Tuesday, February 4, 2025
spot_img
Homeताज्याजनसेवेचे मंदिर आणि सेनाभवनाचे प्रतिबिंब असलेल्या "शिवालय" शिवसेना शहर कार्यालयाचे शिवसेना वर्धापनदिनी...

जनसेवेचे मंदिर आणि सेनाभवनाचे प्रतिबिंब असलेल्या “शिवालय” शिवसेना शहर कार्यालयाचे शिवसेना वर्धापनदिनी उद्घाटन संपन्न

“शिवालय” रंजल्या, गांजल्या व गोरगरीब- वंचीतांसाठीचा आधारवड बनेल

“शिवालय” मंदिरातून जनसेवेसचे व्रत अखंडीत जोपासू : श्री.राजेश क्षीरसागर

जनसेवेचे मंदिर आणि सेनाभवनाचे प्रतिबिंब असलेल्या “शिवालय” शिवसेना शहर कार्यालयाचे शिवसेना वर्धापनदिनी उद्घाटन संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनिय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशिर्वादाने सन २००७ साली लावलेल्या “शिवालय” शिवसेना शहर कार्यालय या रोपट्याचे आता वटवृक्षात रुपांतर झाले आहे. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्रानुसार आजपर्यंत राजकीय क्षेत्रात काम करत आलो असून, शिवसेना पक्षप्रमुख आणी राज्याचे मुख्यमंत्री
नाम.मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवालय मंदिरातून जनसेवेचे व्रत अखंडित जोपासू. “शिवालय” रंजल्या, गांजल्या व गोरगरीब – वंचितांसाठीचा आधारवड बनेल, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली. जनसेवेचे मंदिर आणि सेनाभवनाचे प्रतिबिंब असलेल्या “शिवालय” शिवसेना शहर कार्यालयाचे शिवसेना वर्धापनदिनी झालेल्या उद्घाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
श्री.राजेश क्षीरसागर यांनी प्रथम उपस्थित शिवसैनिकांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाले कि, २००७ पासून शिवालय कोल्हापूर जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यातील आणि सीमाभागातील नागरिकांना आपुलकीचे आणि हक्काचे ठिकाण बनले आहे. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या विचारांची शिदोरी घेवून समाजकार्याच्या प्रत्येक कामात, चळवळीत हजारो शिवसैनिकांना बळ देणारी, लाखो नागरिकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी १२ महिने २४ तास जनसेवेत कार्यरत राहण्यासाठी या शिवालय मधून प्रेरणा मिळत आहे. शिवालय हि नुसती वास्तू नसून, गोरगरिबांना न्याय देण्यासाठी निर्माण झालेलं प्रेरणास्थान आहे. आगामी काळात शिवालय मधून समाजोपयोगी कामांची घोडदौड अखंडित सुरु राहील. शिवालय हे शिवसेनाभवनाचे प्रतिबिंब असून, कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे बालेकिल्ले पुन्हा जिंकून शिवसेनेस गतवैभव प्राप्त करून देवू, असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा सौ.वैशाली राजेश क्षीरसागर, युवानेते ऋतुराज क्षीरसागर, युवानेते पुष्कराज क्षीरसागर, सौ.दिशा ऋतुराज क्षीरसागर यांनी मान्यवरांच्या शुभेच्छा स्विकारल्या.यावेळी माजी आमदार चंद्रदीप नरके, शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले, कॉंग्रेस शहरअध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक राहुल चव्हाण, मा.नगरसेवक नंदकुमार मोरे, सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे, मा.नगरसेवक राजू हुंबे, मा.नगरसेवक आदिल फरास, महिला आघाडी शहरप्रमुख सौ.शुभांगी साळोखे, माजी जिल्हाप्रमुख रवी चौगुले, दीपक गौड, किशोर घाटगे, सुनील जाधव, तुकाराम साळोखे, रणजीत जाधव, निलेश हंकारे, दीपक चव्हाण, अश्विन शेळके, रियाज बागवान, पियुष चव्हाण, चेतन शिंदे, कपिल सरनाईक, महिला आघाडीच्या श्रीमती पूजा भोर, सौ.शाहीन काझी, सौ.पूजा कामते, रुपाली कवाळे, सौ.पूजा पाटील, कपिल नाळे आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments