ स्पोर्ट्स यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना सागरमाळ स्पोर्ट्सने ११५ धावा केल्या. प्रणय अरमाळकरने २५ धावा केल्या. शरद पाटील चार बळी घेतले. भिडे स्पोर्ट्सने १८ षटकात ११६ धावा करून सहा विकेटने विजय मिळवला. त्यामध्ये तुषार पाटीलने २८ तर शरद पाटील नाबाद २२ धावा केल्या. शरद पाटील ऑल राऊंडर खेळी केली. त्याला मॅन ऑफ द मॅचने सन्मानित केले.
शिवाजी विद्यापीठ क्रिकेट मैदानावर रमेश कदम अकॅडमी व फायटर्स क्रिकेट क्लब यांच्यात सामना झाला. यामध्ये रमेश कदम अकॅडमीने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. फायटर्स क्लबने वीस शटकात १८५ धावा केला. उत्तरादाखल रमेश कदम अकॅडमीने ९३ धावा केल्या. फायटर्स क्लबने ९२ धावांनी हा सामना जिंकला. या सामन्यात करण सांगावकर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला.
दुसरा सामना कै. आण्णा मोगणे क्रिकेट क्लब व पोलाईट क्रिकेट क्लब यांच्यात खेळण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १७५ धावा केल्या. पोलाईटचा संघ १४८ धावा केल्या. मोगणे संघाने २७ धावांनी विजय मिळवला. ५५ चेंडूत ६८धावा करणारा सुरज कोंढाळकर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला.