Friday, January 10, 2025
Home ताज्या लाच घेणार नाही लाच देणार नाही प्रामाणिक आणि पारदर्शीपणे काम करेन जिल्हाधिकारी...

लाच घेणार नाही लाच देणार नाही प्रामाणिक आणि पारदर्शीपणे काम करेन जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली प्रतिज्ञा

लाच घेणार नाही लाच देणार नाही
प्रामाणिक आणि पारदर्शीपणे काम करेन
जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली प्रतिज्ञा

कोल्हापूर/ (जिल्हा माहिती कार्यालय) :  जीवनाच्या सर्व क्षेत्रात सत्यता आणि कायद्याच्या नियमांचे पालन करेन, लाच घेणार नाही, लाच देणार नाही सर्व कार्य प्रामाणिपणे आणि पारदर्शीपणे जनहितामध्ये काम करेन, व्यक्तीगत वागणुकीत प्रामाणिकपणा दाखवून उदाहरण प्रस्तुत करेन, भ्रष्टाचाराची कोणत्याही घटनेची माहिती योग्य एजन्सीला देईन, अशी सत्यनिष्ठा प्रतिज्ञा जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी आज घेतली.*
आजपासून दक्षता जनजागृती सप्ताहाला सुरूवात झाली आहे. यानिमित्ताने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या उपस्थितीत प्रतिज्ञा घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी या प्रतिज्ञेसह राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन केले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी स्मिता कुलकर्णी, तहसिलदार अर्चना शेटे, संतोष कणसे, रंजना बिचकर, पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील आदीसह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, सर्व व्यक्ती चांगल्या असतात. एखाद्याचीच प्रवृत्ती मोहाला बळी पडते आणि त्यामुळे त्या विभागाला दोष येतो. कोणत्याही आमिषाला अथवा मोहाला अजिबात बळी पडू नका. प्रामाणिकपणे, पारदर्शीपणे आपली कार्ये पार पाडा. घेतलेली प्रतिज्ञा अंमलात आणा, असे मार्गर्शन त्यांनी केले.
सत्यनिष्ठा प्रतिज्ञा
आपल्या देशाची आर्थिक, राजनितीक आणि सामाजिक प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा मोठा अडथळा आहे, असा माझा विश्वास आहे. या भ्रष्टाचार निर्मूलनासाठी सर्व भागधारक जसे की, सरकार, नागरिक आणि खासगी क्षेत्रातील यांनी एकत्रित येवून काम करण्याची आवश्यकता आहे. यावर माझा विश्वास आहे.
प्रत्येक नागरिकाने सावध रहायला पाहिजे आणि सदासर्वदा प्रामाणिकपणा व सत्यनिष्ठा यांच्या उच्चतम मानकाबाबत वचनबध्द असायला हवे आणि भ्रष्टाचाराविरूध्दच्या लढ्यात साथ द्यायला पाहिजे.
अंतत: मी शपथ घेतो की,
जीवनाच्या सर्व क्षेत्रात सत्यता आणि कायद्याच्या नियमांचे पालन करेन, लाच घेणार नाही, लाच देणार नाही सर्व कार्य प्रामाणिपणे आणि पारदर्शीपणे जनहितामध्ये काम करेन, व्यक्तीगत वागणुकीत प्रामाणिकपणा दाखवून उदाहरण प्रस्तुत करेन, भ्रष्टाचाराची कोणत्याही घटनेची माहिती योग्य एजन्सीला देईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये कोल्हापूर/ (जिमाका) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.आज सोमवार,दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी...

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान कोल्हापूर/प्रतिनिधी : आरोग्य, पर्यावरण, व्यसनाधीनता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन...

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये खादी ग्रामोद्योग मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये खादी ग्रामोद्योग मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांना सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालय...

घोडावत विद्यापीठात फ्लिप्ड लर्निंग पेडागाॅगी कार्यशाळा संपन्न

घोडावत विद्यापीठात फ्लिप्ड लर्निंग पेडागाॅगी कार्यशाळा संपन्न अतिग्रे/प्रतिनिधी : संजय घोडावत विद्यापीठातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने (आय क्यू ए सी) विद्यापीठातील प्राध्यापकांसाठी 'फ्लिप्ड लर्निंग...

Recent Comments