कोल्हापूरच्या के. एम. टी. च्या चाकांना गती देणारे मेकॅनिकल चंदू मेस्त्री परिवहन समिती
(के.एम.टी.) च्या सभापतीपदी,कोल्हापूरचा अभिमान वाढला
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरच्या स्क्रॅप झालेल्या के.एम. टी दुरुस्त करून प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिलेल्या मेकॅनिकल चंदू मेस्त्री यांनी कोल्हापूरच्या के.एम. टी परिवहन समिती सभापती पदी काम करण्याची संधी मिळाली आहे.त्यांनी केलेल्या कार्यामुळेच त्यांना ही संधी मिळाली आहे असे म्हंटले तरी वावगे होणार नाही अशा निर्णयामुळे कोल्हापूरचा अभिमान आणखी वाढला आहे.
साधारण २००३ चे साल असावे, कोल्हापूर महानगरपालिकेच्या के.एम.टी.विभागाची परिस्थिती अतिशय बिकट होती, यावेळी सुनिल मोदी हे या परिवहन समितीचे सभापती होते. त्यांनी पूर्ण व्यापारी धोरण अवलंबून के.एम.टी. ला उर्जित अवस्था आणण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वीही झाला. नविन बस खरेदी करण्यासाठी
निधी नव्हता. वर्कशॉपमध्ये सुमारे ५०हून अधिक बसगाडया बंद अवस्थेत होत्या.
अशावेळी सभापती सुनिल मोदीनी कार्यकर्ते असणाऱ्या ट्रक मेकॅनिकल चंद्रकांत
सुर्यवंशीची (चंदू मेस्त्री) मदत घेतली. बंद असलेल्या बसमधून स्वत: चंदूमेस्त्रींनी
महापालिका वर्कशॉप मधील कर्मचाऱ्यांच्या मदतीने हातात हत्यारे घेऊन बंद म्हणजे
स्कॅप करायच्या बसगाडया रिपेअरी केल्या आणि रस्त्यावर आणून प्रवाशी वहातुकीला
चालू केल्या आणि केएमटी प्रशासनाला उर्जित अवस्थेत आणण्याच्या कामात मोलाची
मदत केली.
आजही ते आपल्या स्कूटरवरुन रस्त्याने जात असतील आणि रस्त्यावर धावणाऱ्या के.एम.टी. बसमध्ये काही बिघाड दिसत असेल तर ते बस थांबवून सांगतात आरे जॉईंटची नट लूज झालेत गाडीत पाना असेल तर ड्रायव्हरला ती नट टाईट करुन दयायला स्वत: मदत करतात, गाडीच्या आवाजामध्ये फरक दिसल्यास ड्रायव्हरला सांगतात अरे रेडीएटरमध्ये पाणी कमी आहे अगोदर पाणी घाल एखादया बसमध्ये
गियर टाकताना आवाज आला तर रस्त्यातच थांबवून सांगतात आरे तुला कोणी लायसन दिलय पूर्ण क्लच दाबून गियर टाकायचा असतो, गियर मोडतोस काय आधीच के.एम.टी. अडचणीत आहे असे समजावणारा हा जेष्ठ अनुभवी ट्रक मेकॅनिकल आजही
पांजरपोळ औद्योगिक वसाहतीत मुलाच्या सोबतीन ट्रक रिपेअरीचा व्यवसाय करतोस.
शिवाजी पेठेतील सामान्य शेतकरी कुटुंबातील हे तत्कालीन शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी विचारात वाढलेले आपला कामधंदा सांभाळून पांजरपोळ औद्योगिक वसाहतीचा विद्यमान अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा
कार्यकर्ता म्हणून शहरात कार्यरत आहे. यांच्या या के.एम.टी. ला मदत करण्याऱ्या
कार्याची दखल घेवून राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची महापालिका परिवहन समितीवर स्विकृत सदस्य म्हणून निवड केली. परिवहन विभागालाही चंदू मेस्त्रींच्या अनुभवाचा मदतीचा फायदाच होतोय.
राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष मा. राजेश क्षीरसागर यांनी अशा कार्यकर्त्याचा
सन्मान झालाच पाहिजे हा विचार घेऊन, पालकमंत्री नाम, सतेज पाटील, ग्रामविकास
मंत्री, नाम, हसन मुश्रीफ यांच्या सहकार्याने चंदू मेस्त्रीना परिवहन समिती सभापती पदाचा सन्मान दयायचा निश्चय केला त्याला महापालिकेतील सत्तारुढ गटाबरोबरच
विरोधी आघाडीनेही एक के.एम.टी. ला आपल मानून सदैव सहकार्य करणाऱ्या मेकॅनिकल कार्यकर्त्यांचा सन्मान करायला दिलदार मनान मदत करुन कार्यकर्त्यांच्या बिनविरोध निवडीस सहकार्य दिले.
या पदावर आल्यावर लोक काम करतात इथ मात्र वेगळच चित्र दिसतय पदावर
नसताना के.एम.टी. ची सेवा आणि नंतर केलेल्या कामाचा सन्मान म्हणून पद हे वेगळेच समीकरण पहायला मिळतय या निमित्तान एक मात्र ठळक होतय की बऱ्याच संस्थात तज्ञ सदस्य किंवा संचालकांची त्या संस्थेस मदत व्हावी म्हणून निवड केली जाते. पण आज तज्ञ म्हणून काहीच अनुभव नाही केवळ राजकीय सोय म्हणून
कोणाच्याही नियुक्त्या केल्या जातात पण याला चंदूमेस्त्री निश्चितच अपवाद आहेत.
खऱ्या अर्थाने अशाच तज्ञ लोकांची कायदयानुसार निवड होण गरजेचे आहे. असो
सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या सामान्य मेकॅनिकल चंद्रकांत सुर्यवंशी यांचा सभापतीपदी सन्मान होतोय ही सामान्य माणसास निश्चितच आनंद देणारी घटना आहे.कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती समस्त कार्यकर्ते यांनी चंदू मेस्त्री याचे अभिनंदन केले असून सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.पहिला निवड आणि नंतर काम हे या निवडीमुळे समीकरण बदलले आहे चंदू मेस्त्री यांनी आधी काम आणि आता त्यांची निवड झाली हे केवळ कोल्हापूरमध्येच घडू शकते.