Wednesday, February 5, 2025
spot_img
Homeताज्याव्यावसायिकांच्या परवाना नुतनीकरण तक्रारी सोडविण्यासाठी कॅम्प घ्या: आमदार जयश्री जाधव

व्यावसायिकांच्या परवाना नुतनीकरण तक्रारी सोडविण्यासाठी कॅम्प घ्या: आमदार जयश्री जाधव

व्यावसायिकांच्या परवाना नुतनीकरण तक्रारी सोडविण्यासाठी कॅम्प घ्या: आमदार जयश्री जाधव

कोल्हापूर : परवाना नुतनीकरण व फायरसेस फी बाबत व्यावसायिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाने कॅम्पचे आयोजन करण्याची सुचना आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी केले. कॅम्प घेऊन लवकरच व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्यात येतील असे महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी सांगीतले.आमदार जयश्री जाधव यांनी महापालिकेत आढावा बैठक घेतली. यावेळी प्रशासक कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई प्रमुख उपस्थित होते.
आमदार झाल्यानंतर जयश्री जाधव प्रथमच महापालिकेत आल्या होत्या. यावेळी महापालिका प्रशासनाच्या वतीने प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते आमदार जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, परवाना नुतनीकरण फी मधून फायरसेसची फी वसूल केली जात आहे. परंतु ज्या व्यवसायांना फायरसेस लागू नाही, त्यांच्याकडूनही फायरसेस वसुल करणे चुकीचे आहे. त्यामुळे ज्या व्यवसायांना फायरसेस लागू होत नाही, त्यांचे फायरसेस कमी करून द्या. परवाना नुतनीकरण फी व फायरसेसची फी वेगळी करून, त्याची कायमस्वरूपी अंमलबजावणी करावी. परवाना नुतनीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर ऑनलाईन करावी. परवाना फेरफार व ट्रेड बदल बाबत व्यापाऱ्यांच्या तक्रारी आहेत. व्यापाऱ्यांच्या सर्व तक्रारीबाबत कॅम्प घेऊन, त्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवा.
व्यापाऱ्यांच्या समस्याबाबत महापालिका प्रशासन व व्यापारी संघटना एकत्रितपणे सर्व समस्यावर चर्चा करावी. त्या सोडविण्यासाठी कॅम्पचे आयोजन केले जाईल, असे आयुक्त तथा प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी सांगीतले.फायरसेस फीच्या तक्रारीमुळे अनेक व्यापाऱ्यांनी परवाना नुतनीकरण केलेले नाही. त्यामुळे परवाना नुतनीकरणासाठी व्यापाऱ्यांना मुदतवाढ द्यावी अशी सुचना आमदार जयश्री जाधव यांनी केली.उपायुक्त रविकांत आडसुळ, उपायुक्त प्रिया दरेकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपअभियंता हर्षजित घाटगे, मनिष रणभिसे, तानाजी कवाळे, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, धनंजय दुग्गे, जयेश ओसवाल, अजित कोठारी, संभाजी पवार, संपत पाटील आदी उपस्थित होते.

चौकट
शहरातील सर्व गार्डनच्या सुशोभिकरण करण्यात येत आहे.या सर्व गार्डनला सुरक्षारक्षक नेमा. मान्सून पूर्वी शहरातील सर्व नाले सफाईचे काम सुरू आहे. मात्र ते संथ गतीने आहे. यामुळे नाले सफाईचे काम वेगाने करा. शहरात अनेक ठिकाणी उघड्यावर कचरा पडल्याचे दिसून येते. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा अशा सूचना आमदार जाधव यांनी यावेळी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments