Tuesday, July 1, 2025
spot_img
Homeताज्याउद्याचा बलशाली भारत बनण्यासाठी स्त्रियांनी आत्मनिर्भर व शिक्षित बनणे गरजेचे

उद्याचा बलशाली भारत बनण्यासाठी स्त्रियांनी आत्मनिर्भर व शिक्षित बनणे गरजेचे

उद्याचा बलशाली भारत बनण्यासाठी स्त्रियांनी आत्मनिर्भर व शिक्षित बनणे गरजेचे – सौ.लता बळवंत पाटील.

 

एकेकाळी भारत देश पुरुषप्रधान देश होता. त्या काळात स्त्रियांचे शोषण होत होते किंवा स्त्रियांना इतर व्यवहारात भाग घेणे बंधनकारक होते. व शिक्षणापासून तिला वंचित राहावे लागत होते.पण त्यातून सुद्धा छत्रपती राजमाता जिजाऊ,छत्रपती ताराराणी, सावित्रीबाई फुले किंवा इंग्रजांबरोबर लहान मुलगा घेऊन हाती तलवार घेऊन लढणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई किंवा आजची सिंधुताई सपकाळ यांनी त्या त्यावेळी आपल्या कर्तव्याची चुणूक दाखविली आहेच.ते विसरता येणार नाही.
आज मात्र परिस्थिती अशी आहे की स्त्रीला आर्थिक सबलीकरण किंवा स्वतंत्रता मिळत आहे. तसेच वेगवेगळ्या बँकिंग क्षेत्रात स्त्रिया गतीने पुढे जात आहेत. तसेच शैक्षणिक बँकिंग,खेळात, शिक्षणात सर्व क्षेत्रात स्त्रिया आघाडीवर आहेत. ही अभिमानाची बाब आहे.स्रिया पुरुषाच्या पुढे जात आहेत. उद्याच्या काळात स्त्रियांना मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग होऊ शकेल का?अशी शंका मनात येत आहे. म्हणून प्रत्येक स्त्रीने आपापल्या क्षेत्रात काम करताना आपल्या राजमाता जिजाऊ, छत्रपती ताराराणी,सावित्रीबाई फुले किंवा सिंधुताई सपकाळ यांचे संस्कार व विचार डोळ्यासमोर ठेवून कार्यरत राहिले तर कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. जाता जात एवढेच म्हणेन की उद्याचा बलशाली भारत बनण्यासाठी स्त्रियांनी आत्मनिर्भर व शिक्षित बनणे गरजेचे आहे.
सौ.लता बळवंत पाटील यांना अमेडा चारिटेबल ट्रस्ट कोल्हापूर सर्वोत्तम रणरागिणी पुरस्कार २०२२ साली मिळालेला आह. उपसरपंच असताना ग्रामपंचायतच्या मानधनातून कोरोना काळात काम केलेल्या आशा वर्कर्स सिस्टर्स यांचा साडी चोळी व प्रमाणपत्र देऊन सत्कार केला आहे. व पतिच्या बळवंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मराठी शाळेत ४५ हजार एलईडी दिले आहेत. कोरोना काळात अडचणीत असणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय मदत दिली आहे. उपसरपंच असताना गावच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. गावातील तरुणांना खेळाचे प्रोत्साहन मिळावे यासाठी वेगवेगळ्या स्पर्धांना आर्थिक मदत केली आहे. गावातील महिलांसाठी झिम्मा फुगडी, रांगोळी, देशीगायपूजन यासारख्या कार्यक्रमांना बक्षीसे व प्रोत्साहन दिले आहे.

सौ.लता बळवंत पाटील.
भारतीय जनता महिला मोर्चा उपाध्यक्षा.
मा.उपसरपंच,चंद्रे.कोल्हापूर.
८२७५५२३९९७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments