पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य अशा “सतेज कृषी प्रदर्शनास आजपासून होणार प्रारंभ
अडीचशे स्टॉल, पशुपक्ष्यांसह सहभाग : सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
२३ ते २६ डिसेंबर कालावधीत पार पडणार प्रदर्शन
गुजरात काँग्रेसचे नेते आमदार जिग्नेश मेवानी यांच्या हस्ते होणार आज प्रदर्शनाचे उदघाटन
कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा कोल्हापूर, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने पश्चिम महाराष्ट्रातील भव्य असे “सतेज कृषी प्रदर्शन २०२२ याचे आयोजन २३ ते २६ डिसेंबर २०२२ या कालावधीत तपोवन मैदान येथे करण्यात आले आहे. यामध्ये अडीचशे हून अधिक स्टॉल सहभागी होणार आहेत. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचे उदघाटन आज शुक्रवारी २३ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता गुजरात काँग्रेसचे नेते आमदार जिग्नेश मेवानी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी मंत्री हसन मुश्रीफ, मा. खा.राजू शेट्टी, मा. खा. निवेदिता माने, आ.पी एन पाटील, आ. राजूबाबा आवळे, आ. जयंत आसगावकर, आ. राजेश पाटील, आ. ऋतुराज पाटील, मा. आ. के पी पाटील, उल्हास पाटील, सुजित मिणचेकर, सुरेश साळोखे, राजीव आवळे, ए वाय पाटील, गणपतराव पाटील, गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, कर्णसिंह गायकवाड, सत्याजित जाधव, अमरसिंह पाटील, आर. के. पोवार, सचिन चव्हाण आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी मंत्री व प्रदर्शनाचे आयोजक आ. सतेज पाटील यांनी पत्रकातून दिली.
या प्रदर्शनात देश – विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग आहे. याचबरोबर पशुपक्षी दालन, शेतकऱ्यांना तज्ञांकडून मार्गदर्शन, विविध कंपन्यांची उत्पादने व शेतकऱ्यांसाठी नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान, मशिनरी यांची माहिती एकाच छताखाली याठिकाणी मिळणार आहे. यावर्षी २०२२ साली होत असलेले हे ४ थे वर्ष असून या प्रदर्शनामध्ये शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्री होणारा तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सव, २०० पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग, २०० पेक्षा अधिक पशु-पक्षांचा सहभाग, शेती विषयक तज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्र, विविध शेती अवजारे, बी-बीयाणे खते आदींची माहिती, फुलांचे प्रदर्शन व विक्री (पुष्पप्रदर्शन) विविध सांस्कृतिक कार्यक्रम व बचत गटांचे मोफत स्टॉल, लहान मुलांसाठी अम्युझमेंट पार्क आदींचा समावेश आहे.
देशातील आघाडीच्या संशोधनपर उपयुक्त शेती साहित्य निर्माण करणाऱ्या रिलायन्स पॉलीमर्स, महालक्ष्मी शेती विकास केंद्र, संजय घोडावत ग्रुप यांचे प्रायोजकत्व प्रदर्शनाला लाभले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, आत्मा कोल्हापूर, जिल्हा परिषद, पणन विभाग यांचे सहकार्य लाभले आहे. यासाठी असोसिएशन ऑफ कोल्हापूर बी-बियाणे, किटकनाशके, रासायनिक खत व्यापारी, कोल्हापूर संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील, धीरज पाटील, रिलायन्स पॉलिमरचे सत्यजित भोसले, स्काय स्टार इव्हेंटचे स्वप्निल सावंत हे कार्यरत आहेत.
या प्रदर्शनामध्ये देशातील आघाडीच्या व विदेशी संलग्नीकरण असलेल्या विविध कृषी क्षेत्रातील संस्था सहभागी होत आहेत. यामध्ये गोकुळ दूध संघ, ओंकार बंब, पाटील ऑईल मशीन, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सिद्धीक ऑईल, मयुरेश इंडस्ट्रीज, मिल्क फूड इंजिनियर्स, धनलक्ष्मी आटा चक्की, समृद्धी सोलर आणि मालपाणी ग्रुप, फिनोलेक्स श्री एंटरप्राईजेस, संकेत बायो, रोहन हायटेक ॲग्री, कृष्णा ट्रेडर्स, नवजीवन ॲग्रो, बेनेली बाईक, युनिक ह्युंडाई, कदम बजाज, चेतन मोटर्स, पॉवर सोल्युशन, रॉयल इन्फिल्ड, पॉवर ट्रेलर्स, ट्रॅक्टर रेनबो कंटेनर्स, बी-बियाणे शेतीची अवजारे, खते औषधे आदी उत्पादने पाहावयास मिळणार आहेत. शिवाय शेतीची नवीन माहिती व अन्य नवनवीन औजारे पहावयास मिळणार आहेत. प्रदर्शनामध्ये पीक स्पर्धा, पुष्प स्पर्धा, खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे. त्याचबरोबर तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याचबरोबर काही शेतकऱ्यांना शेतीभूषण पुरस्कार, आदर्श शेतकरी पुरस्कार आणि कृषी विभागाच्या वतीने उत्कृष्ट शेतकऱ्यांचा आणि खाद्य स्टॉल स्पर्धा पशुस्पर्धांची बक्षीसही दिले जाणार आहेत. शिवाय आत्माच्या वतीने ही शेतकरी गट कंपन्यांची माहिती दिली जाणार आहे. या प्रदर्शनात तांदूळ महोत्सव देखील भरविण्यात आला असून यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी २४, भोगावती, इंद्रायणी अशा नमुन्यांचे तांदूळ शेतकऱ्यांकडून थेट विक्रीसाठी उपलब्ध केले जाणार आहे. तर पाणलोट व्यवस्थापन, पाचट व्यवस्थापन आणि हायड्रोलिक चारा तयार करणे.या प्रदर्शनात विविध प्रकारचे जनावरे पशुपक्षी पहावयास मिळणार असल्याची माहिती *माजी मंत्री आ. सतेज पाटील यांनी दिली.
आयोजित व्याख्याने
दिनांक विषय तज्ञांचे नांव
शनिवार दि. २४/१२/२०२२
सकाळी ११ ते १२.३० सातत्यपूर्ण एकरी १०० टन ऊस उत्पादन श्री. अरुण देशमुख –
प्रमुख कृषी विद्या विभाग नेटाफिन इरिगेशन पुणे
शनिवार दि. २४/१२/२०२२दुपारी १२.३० ते २ सातत्यपूर्ण एकरी १०० टन ऊस उत्पादन श्री सुरेश कबाडे,
शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी
रविवार दि. २५/१२/२०२२
स. ११ ते दु. १२.३० जनावरांचे रोग व्यवस्थापन डॉ. सॅम लुद्रिक
पशुधन विकास अधिकारी रोग अन्वेषण प्रयोगशाळा कोल्हापूर
रविवार दि. २५/१२/२०२२
दुपारी १२.३० ते २ दुग्ध व्यवसाय कुटुंबाचा आर्थिक आधार श्री. अरविंद पाटील
प्रगतशील दूध उत्पादक शेतकरी मु.पो. नाणीबाई चिखली कोल्हापूर