Tuesday, July 1, 2025
spot_img
Homeताज्याकसबा सांगावकरांना जलजीवन योजनेचे मुबलक पाणी - आमदार हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

कसबा सांगावकरांना जलजीवन योजनेचे मुबलक पाणी – आमदार हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

कसबा सांगावकरांना जलजीवन योजनेचे मुबलक पाणी – आमदार हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

बारा कोटींच्या जलजीवन पाणी योजनेचे उत्साहात लोकार्पण

कसबा सांगाव/प्रतिनिधी : कसबा सांगावकरांना जलजीवन योजनेतून पिण्यासाठी मुबलक पाणी मिळणार असल्याने गावचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटल्याचा आनंद असल्याचे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. कसबा सांगाव ( ता. कागल ) येथे जलजीवन मिशन अंतर्गत १२ कोटी रुपयांच्या पाणी योजनेच्या पाणी पूजन व ग्रामपंचायत नुतन इमारतीच्या वास्तुशांती कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार संजयबाबा घाटगे होते.पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमुळे अनेक पाणी योजना करूनही पाणी प्रश्न कायम होता. या योजनेमुळे ग्रामस्थांना मुबलक पाणी मिळणार आहे. फिल्टर हाऊसह उर्वरित काम लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. श्रीक्षेत्र आडी देवस्थानचे अधिपती प.पू.परमात्मराज राजीवजी महाराज यांच्या हस्ते विधिवत नूतन ग्रामपंचायतच्या इमारतीचे वास्तु प्रवेश करण्यात आला. यावेळी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक व जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील , जिल्हा बँक संचालक प्रताप उर्फ भैय्या माने , अनिल पाटील , सरपंच रणजीत कांबळे, किरण पास्ते, कृष्णात पाटील , मोहन आवळे, बाळासो लोखंडे , अमर कांबळे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“वसा आणि वारसा देशसेवेचा…..”
भाषणात आमदार श्री. मुश्रीफ म्हणाले, कसबा सांगाव हे स्वातंत्र्य सैनिकाचे गाव म्हणून ओळख आहे. स्वातंत्र्यानंतर सैन्य दलात ही मोठ्या प्रमाणात कार्यरत राहून या गावाने अखंड देशभक्ती जपली आहे. यावेळी माजी सैनिकांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments