प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी प्रशांत मोहोड यांची गोकुळ दूध संघास भेट
कोल्हापूर/प्रतिनिधी . राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे अधिकारी प्रशांत मोहोड (प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी), सतीश डोईफोडे (जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी पुणे),प्रकाश आवटी(जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी कोल्हापूर),संपत जांभळे (वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी) यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) दूध संघास सदिच्छा भेट दिल्याबद्दल गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील (आबाजी) यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्ग(आर.के.व्ही.वाय) मंजूर झालेल्या प्रकल्पांना ते भेट देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौ-यावर आले असता. गोकुळच्या सॅटेलाईट डेअरी उदगाव उभारणी व गोकुळ शिरगाव विस्तारीकरण व प्रकल्पाच्या प्रत्यक्षात पाहणीकरिता त्यांनी आज गोकुळ दूध संघास भेट दिली. गोकुळ दूध संघामार्फत दूध उत्पादक शेतक-यांसाठी राबविल्या जाणा-या सर्व योजनांची माहिती घेतली त्यांनी गोकुळ दूध संघाचे कौतुक करुन समाधान व्यक्त केले. तसेच प्रलंबित असणारे सर्व प्रस्तावांना योग्य ते सहकार्य करू असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी संघाचे चेअरमन विश्वास पाटील (आबाजी), कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी श्री.एस.एम.पाटील,डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, व्यवस्थापक प्रशासन श्री.डी.के.पाटील, संघाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.