भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या पंखांना उभारी देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील
७० टक्के महिला सक्षम मात्र लघु उद्योगाला महिलांनी प्राधान्य देणे आवश्यक – सौ.अरुंधती महाडिक
सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची दारे उघडी केली.भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून महिलांना विविध उपक्रमांच्या द्वारे सक्षम करण्याचे काम आम्ही करत आहोत यात ७० टक्के महिला या सक्षम झाल्या आहेत. मात्र त्यांनी आता छोटे छोटे लघु उद्योग सुरू करणे आवश्यक आहे.यासाठी भागीरथी संस्थेची दारे महिलांसाठी सदैव उघडी राहतील शिवाय शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्यांनी आपले नवनवीन व्यवसाय सुरू करणे आता काळाची गरज झाली आहे.अशी प्रतिक्रिया जागतिक महिला दिनानिमित्त भागीरथी महिला संस्था अध्यक्षा सौ.अरुंधती धनंजय महाडिक यांनी दिली आहे.
विविध क्षेत्रात महिलांनी प्रगती केली पाहिजे.शासनाच्या वेगवेगळ्या योजना महिला सक्षमीकरणासाठी राबवल्या जात आहेत. त्याचा उपयोग महिलांनी करून घेतला आहे. आज ७० टक्के महिला सक्षम झालेली आहे. मात्र अजूनही काही महिला या घराबाहेर पडत नाहीत असे चित्र आहे.आम्ही भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून बऱ्याच महिलांची प्रगती केली आहे.बऱ्याच महिलांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे.आज त्या आपापल्या ठिकाणी काम करत आहेत.आता व्हॅनद्वारे ही महिला फिरत आहेत त्याच्या आधारे महिला काम करत आहेत.आम्ही आता बांबू पासून काय बनविता येईल याचा प्रकल्प हाती घेणार असल्याचे सौ.महाडिक म्हणाल्या.यासाठी ही शासनाचे अनुदान व कर्ज त्यांना मंजूर होऊ शकते यासाठी सहकार्य आम्ही करतो.महिलांमध्ये आर्थिक स्थैर्य यायला पाहिजे. ती शिकली तर सगळं घर शिक्षित होतं तसं आर्थिक दृष्ट्या पण आजकाल त्यांनी पाऊल उचलणं आवश्यक त्यासाठी स्वतःचा एक छोटासा लघुउद्योग आहे शेतीपूरक व्यवसाय आहे.कुक्कुटपालन, शेळीपालन हे प्रकल्प राबवू शकतात.कॉर्पोरेट नवीन सेक्टर सुरू झाले त्यामध्ये फार्मर्स प्रोड्युस कंपनी म्हणून तुम्ही कंपनी अर्ज करू शकता आणि मग बचत गट आहेत तर किंवा ते बचत गटातला चार महिला जरी येईल असला तरी छोटी कंपनी फॉर्म करायची आणि दुग्ध व्यवसाय आणि स्मॉल स्केल इंडस्ट्रीला शासनाकडून महिलांसाठी आज मोठ्या प्रमाणात निधी मिळतो त्याचा उपयोग करू शकणार आहेत.व्हॅन द्वारे महिला भाजीपाला,फळे विकू शकणार आहेत.केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्या आम्ही भागीरथी संस्थेकडून माहिती देत आहोत त्याचा आधार घेऊन महिला आणखी गतीने काम करू शकणार आहे. गरोदर मातांना केंद्राकडून स्कीम आहेत त्याचा तिने माहिती घेऊन लाभ घेणे आवश्यक आहे.
अंगणवाडी सेविका व अशा वर्कर्स चांगल्या काम करतात त्यांच्या मार्फत इतर महिला माहिती घेऊ शकणार आहेत.चांगलं बाळ जन्माला यायला पाहिजे सुदृढ व्हायला हवे असेल तर तिने आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे.
२७ हजार हुन अधिक सभासद असणाऱ्या भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून आजवर अनेक उपक्रम राबविले जातात.
शेळी पालन
ग्रामीण भागातील निरक्षर निराधार महिलांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देऊन त्यांना सन्मानाने जगण्याची संधी देणारा शेळी पालन साखळी प्रकल्प.
*सामाजिक उपक्रम* पारंपरिक लोककलांचे जतन आणि युवती महिलांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी भव्य झिम्मा-फुगडी स्पर्धेचे आयोजन.मिस/मिसेस भागीरथी स्पर्धेतून व्यक्तिमत्व विकास पाककला,मेहंदी,रांगोळी, पुष्परचना स्पर्धेतून महिलांना व्यासपीठ.
व्यावसायिक प्रशिक्षण
महिलांना घरबसल्या अर्थार्जनाची संधी उपलब्ध करून देऊन त्यांना व्यावसायिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांद्वारे खाद्यपदार्थ बनवण्याचे व नीळ, फिनेल,उदबत्ती, सेंट इत्यादी वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देणारा उपक्रम.
*कळी उमलताना* किशोरवयीन मुलींसाठी स्त्रीत्वाची जाणीव जबाबदारी यांची ओळख करून देणारा उपक्रम तज्ञांकडून शंकाचे निरसन व शास्त्रशुद्ध माहिती देणारा प्रबोधनात्मक कार्यक्रम,मुलींना सॅनिटरी नॅपकिन वितरण,स्वसंरक्षण प्रशिक्षण.
आरोग्य शिबिरे
समाजातील सर्व स्तरांसाठी व वयोगटांसाठी मोफत आरोग्य सल्ला. तपासणी व उपचार, औषधांचे वाटप.परिस्थितीमुळे उपचार घेणे शक्य नसलेल्या रुग्णांना विशेष सहाय्य अपंगांना कृत्रिम साधनांचे वितरण.
वृक्षारोपण
जागतिक तापमान वाढ,निसर्गाचा समतोल यांचे भान ठेवून व्यापक प्रमाणात हाती घेतलेला वृक्षारोपण कार्यक्रम.रस्ते दुभाजकावरील झाडे रोपे जगविण्यासाठी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो.
महिलांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी निरनिराळ्या लघुउद्योगांची व कुटीरोद्योगांची उभारणी करणे, साक्षरता उपक्रमांतर्गत लहान मुले, महिला व प्रौढ शिक्षणासाठी विशेष कार्यक्रम राबविणे, महिलांना बचत गट स्थापण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांच्या पर्यंत शासकीय योजना पोचविणे,महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी प्रदर्शन महोत्सवाचे आयोजन करणे,महिलांना तंत्रकुशल बनवून त्यायोगे स्वावलंबी बनण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे,युवती व महिलांच्या सबलीकरणासाठी स्वसंरक्षण अशा पद्धतीने महिलांचा विचार केला जातो मात्र इतके करून न थांबता त्यांनी धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी व भागीरथी महिला संस्था प्रेरित भागीरथी युवती मंचचीही स्थापना केली आहे आणि त्याद्वारे स्किल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट,स्पर्धा परीक्षा, फॅशन मर्यादा,सामाजिक जनजागृती व महिलांचे दैनंदिन व्यवस्थापन शेतीपूरक व्यवसाय याविषयी युवतींना मार्गदर्शन करून तिला घडविले जाते व तिला शासकीय योजनांचीही माहितीही पोहोचवली जाते.आणि डोरे हॅण्डलूम च्या माध्यमातून तिला आवश्यक असणारे ड्रेस,साडी, कुर्तीज,पर्स,होम डेकोर, क्लोथींग,अँसेसरीजही उपलब्ध करून दिले आहेत व प्रत्यक्षरीत्या त्याठिकाणी महिलांना व युवतींना काम उपलब्ध करून दिले आहे.
सौ.अरुंधती धनंजय महाडिक
अध्यक्ष
भागीरथी महिला संस्था.
कोल्हापूर.