Tuesday, July 1, 2025
spot_img
Homeताज्याइचलकरंजीची 'म्हातारा पाऊस' ठरली सर्वोत्कृष्ट एकांकिका पुणे येथे झालेल्या रसवंती करंडक स्पर्धेत विजेतेपद   

इचलकरंजीची ‘म्हातारा पाऊस’ ठरली सर्वोत्कृष्ट एकांकिका पुणे येथे झालेल्या रसवंती करंडक स्पर्धेत विजेतेपद   

इचलकरंजीची ‘म्हातारा पाऊस’ ठरली सर्वोत्कृष्ट एकांकिका पुणे येथे झालेल्या रसवंती करंडक स्पर्धेत विजेतेपद   

कोल्हापूर/प्रतिनिधी :  अ‍ॅड. योगेश दिलीपराव नाईक प्रस्तुत आणि न्यू नटराज थिएटर्स पुणे आयोजित ‘रसवंती करंडक’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये दत्ताजीराव कदम कॉलेज इचलकरंजीने बाजी मारली असून त्यांची ‘म्हातारा पाऊस’ ही एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली आहे. प्राण मुंबई यांची ‘जनावर’ ही एकांकिका दुसरी आली असून ‘भगदाड’ ही स्वामी नाट्यांगण, डोंबिवली यांची एकांकिका तिसऱ्या क्रमांकावर आली आहे.’रसवंती करंडक’  राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा नुकतीच बालगंधर्व रंगमंदिर येथे उत्साहात पार पडली. स्पर्धेत पारितोषिक वितरण वेळी अप्पर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलिस उपायुक्त परिमंडल १ च्या ननावरे मॅडम, सहाय्यक पोलिस आयुक्त रमाकांत माने (विश्रामबाग विभाग), आयएएस अधिकारी  राजा, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे (डेक्कन विभाग), अ‍ॅड. प्रतापराव परदेशी, अखिल भारतीय महामंडळचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, दिग्दर्शक, अभिनेते चेतन चावडा, निर्माते किरण कुमावत, ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष समीर देसाई, अ‍ॅड. शिवराज कदम, अ‍ॅड. योगेश दिलीपराव नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले म्हणाले, पुण्यामध्ये गेली अनेक वर्ष अ‍ॅड. योगेश दिलीपराव नाईक प्रस्तुत ‘रसवंती करंडक’ ही राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा भरवली जात आहे. यामुळे उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ मिळते.  अशा स्पर्धांमधून चित्रपटसृष्टीला वेगवेगळे कलाकार मिळावेत हीच अपेक्षा.
स्पर्धेचा निकाल – एकांकिका – प्रथम – म्हातारा पाऊस, दत्ताजीराव कदम कॉलेज इचलकरंजी, द्वितीय – जनावर, प्राण मुंबई, तृतीय – भगदाड, स्वामी नाट्यांगण, डोंबिवली
प्रथम उत्तेजनार्थ – सिद्धेश नलावडे (बबन), स्वामी नाट्यांगण, डोंबिवली (भगदाड), स्त्री अभिनय उत्तेजनार्थ  – प्राची जाधव (बाय), क्रावूड फिल्म्स, डोंबिवली, ध्वनी पार्श्व संगीत – प्रथम – मिहीर कदम, आयुष पवार, प्राण मुंबई (जनावर), द्वितीय – नेहा पाटील, संध्या कांबळे दत्ताजीराव कदम कॉलेज इचलकरंजी (म्हातारा पाऊस),
प्रकाश योजना – प्रथम – मॉडर्न कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, पुणे (अस्थिकलश),  द्वितीय – प्राण मुंबई (जनावर), नेपथ्य – प्रथम – प्राण मुंबई (जनावर),
द्वितीय – मंदार ताठे,  स्वामी नाट्यांगण, डोंबिवली (भगदाड), स्त्री अभिनय – प्रथम – समीक्षा संकपाळ (म्हातारी), दत्ताजीराव कदम कॉलेज इचलकरंजी (म्हातारा पाऊस), द्वितीय – मानसी कोंढाळकर (वानरीन), प्राण मुंबई (जनावर), पुरुष अभिनय – प्रथम – महेश गवंडी (म्हातारा) व  दत्ताजीराव कदम कॉलेज इचलकरंजी (म्हातारा पाऊस), द्वितीय – सुनील शिंदे (अमन), जेधे महाविद्यालय, पुणे (अमन), लेखक – नचिकेत श्रीकांत दांडेकर, कलरफूल मॉक, (टिनीटस), दिग्दर्शन – प्रथम -कादंबरी माळी,दत्ताजीराव कदम कॉलेज  इचलकरंजी (म्हातारा पाऊस), द्वितीय – आकाश रुके, ऋषिकेश जाधव, प्राण मुंबई (जनावर).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments