शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अभिप्रेत हिंदुत्व आणि जनसामान्यांच्या कार्याचा वसा जपणाऱ्या श्री.राजेश क्षीरसागर यांच्या कार्याचा सार्थ अभिमान
कोल्हापूर आणि राजेश क्षीरसागर हे कधीही न तुटणार अतूट नात : पालकमंत्री नाम.मा.श्री.दीपक केसरकर : पालकमंत्री नाम.मा.श्री.दीपक केसरकर
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा.श्री.राजेश क्षीरसागर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा
कोल्हापूर/प्रतिनिधी : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेल्या राजेश क्षीरसागर यांनी गेल्या अनेक वर्षात केलेल्या समाजकार्यास कोल्हापूर वासियांनी मोलाची साथ दिली आहे. त्याचपद्धतीने राजेश क्षीरसागर यांनीही कोल्हापूरच्या विकासासाठी केलेले प्रयत्न त्यांच्या कोल्हापूरवासियांवरील प्रेमाचा दाखला देते. त्यामुळे कोल्हापूर आणि राजेश क्षीरसागर हे कधीही तुटणार अतूट नात असून, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत हिंदुत्व आणि जनसामान्यांच्या कार्याचा वसा जपणाऱ्या राजेश क्षीरसागर यांच्या कार्याचा मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे साहेबांसह आम्हा सर्वांना सार्थ अभिमान असल्याचे गौरोवोद्गार राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.मा.श्री.दीपक केसरकर यांनी केले. राज्य आयोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास ते उपस्थित होते.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांचा वाढदिवस शिवसैनिकांसह समर्थकांकडून जल्लोषाने साजरा करण्यात येतो. गेली दोन वर्षे कोरोना संसर्गामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय श्री.राजेश क्षीरसागर यांनी घेतला होता. परंतु, यावर्षी शिवसैनिकांच्या उत्साहाने आणि जल्लोषी वातावरणात आपल्या लाडक्या नेतृत्वाचा वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन शहरातील पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी केले. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी राजकारणापेक्षा समाजकार्याला अधिक महत्त्व देत शहरात विविध स्पर्धा व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्यासह कुटुंबीयांनी आई अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पत्नी देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर, चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर, स्नुषा सौ.दिशा क्षीरसागर, चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर, नातू कु.कृष्णराज आणि कु.आदिराज सोबत होते.
यानंतर रोजी शिवसेना विभाग मंगळवार पेठ यांचे वतीने मिरजकर तिकटी येथील अंधशाळेतील मुलांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा केला यावेळी मुलांना स्नेहभोजन देण्यात आले. राजारामपुरी विभागाच्या वतीने पांजरपोळ येथे श्री.राजेश क्षीरसागर व सौ.वैशाली क्षीरसागर यांनी गोमाता पूजन करून जनावरांना चारा वाटप केले. यासह युवा सेनेच्या वतीने आई अंबाबाई आणि श्री जोतीबा येथे श्री.राजेश क्षीरसागर यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी महाअभिषेक आणि साकडे घालण्यात आले. शिवसेना विभाग जुना बुधवार पेठ यांच्यावतीने रुग्णांना फळेवाटप, शिवसेना विभाग शुक्रवार व उत्तरेश्वर पेठ यांच्या वतीने गोरगरिबांना चादर व भोजन वाटप, संभाजी नगर विभागाच्या वतीने रेसकोर्स नाका येथे आरोग्य शिबीर, शिवसेना विभाग लक्षतीर्थ वसाहत यांचेवतीने मातोश्री वृद्धाश्रम येथे फळेवाटप, शिवसेना विभाग शिवाजी पेठ यांच्यावतीने पतंगासह आकाशदिवे स्पर्धा, शिवसेना विभाग मुक्त सैनिक यांच्या वतीने स्प्लेंडर सौंदर्य स्पर्धा पार पडल्या. यासह शनिवार पेठ येथील कु.ओंकार यादव या युवकाने या ५४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक दोऱ्याने ५४ पतंग आकाशात उडवून अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या.
दरम्यान दिवसभरात राज्याचे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री ना.मा.श्री.देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील, उद्योग मंत्री नाम.मा.अनिल परब, पाणीपुरवठा मंत्री नाम.गुलाबराव पाटील, मंत्री नाम.दादाजी भुसे, सदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार जयंत आसगावकर आमदार शहाजी पाटील, मा.आमदार चंद्रदीप नरके आदी मान्यवरांनी दूरध्वनी द्वारे शुभेच्छा दिल्या. तर खासदार संजय मंडलिक, तरुण भारतचे ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.
सायंकाळी शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, शनिवार पेठ येथे जल्लोषी वातावरण निर्मिती करण्यात आली होती. सायंकाळी ७ वाजता पालकमंत्री नाम.मा.श्री.दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा.श्री.राजेश क्षीरसागर यांचे आगमन झाले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यानंतर प.म.देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर, सौ.दिशा क्षीरसागर यांच्यासह शिवसेना महिला आघाडीकडून श्री.क्षीरसागर यांचे औक्षण करण्यात आले. यानंतर चांदीच्या तलवारीने श्री.क्षीरसागर यांनी केक कापला. यावेळी शाहीर आझाद नायकवडी यांनी कार्यकारी अध्यक्ष मा.श्री.राजेश क्षीरसागर यांचेवरील पोवाड्याचे सादरीकरण केले.यानंतर मा.श्री.राजेश क्षीरसागर साहेबांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या मा.मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी पत्रांचे वितरण पालकमंत्री ना.मा.श्री.दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने प्रबोधनकार ठाकरे बाल संकुलास रु.१० हजारांची मदत करण्यात आली. सदर रक्कम पालकमंत्री ना.श्री.केसरकर यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आली. यानंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेत मा.श्री.राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली मनसे विद्यार्थी सेनेचे शहरप्रमुख मंदार पाटील आणि विपुल अशोक भंडारी यांचा भगवा ध्वज देवून त्यांच्या कार्यकर्त्यांसह प्रवेश करण्यात आला. यानंतर शिवसेना विभाग शिवाजी पेठ यांच्या वतीने आयोजित “कोण होणार वर्ल्ड कप विजेता” स्पर्धेचा लकी ड्रॉ अनावरण सोहळा कोल्हापूर शहरातील सिनियर फुटबॉल संघाच्या खेळाडूंच्या उपस्थितीत पार पडला. यानंतर कसबा बावडा विभाग आयोजित “होम मिनिस्टर” स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यामध्ये विजेत्यांना ओव्हन, गॅस शेगडी, मायक्रो ओव्हन अशी बक्षिसे देण्यात आली.
यावेळी बोलताना पालकमंत्री नाम.मा.श्री.दीपक केसरकर यांनी, आजपर्यंत कोल्हापूर वासियांनी राजेश क्षीरसागर यांच्यावर विशेष प्रेम केले याची प्रचीती वेळोवेळी येते. आज ते उच्च पदी विराजमान आहेत. शिवसेनेत झालेल्या क्रांती मध्येही त्यांचा मोलाचा वाटा असून, कोल्हापूरच्या विविध प्रश्नासंदर्भात ते नेहमीच आग्रही भूमिका मांडतात. त्याचमुळे आम्हीही त्यांनी दिलेली हाकेला साद देत वेळोवेळी कोल्हापूरच्या विविध प्रश्नांसाठी सकारात्मक भूमिका घेत आलो आहे, असे सांगत श्री.राजेश क्षीरसागर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, माजी महापौर महादेवराव आडगुळे, मा.महापौर सौ.सरिता मोरे, माजी नगरसेवक सत्यजित कदम, माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, जिल्हाप्रमुख रविंद्र माने, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, महानगर समन्वयक जयवंत हारुगले, शहरप्रमुख रणजीत जाधव, महिला आघाडी महानगरप्रमुख मंगलताई साळोखे, महानगरसमन्वयक श्रीमती पुजा भोर, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, किशोर घाटगे, रमेश खाडे, तुकाराम साळोखे, अमोल भास्कर, रिक्षा सेना जिल्हा समन्वयक विक्रम पवार, जिल्हाप्रमुख रमेश पोवार, शहरप्रमुख अल्लाउद्दिन नाकाडे, फेरीवाले शहरप्रमुख अर्जुन आंबी, युवा सेना शहरप्रमुख पियुष चव्हाण, शिवसेना उपशहरप्रमुख अंकुश निपाणीकर, सुरेश माने, कपिल नाळे, योगेश चौगले, अभिषेक काशीद, धनाजी कारंडे, मंदार तपकिरे, दीपक चव्हाण, निलेश हंकारे, सचिन भोळे, राजू पुरी, किरण पाटील, कपिल सरनाईक, कपिल केसरकर, विभागप्रमुख विनय वाणी, मुन्ना तोरस्कर, रणजीत मंडलिक, प्रदीप मोहिते, बंडा माने, श्रीकांत मंडलिक, सुजय संकपाळ, किरण पाटील, सचिन क्षीरसागर, रणजीत सासणे आदी उपस्थित होते.