शिवसेना शहर कार्यकारणीतील सर्व पदाधिकारी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या पाठीशी
“शिवालय” शहर कार्यालय येथे तळ ठोकून
कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी आज सकाळी नगरविकास मंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे यांची गुवाहटी येथे भेट घेवून पाठींबा दर्शविला. कोल्हापुरातील कट्टर शिवसैनिक असणारे श्री.राजेश क्षीरसागर शिंदे गटात सामील झाले आहेत.आज सकाळी शिवालय कार्यालय येथे दंगा झाल्याची अफवा पसरली होती. यावर शिवसेना शहर कार्यकारणीतील सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी शिवालय येथे एकवटले. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिवालय येथे मोठा पोलीस बंदोबस्तासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ठाण मांडून राजेश क्षीरसागर यांना पाठींबा दर्शविला. आज सकाळपासून शिवसेना शहर कार्यकारणीतील उपशहरप्रमुख, विभाग प्रमुख, शाखाप्रमुख, महिला आघाडी पदाधिकारी हे शिवालय या शिवसेना कार्यालयात तळ ठोकून आहेत.