गुजरीचा गोविंदा दहीहंडी उत्सव ठरणार शहराचे आकर्षण
पारंपारिक उत्साह आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड – एक लाखाचे बक्षीस – झांज पथक – बहारदार मनोरंजनाने होणार सादरीकरण
कोल्हापूर/प्रतिनिधी : कृष्ण जन्माष्टमीचा असलेला पारंपारिक उत्साह आणि त्यास त्या आधुनिक साऊंड : संगीत आणि लाईट इफेक्ट ची जोड त्याचबरोबर हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीच्या डान्स ग्रुप, करवीर झांज पथकाचे सादरीकरण, अशा विविध पैलूंनी यंदाचा गुजरीचा गोविंदा दहीहंडी उत्सव हा शहराचे खास आकर्षण ठरणार आहे.शुक्रवारी १९ रोजी दुपारी ४ वाजता याची सुरुवात होणार आहे.समस्त करवीर वासियानी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगरसेवक किरण नकाते व सराफ संघ अध्यक्ष राजेश राठोड यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.कोरोना काळातील दोन वर्षाच्या दोन वर्षाची मरगळ दूर करत यंदा हा वर्ष उत्सव उद्या दिमाखात आणि भव्यतेने सादर केला जाणार आहे. त्यासाठी न्यू गुजरी बद्दल मित्राचे शंभर अधिक कार्यकर्ते नियोजनासाठी सक्रिय झालेले आहेत .
ही गुजरीची गोंविदा दहीहंडी फोडणाऱ्या गोंविदा पथक मंडळास रोख रुपये एक लाख रुपये बक्षीस तसेच पाच आणि सहा थर लावून सहभागी गोविंदा पथकांना प्रत्येकी पाच हजार रुपये प्रोत्साहन पर बक्षीस दिले जाणार आहे .कोरोनामुळे दोन वर्षात जरी भव्य प्रमाणात दहीहंडी सोहळा झाला नसला तरीही न्यु गुजरी मित्र मंडळाने सामाजिक जबाबदारी जपत कोरोना काळात फ्रंट लाईन वर्कर म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर्स परीचारिका , आशावर्कर , शासकीय अधिकारी, विविध समाजाचे पदाधिकारी यांचा जाहीर सत्कार एक वर्ष केला होता. तर त्यानंतर त्याच वर्षी व्हाईट आर्मी संस्थेला पुर परिस्थीतीत वापरण्याची आधुनिक यांत्रिक बोट भेट दिली होती. अशा प्रकारे दहीहंडीतून सामाजिक दायित्व ही न्यु गुजरी मित्र मंडळाने जपलेले आहे . यंदाच्या वर्षी प्रथमच गुजरी चौकातील दहीहंडी ही आधुनिक लेझर लाईट इफेक्ट यासह आधुनिक अशी ध्वनी यंत्रणा आणि हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील गाजलेले नृत्याविष्कार हे वैशिष्ट्य असणार आहे .मुंबईचा सुप्रसिद्ध लौकिक अहिरे बॉलीवूड डान्स ग्रुप यांच्यासह आघाडीची नृत्यांगना धनिया पांडे, लावण्या जगताप , लावणी फेम गौरी जाधव यांचे नृत्याविष्कार या सोहळ्याचे आकर्षण ठरणार आहे . याच बरोबरीने या सोहळ्यासाठी वस्त्र उद्योग मंत्री भाजप नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह माजी आमदार महादेवराव महाडिक,अमल महाडिक , भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे ,महेश जाधव , सुहास अण्णा लटोरे ‘कोल्हापूर सराफ असोशिएशन अध्यक्ष राजेश राठोड , कोल्हापूर जिल्हा सराफ असोशिएशन अध्यक्ष भारत भाई ओसवाल , ईश्वर परमार अशिष ढवळे यांच्यासह मुंबईतील उद्योगपती संतोष पाटील , युथ ग्रुपचे संस्थापक सेजल सावंत आदी सह विविध मान्यवरांची यावेळी या सोहळ्यास उपस्थिती राहणार आहे . महिला आणि लहान मुलांची हा सोहळा पाहण्यासाठी स्वतंत्र्य व्यवस्था ही करण्यात आली असून व्हाईट आर्मीचे जवान यावेळी सक्रीय असणार आहेत.तरी या अविस्मरणीय अशा ‘ गुजरीचा गोंविदा ‘ दहीहंडी सोहळ्याचा करवीर करांनी आनंद घ्यावा, असे आवाहन संयोजक न्यू गुजरी मित्र मंडळ वतीने माजी नगरसेवक किरण नकाते आणि माधुरी नकाते , अमर नकाते , युवराज जोशी , दिलीप सांगावकर , निखील कटके , राजेश राठोड , विजय हावळ , मनोज बही रशेठ आणि सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी केले आहे.