शिक्षक समितीचे सामाजिक काम कौतुकास्पद- महापौर निलोफर आजरेकर
शिक्षक समितीच्यावतीने पंचगंगा व आयसोलेशनला मदत सुपूर्त
कोल्हापूर/प्रतिनिधी : शिक्षक समितीने शैक्षणिक कामकाजाबरोबरच सामाजिक बांधिलकीच्या भूमीकेतून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आरोग्य विभागास केलेली मदत सर्वार्थाने महत्वाची आणि कौंतुकास्पद असल्याचे प्रतिपादन महापौर निलोफर आजरेकर यांनी केले.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने महानगरपालिकेच्या पंचगंगा हॉस्पिटल, आयसोलेशन कोविड केअर सेंटरला दीड लाखाहून अधिक रुपयांची औषधे व पंचगंगा स्मशानभूमीस साहित्यरुपाने मदत आज महापौर निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या उपस्थितीत देण्यात आली. त्यावेळी महापौर निलोफर आजरेकर बोलत होत्या, कार्यक्रमास महिला व बालकल्याण सभापती शोभा कवाळे, उपायुक्त निखील मोरे, शिक्षक समितीचे राज्य प्रमुख सुधाकर सावंत, राज्य उपाध्यक्ष उमेश देसाई, प्रशासन अधिकारी शंकर यादव आदि मान्यवर उपस्थित होते.
शिक्षक समितीच्यावतीने महापालिकेच्या दवाखान्यांसाठी केलेली मदत उपयुक्त ठरणारी असल्याचे सांगून महापौर निलोफर आजरेकर म्हणाल्या की, शिक्षक समितीच्यामार्फत विद्यार्थी, शिक्षक व समाजासाठी भरीव काम होत असून यापुढील काळातही सामाजिक बांधिलकीच्या भूमीकेतून कोरोना संसर्ग रोखण्याकामी महापालिकेस अधिकाधिक मदत करण्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
शिक्षक समितीची मदत मोलाची – आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यावेळी बोलतांना आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या की, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने सामाजिक बांधिलकीतून महापालिकेस केलेली मदत सर्वार्थांने मोलाची आहे. कोरोना काळात शिक्षकांनी स्वतः विविध कामे करून सर्व ठिकाणी प्रशासनास सहकार्य केले,
महापालिकेच्या कोरोना प्रतिबंधक उपायायेाजनांना आर्थिक मदतही करुन शिक्षक समितीने समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे हे मदतकार्य कौतुकास्पद व आदर्शावत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर शिक्षकांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची मोठी आघाडी असून यापुढे शिक्षकांनी हा वसा नेटाने सुरु ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी शिक्षक समितीचे राज्य प्रमुख सुधाकर सावंत, प्रशासन अधिकारी शंकर यादव यांनी मनोगते व्यक्त केली. राज्य उपाध्यक्ष उमेश देसाई यांनी शिक्षक समिती विद्यार्थी, शिक्षक व समाजाच्या भल्यासाठी राबवत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली . यावेळी पंचगंगा हॉस्पिटलच्या वतीने गरोदर मातांना विविध शासकीय योजनांची माहिती असलेली फाईल तयार करण्यात आली . त्याचे उद्घाटन यावेळी मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले, .ही फाईल गरोदर मातांना अत्यंत उपयुक्त अशी माहिती देणारी ठरणार आहे .
कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक सुधाकर सावंत यांनी केले .सूत्रसंचालन डॉ .स्वाती खाडे -पाटील यांनी केले .आभार शहराध्यक्ष संजय पाटील यांनी मानले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश जाधव ,पंचगंगा हॉस्पिटलच्या मेडिकल ऑफिसर डॉ. विद्या काळे ,नयना बडकस, आशालता कांजर, शैक्षणिक पर्यवेक्षिका उषा सरदेसाई ,प्रकाश पाटील, संजय कडगांवे,तानाजी पाटील, वसंत आडके, सुभाष धादवड,सुनील पाटील ,उत्तम कुंभार, मजीद नदाफ ,संतोष कदम ,मनोहर शिंदे, विठ्ठल दुर्गुळे, मनोज सौरभ, योगेश व्हटकर, मंगेश चव्हाण,फारुख डबीर ,शकील भेंडवडे, जलील शेख ,अनिल बचाटे ,हनीफ नाकाडे, अधिक कार्यकर्ते उपस्थित होते त्याचबरोबर पंचगंगा हॉस्पिटलचा स्टाफ यावेळी उपस्थित होता .