महाराष्ट्राला आदर्शवत शिवसंपर्क अभियान कोल्हापूरातील शिवसैनिकांनी राबवावे – राजेश क्षीरसागर
कोल्हापुरात शिवसेनेचे दि.२६ ते २९ मे दरम्यान शिवसंपर्क अभियान
कोल्हापूर /प्रतिनिधी : शिवसेनेने आणि मुख्यमंत्री म्हणून नाम.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांनी केलेले काम तळागाळापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी शिवसैनिकांची असून, शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून प्रभाग निहायशाखांची स्थापना करावी. या शाखांच्या माध्यमातून सर्वसामन्य नागरिकांचे प्रश्न सोडवावेत. पक्ष संघटन मजबूत असेल तर कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची ताकत निर्माण होते. शिवसेनेवर चालून आलेल्या संकटाना जशास तसे उत्तर देण्यासाठी पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आयोजित शिवसंपर्क अभियानाचा दुसरा टप्पा दि.२६ ते २९ मे २०२२ रोजी दरम्यान कोल्हापुरात पार पडणार असून, पक्षबांधणीसह महाराष्ट्रात आदर्शवत शिवसंपर्क अभियान कोल्हापुरातील शिवसैनिकांनी राबवावे, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिल्या. शिवसेनेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या शिवसंपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील नियोजनाबाबत शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या बैठकीचे शासकीय विश्रामगृह येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, सत्ता गेल्याने पिसाळलेल्या भाजप आणि त्यांच्या बी टीमकडून शिवसेनेला टार्गेट केले जात आहे. अंगावर आला कि शिंगावर घेण्याचे शिकवण शिवसेनाप्रमुखांची आहे. त्यामुळे विरोधकांनी केलेली आक्रमणे परतवून लावण्याची धमक फक्त शिवसैनिकांमध्ये आहे. पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री नाम.मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब राज्याचे नेतृत्व करत असून, त्यांना घेरण्याचा डाव भाजपने आखला आहे. भाजपचा डाव उधळून लावण्याही जबाबदारी शिवसैनिकांची आहे. त्याकरिता शिवसेनेचे काम तळागाळापर्यंत पोहचणे गरजेचे आहेच यासह पक्ष संघटन मजबूत करण्याची जबाबदारी शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यावर आहे. शिवसंपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शिवसेनेची स्थानीय लोकाधिकार समिती कोल्हापुरात दि.२६ ते २९ मे दरम्यान येत असून, कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग वाईज बैठका या समिती मार्फत घेतल्या जाणार आहेत. उत्तर विधानसभा मतदारसंघात किमान ६० बैठका तर दक्षिण मतदारसंघात किमान ३० बैठका अपेक्षित असून, याकरिता प्रत्येकाने कामाला लागणे गरजेचे आहे. येत्या दोन दिवसात शिवसेना शाखांची पुर्नबांधणी, नव्याने स्थापना आदींचे नियोजन करण्यात यावे. कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून तो पुन्हा सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. शिवसैनिक प्रामाणिक असून, पक्ष वाढीकरिता मतभेद विसरून महाराष्ट्राला आदर्शवत शिवसंपर्क अभियान कोल्हापुरातील शिवसैनिकांनी राबवावे, अशा सूचना श्री.राजेश क्षीरसागर यांनी केल्या.
या बैठकीस शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारूगले, शिवाजी जाधव. मा.परिवहन सभापती राहुल चव्हाण, मा.नगरसेवक राजू हुंबे, मा.नगरसेवक दत्ताजी टिपूगडे, महिला आघाडी जिल्हा संघटक स्मिता सावंत, धनाजी दळवी, तुकाराम साळोखे, सुनील जाधव, रणजीत जाधव, किशोर घाटगे, हर्षल सुर्वे, रघुनाथ टिपुगडे, राजू पाटील, अश्विन शेळके, राजू काझी, उमेश जाधव, अभिषेक देवणे, सचिन मांगले, गणेश रांगणेकर, धनाजी कारंडे, विशाल पाटील, युवासेनेचे योगेश चौगले, पियुष चव्हाण, विश्वदीप साळोखे, मंजीत माने, शैलेश साळोखे, आदित्य पोवार, दादू शिंदे, कपिल पोवार आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ खास.श्री.संजय राऊत यांची दि.२८ मे रोजी कोल्हापुरात जाहीर सभा
शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ शिवसेना प्रवक्ते खासदार श्री.संजय राऊत हे दि.२८ मे २०२२ रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. शिवसंपर्क अभियान अंतर्गत प्रायव्हेट हायस्कूल मैदान येथे दि.२८ रोजी सायं.६०० वाजता जाहीर सभा होणार आहे. ही सभा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने आपआपली जबाबदारी स्विकारून कामाला लागावे, असे आवाहनही श्री.क्षीरसागर यांनी पदाधिकाऱ्यांना केले.