महिलाशक्ती जयश्रीताईंच्या पाठीशी – सरलाताई पाटील
कोल्हापूर /प्रतिनिधी : स्वतःचा जीव धोक्यात घालून स्व.चंद्रकांत जाधव यांनी कोरोना काळात जनतेच्या कामासाठी स्वतःला झोकून दिले. त्यांच्या माघारी उत्तरच्या निवडणुकीत उभ्या असलेल्या जयश्रीताई जाधव यांच्या पाठीशी महिलाशक्ती ठामपणे उभी आहे. त्यामुळे उत्तरमधील त्यांचा विजय निश्चित असल्याचे महिला कॉंग्रेसच्या राज्य उपाध्यक्षा सरलाताई पाटील यांनी सांगीतले. कदमवाडी परिसरात जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित महिलांच्या पदयात्रेदरम्यान त्या बोलत होत्या.
डी वाय पाटील हॉस्पिटल येथून या पदयात्रेला सुरवात झाली. मोहिते कॉलनी, जमादार कॉलनी, नक्षत्र पार्क, कारंडे मळा, देवणे मळा, सहजीवन परिसरातून काढण्यात आलेल्या या पदयात्रेला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील आणि जयश्री जाधव यांच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
सुलोचना नाईकवडे म्हणाल्या, महिलांच्या सन्मानासाठी व सबलीकरणासाठी स्व.चंद्रकांत जाधव नेहमीच कार्यरत राहिले. त्यांच्या माघारी नारी शक्तीची ताकद दाखविण्यासाठी जयश्रीताईंना विजयी करावे.
शहर महिला अध्यक्षा संध्या घोटणे, माजी नगरसेविका भारती पोवार, उज्जवला चौगुले, रेवती रसाळे, माजी महापौर वैशाली डकरे, माजी नगरसेविका शोभा कवाळे, हेमलता माने, पद्मिनी माने, वैशाली जाधव, मीना शेजवळ, तौफिक मुल्लाणी, भरत रसाळे, रंगराव देवणे, अरविंद मेढे, निलेश भोसले, अनिल कारंडे, दिपक शेळके, संपत चौगुले, विकी घाटगे, शिवाजी कांबळे, रुपा पाटील, उत्तम भोसले, प्रमोद आयवळे, बाजीराव जाधव आदी कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते.