Tuesday, July 1, 2025
spot_img
Homeताज्यासुमंगलम विचार संपदा पुस्तकातून पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामींच्या विचारांचा संग्रह

सुमंगलम विचार संपदा पुस्तकातून पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामींच्या विचारांचा संग्रह

सुमंगलम विचार संपदा पुस्तकातून पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामींच्या विचारांचा संग्रह

कोल्हापूर/प्रतिनिधी : सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव समारंभाच्या दिमाखदार उद्घाटन सोहळ्यात पत्रकार गुरुबाळ माळी लिखित “सुमंगलम विचार संपदा” या पुस्तकाचे प्रकाशन झाले. श्री क्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठाचे मठाधिपती पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या विचारांचा संग्रह असलेल्या या साहित्यकृतीचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
कणेरी मठ परिसरात २० ते २६ फेब्रुवारी या दरम्यान होत असलेल्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवच्या उद्घाटन सोहळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य भैय्याजी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली व हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा समारंभ झाला. पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.
“पर्यावरण संवर्धनाच्या जागरासाठी सुमंगलम लोकोत्सव कार्यक्रम हा प्रेरणादायी ठरणार आहे. स्वामीजींचे अध्यात्म आणि विज्ञान यांचा सांगड घालत समाजाची उन्नती साधण्याचे विचार कार्य या पुस्तकाच्या माध्यमातून नागरिकापर्यंत पोहोचणार आहे. स्वामीजींच्या विचार कार्यावर आधारित या पुस्तकामुळे पर्यावरण जागर, अध्यात्माचे महत्त्व, अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून झालेला समाजाचा विकास हे सारे समाजातील वेगवेगळ्या घटकांना नेहमी चांगल्या कामासाठी प्रवृत्त करेल.”असे कौतुकोदगार मुख्यमंत्री शिंदे यांनी काढले.पत्रकार गुरुबाळ माळी यांचे हे अकरावे पुस्तक आहे. अक्षर दालनने ते प्रकाशित केले आहे. या पुस्तकाच्या निर्मितीचे उपस्थित साऱ्याच नेत्यांनी कौतुक केले.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, खासदार अण्णासाहेब जोले, आमदार प्रकाश आवाडे आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, राज्य पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा समारंभ झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments